agriculturai stories in marathi, agrowon, Hailstorm affected crop advice | Agrowon

गारपीटग्रस्त रब्बी पिकांचे व्यवस्थापन
डॉ. भगवान आसेवार
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यासह
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस, गारपीट यासोबतच जोराचा वारा यामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये गारपीटग्रस्त पिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करावी.

मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यासह
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस, गारपीट यासोबतच जोराचा वारा यामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये गारपीटग्रस्त पिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करावी.

रब्बी ज्वारी
जोराचा वारा तसेच गारपिटीमुळे पीक आडवे पडले आहे. ज्वारीची कणसे जमिनीला चिकटून किंवा पाण्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते.
पिकामध्ये साचलेले पाणी त्वरित काढून घ्यावे.
आडवी पडलेली कणसे त्वरित कापून हवेशीर वाळवावीत.
बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी मॅन्कोझेबची शिफारशीत प्रमाणात फवारणी करावी.
 
हरभरा  
शेतातील साचलेले पाणी काढून द्यावे. जोराचा वारा व गारपीट यामुळे अनेक ठिकाणी फांद्या किंवा संपूर्ण पीक आडवे झाले आहे. आडवी पडलेली झाडे वेचून, गोळा करावीत. काढणीस आलेले पीक त्वरित काढावे.

गहू
जोराचा वारा तसेच गारपिटीमुळे अनेक ठिकाणी पीक आडवे पडले आहे. ओंब्या जमिनीला लागून, पाण्यात भिजल्यामुळे जास्त नुकसान होते. साचलेले पाणी शेताबाहेर काढून द्यावे.

फळपिके  
फळपिकांमध्ये गारपिटीमुळे अधिक नुकसान झाले आहे. गारपीट व जोराच्या वाऱ्यामुळे तुटलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. झाडांना इजा झाली असल्यास तुटलेल्या भागामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा १ टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.

संपर्क : डॉ. भगवान आसेवार, ९४२००३७३५९
(मुख्य शास्त्रज्ञ, कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...