agriculturai stories in marathi, agrowon, grapes advice | Agrowon

पुढील टप्प्यात द्राक्षबागेला पावसाचा फारसा धोका नाही
डॉ. एस. डी. सावंत
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

मागील आठवड्यामध्ये राज्यातील जालना, कडवंची भागामध्ये गारपीट झाली. या भागातील द्राक्षबागांचे बरेच नुकसान झाले. आता पुढील काळात सर्वच द्राक्ष विभागामध्ये वातावरण सर्वसाधारण राहण्याची शक्यता आहे. कोणत्याही भागामध्ये पाऊस किंवा ढगाळ वातावरणांची फारशी शक्यता नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. पुढील दहा ते पंधरा दिवसांत काढणीला आलेल्या द्राक्षांना कोणताही धोका नाही.

मागील आठवड्यामध्ये राज्यातील जालना, कडवंची भागामध्ये गारपीट झाली. या भागातील द्राक्षबागांचे बरेच नुकसान झाले. आता पुढील काळात सर्वच द्राक्ष विभागामध्ये वातावरण सर्वसाधारण राहण्याची शक्यता आहे. कोणत्याही भागामध्ये पाऊस किंवा ढगाळ वातावरणांची फारशी शक्यता नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. पुढील दहा ते पंधरा दिवसांत काढणीला आलेल्या द्राक्षांना कोणताही धोका नाही.

काढणीला आलेल्या द्राक्षांच्या घडावर, मण्यावर किंवा देठांवर भुरीचा प्रादुर्भाव दिसत असल्यास या वेळी कोणत्याही बुरशीनाशकांचा वापर करू नका. त्याऐवजी बॅसीलस सबटिलीस या सारख्या जैविक घटकांचा वापर करून भुरी नियंत्रित करावी. मण्यावर व घडावर छाटणीनंतरच्या ६०-६५ दिवसांनंतर आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर केलेला असल्यास विश्लेषणामध्ये त्याचे उर्वरीत अंश निश्चित दिसू शकतील. विशेषतः जर वाढत्या मण्यावर फ्लुसीलॅझोल वापरलेले असल्यास त्याचे उर्वरीत अंश कदाचित एमआरएल (०.१ पीपीएम ) पेक्षा जास्तसुद्धा राहू शकतील. अशा परिस्थितीमध्ये शेवटचा उपाय म्हणून जैविक नियंत्रक घटकांचा वापर फवारणीसाठी करावा. कोणत्याही कीटकनाशकाचे रेसिड्यू एमआरएल पेक्षा थोड्या प्रमाणात जास्त आढळले असल्यास ते वेगाने कमी करण्यासाठी मण्यावर जैविक नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या बुरशीजन्य (ट्रायकोडर्मा) किंवा जिवाणूजन्य (बॅसिलस सबटिलीस) घटकांचा वापर उपयोगी ठरेल. घडांवर पेपर लावलेला असल्यास, तो काढून घेऊन मण्यावर जैविक नियंत्रणाचा वापर करावा. असे केल्याने मण्यावरील उर्वरित अंश कमी होतील.

गारपीट झालेल्या भागांसाठी काही विशेष सूचना

  • घडांवरील मण्यांना इजा झालेली असल्यास, असे जास्त जखमा झालेले मणी काढून टाकावीत. उरलेल्या मण्यांवर क्लोरीन डाय ऑक्साईड ५० पीपीएम किंवा सिल्व्हर कॉप्लेक्स ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड (५० टक्के) २ मिली प्रति लिटर फवारावे. या फवारणीने फळांचे कुजीपासून संरक्षण होईल. मण्यावर कायटोसॅन २ मिलि प्रति लिटर प्रमाणे फवारल्यास मण्यावर झालेल्या छोट्या दुखापतीपासून मण्यातील रस बाहेर येणार नाही. कायटोसॅन एक आवरण तयार करते, त्यामुळे मण्यातील हलक्या जखमांतून रस बाहेर येणार नाही. घडांची विक्री करणे सुलभ होऊ शकेल.
  • जिथे जास्त प्रमाणात घडांना दुखापत झालेली आहे, अशा घडांना वेलीवर जास्त काळ न ठेवता त्वरित काढून घ्यावेत. वेलीवर हे घड राहिल्यास वेलीतील साठवलेले अन्नद्रव्ये वापरली जाऊन वेलीवर आणखी ताण पडू शकतो. पुढील वर्षीची उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. याचीही नोंद घ्यावी.

टीप ः वरील पदार्थांना लेबल क्लेम नसल्याने त्याचा वापर स्वतःच्या जबाबदारीवर सावधानतेने किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने  करावा. सद्यपरिस्थितीमध्ये कोणताही पर्याय नसल्यामुळेच हा उपाय सूचवित आहोत.
 

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...