agriculturai stories in marathi, agrowon, Grapes advice | Agrowon

भुरीच्या नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न आवश्‍यक
डॉ. एस. डी. सावंत
गुरुवार, 30 नोव्हेंबर 2017

येत्या शुक्रवारपासून ज्या वेळी ढगाळ वातावरण तयार होईल, त्या पाच-सहा दिवसांच्या काळात भुरीच्या नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहेत.

येत्या आठवड्यामध्ये सर्व द्राक्ष विभागांमध्ये चांगले वातावरण राहण्याची शक्यता आहे. सांगली, सोलापूर भागामध्ये शनिवार ते सोमवार वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असली तरी पावसाची फारशी शक्यता दिसत नाही. फारतर एक दोन ठिकाणी रिमझिम पाऊस होऊ शकेल. अशाच प्रकारचे ढगाळ वातावरण शुक्रवारपासून पुणे व जवळपासचा भाग आणि नाशिक भागात राहील. पावसाची शक्यता अद्याप दिसत नाही.

ढगाळ वातावरणामध्ये रात्रीचे तापमान वाढून २० -२२ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. ढगाळ वातावरण, थोडीशी आर्द्रता (५० टक्क्यांवर) व जास्त काळ तापमान २० ते २५ अंश सेल्सिअस या दरम्यान राहिल्यास त्यावेळी भुरी रोगाचे बिजाणू मोठ्या प्रमाणात तयार होतात. बिजाणू वेगाने तयार झाल्यास भुरीचा प्रसार वाढतो. थोडक्यात येत्या शुक्रवारपासून ज्या वेळी ढगाळ वातावरण तयार होईल, त्या पाच-सहा दिवसांच्या काळात भुरीच्या नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहेत.

  1. बहुतांशी द्राक्ष बागा फुलोरा अवस्थेच्या पुढील स्थितीत आहेत. अशा वेळी कॅनोपी वाढलेली असल्याने फवारणीद्वारे वापरलेली बुरशीनाशके आतील कॅनोपीपर्यंत पोचत नाही. भुरीचा प्रादुर्भाव हा प्रामुख्याने आतील कॅनोपीमध्ये होते. त्यामुळे रोगाचे नियंत्रण प्रभावी रितीने होत नाही. खालील बाजूच्या कॅनोपीमध्ये बरीचशी पाने किंवा फूटी फारशा उपयोगाच्या नसतात. किंबहुना काही काळानंतर त्या पिवळ्या पडून गळून जातात. अशी पाने आताच काढून टाकली तर कॅनोपीमध्ये हवा खेळती राहील. सूर्यप्रकाश सर्वत्र पोचू शकेल. आतील कॅनोपीपर्यंत फवारणीचे कव्हरेज मिळाल्याने रोगनियंत्रण चांगले होईल. विशेषतः घडाच्या खालील बाजूची पाने व खालील भागामध्ये उशिरा फुटलेल्या फुटी काढून घ्याव्यात.
  2. फवारणीसाठी फलधारणेनंतरच्या पुढील अवस्थेत असलेल्या बागांसाठी फक्त सल्फर वापरल्यास बागेमध्ये जैविक नियंत्रक घटकांचा वापर शक्य होईल. म्हणूनच शक्यतो भुरीच्या नियंत्रणासाठी सल्फर (८० डब्ल्यूजी किंवा डब्ल्यूडीजी) दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणीसाठी वापरावे. सध्याच्या स्थितीमध्ये वातावरणामधील आर्द्रता जैविक नियंत्रक घटकांच्या वापरासाठी योग्य आहे. ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम (किंवा मिली) प्रति लिटर किंवा बॅसिलस सबटिलीस दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर किंवा ॲम्पीलोमायसीस ३ ते ५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारल्यास भुरीचे नियंत्रण बऱ्यापैकी मिळू शकेल. विशेषतः ज्या बागेमध्ये फक्त सल्फर वापरलेले आहे, तिथे ट्रायकोडर्मा चांगल्या प्रकारे काम करू शकते. ट्रायअझोल जातीतील बुरशीनाशके किंवा अन्य आंतरप्रवाही बुरशीनाशके वापरल्यास जैविक नियंत्रक घटकांच्या वापराने भुरीचे कमी प्रमाणात नियंत्रण मिळेल.
  3. फुलोरा ते फळधारणेच्या अवस्थेमध्ये बागांमध्ये ‘अनेक्श्‍चर पाच’मध्ये दिलेल्या व ज्यांचा पीएचआय ५५ ते ६० दिवस दर्शवलेला आहे, त्या सर्व बुरशीनाशकांचा वापर अजूनही शक्य आहे. या अवस्थेतील बागांवर या बुरशीनाशकांचा वापर करून भुरीचे नियंत्रण मिळवल्यास फळधारणेनंतर जैविक नियंत्रक घटकांचा वापर करणे शक्य होईल.
  4. पोटॅश (०-५२-३४ किंवा ०-०-५०) आणि कॅल्शियम (कॅल्शिअम सल्फेट किंवा कॅल्शिअम क्लोराईड) या पोषक द्रव्यांची फवारणी झालेली असल्यास त्याचा फायदा भुरीच्या नियंत्रणासाठी होऊ शकतो.

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...