agriculturai stories in marathi, agrowon, kandari, tal. Nandura, dist. Buldana | Agrowon

सुधारित तंत्र, ठिबक सिंचनातून वाढविले तुरीचे उत्पादन
गोपाल हागे
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

कंडारी (ता. नांदुरा, जि. बुलडाणा) येथील बाळकृष्ण वासुदेव पाटील यांच्याकडे चाळीस एकर शेती आहे. संपूर्ण शेतीला त्यांनी ठिबक सिंचन केले आहे. पाटील हे कपाशी, तूर, उडीद, हरभरा, मका या पिकांचे सुधारित पद्धतीने व्यवस्थापन ठेवतात. दहा एकरांवर त्यांनी संत्रा व सीताफळाची लागवड केली अाहे. योग्य व्यवस्थापनातून बाळकृष्ण पाटील यांनी तूर उत्पादनात एकरी १० ते १२ क्विंटलपर्यंत सातत्य ठेवले आहे.

कंडारी (ता. नांदुरा, जि. बुलडाणा) येथील बाळकृष्ण वासुदेव पाटील यांच्याकडे चाळीस एकर शेती आहे. संपूर्ण शेतीला त्यांनी ठिबक सिंचन केले आहे. पाटील हे कपाशी, तूर, उडीद, हरभरा, मका या पिकांचे सुधारित पद्धतीने व्यवस्थापन ठेवतात. दहा एकरांवर त्यांनी संत्रा व सीताफळाची लागवड केली अाहे. योग्य व्यवस्थापनातून बाळकृष्ण पाटील यांनी तूर उत्पादनात एकरी १० ते १२ क्विंटलपर्यंत सातत्य ठेवले आहे.

बहुतांश शेतकऱ्यांचा अद्याप तुरीकडे मुख्य पीक म्हणून बघण्याचा दृष्टिकोन दिसून येत नाही. बहुतांश शेतकरी कपाशी किंवा सोयाबीनमध्ये तुरीचे एक-दोन तास लागवड करतात. परंतु कंडारी (ता. नांदुरा, जि. बुलडाणा) येथील बाळकृष्ण पाटील यांनी हा दृष्टिकोनच बदलला. १९९९ पासून त्यांनी उत्पादनवाढीसाठी ठिबकवर तूर लागवडीस सुरवात केली. दोन वर्षांपूर्वी कुटुंब विभक्त झाले, तरी त्यांनी तूर लागवडीचे नियोजन कायम ठेवले आहे. तुरीचा कालावधी हा जातीपरत्वे वेगवेगळा असला, तरी मध्यम ते उशिरा (१५० ते २०० दिवस) येणाऱ्या जातीचा पेरा जास्त प्रमाणात असतो. याचबरोबरीने २५ एकरांवर बीटी कपाशी, पाच एकरांवर हरभरा, दहा एकरांवर मका लागवडीचे त्यांचे नियोजन असते. कपाशीचे एकरी २० क्विंटल, हरभऱ्याचे सात क्विंटल आणि मक्याचे एकरी ४० क्विंटल उत्पादन मिळते. माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा वापर आणि जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करून जमिनीची सुपीकता जपण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. संपूर्ण लागवड क्षेत्राला त्यांनी ठिबक सिंचन केले आहे. मोठे लागवड क्षेत्र आणि मजूरटंचाई लक्षात घेऊन पाटील यांनी ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, रोटाव्हेटर आणि मळणी यंत्राची उपलब्धता करून ठेवली आहे. त्यामुळे मशागत, पेरणी, आंतरमशागत, काढणी आणि मळणीची कामे योग्य वेळी कमी मजुरांच्यामध्ये होतात.

असे आहे तुरीचे नियोजन

  • मे महिन्यात १५ तारखेनंतर रोटाव्हेटरने खोल नांगरणी. जमीन सपाट करून एकरी चार बैलगाडी शेणखत मिसळले जाते. पेरणीपूर्वी सऱ्या पाडून योग्य पाऊस झाल्यावर तुरीची लागवड केली जाते.
  • तुरीच्या दोन अोळींतील अंतर अाठ फूट आणि दोन झाडांतील अंतर दीड फूट.  एका     ठिकाणी चार बिया टोकल्या जातात. त्यातील एक जोमदार रोप ठेवले जाते.
  • आंतरपीक ः तुरीच्या दोन अोळींत अाठ फुटांचे अंतर असल्याने मधल्या पट्ट्यात दोन     फुटांच्या अंतराने उडदाची तीन अोळींत पेरणी. याचा तुरीवर काही परिणाम होत नाही.
  • सुधारित पद्धतीने लागवड केल्यामुळे तुरीचे झाड चांगले सशक्त व जोमदार.     जमिनीपासून एक फुटापासून फळ फांद्या येऊन झाड डेरेदार वाढते. त्यामुळे भरपूर फुले अाणि शेंगांचा बहर.
  • जाती ः पीकेव्ही तारा, बीएसएमअार ७३६ या जातींना प्राधान्य. स्वतः बीजोत्पादनावर भर. त्यामुळे उत्पादनात सातत्य.
  • बीजप्रक्रिया (प्रति किलो बियाणे)  ः  ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम किंवा थायरम २ ग्रॅम. त्यानंतर लागवडीअगोदर रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धक प्रत्येकी २५ ग्रॅम गुळाच्या द्रावणात भिजवून प्रक्रिया.
  • खतमात्रा (एकरी)  ः  पेरणी करताना ३० किलो १० ः २६ ः २६. पेरणीनंतर ५० ते ६० दिवसांनी १५ ः १५ ः १५ हे पन्नास किलो व सोबत १० किलो गंधक. कळी अवस्थेत एकरी २५ किलो पोटॅशची मात्रा. याचबरोबरीने वाढीच्या टप्प्यानुसार ठिबकद्वारे नत्र, स्फुरद, पोटॅशची मात्रा. याचा पीकवाढीस फायदा.
  • एकात्मिक कीड, रोगनियंत्रणावर भर ः  शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंग माशी या किडींच्या नियंत्रणासाठी फूल कळी अाल्यापासून शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेपर्यंत पिकाचे वेळोवेळी निरीक्षण करून व्यवस्थापन. विद्यापीठातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने शिफारशीत कीडनाशकांच्या वापरावर भर.

काटेकोर पाणी व्यवस्थापन
पाणी व्यवस्थापनाबाबत पाटील म्हणाले, की तुरीच्या उत्पादनात सातत्य टिकवून ठेवण्यात पाणी व्यवस्थापन महत्वाचे आहे. फुले धरणे, शेंगा लागण्याची अाणि शेंगामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत तुरीच्या पिकाला पाण्याचा ताण पडू दिला जात नाही. फुले व शेंगा लागण्याच्या काळात जमिनीत अोलावा कमी होण्यास सुरवात झालेली असते. पाणी नसेल तर तुरीचे उत्पादन हमखास घटते. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून  मी तुरीचे पीक ठिबकवर घेण्यास सुरवात केली. अातापर्यंत मला योग्य पीक व्यवस्थापनातून एकरी सरासरी १० ते १२ क्विंटल उत्पादन मिळाले आहे. तूर आणि उडदाची विक्री नांदुरा बाजारपेठेत केली जाते.

फळबाग
पाटील यांनी चार वर्षांपूर्वी सीताफळाच्या बाळानगरी जातीची दोन एकरांवर १२ फूट बाय ८ फूट अंतरावर लागवड केली. यंदाच्या वर्षी पहिल्या बहरातून त्यांना एक लाखाचे उत्पन्न मिळाले. फळांची विक्री अकोला बाजारपेठेत केली. दोन वर्षांपूर्वी तीन एकरांवर पुन्हा सीताफळाच्या बाळानगरी जातीची १४ फूट बाय साडेसात फूट अंतराने लागवड केली. त्यामध्ये तुरीचे आंतरपीक घेतले होते. दोन वर्षांपूर्वी संत्र्याच्या नागपुरी जातीची पाच एकरांवर २० फूट बाय १८ फूट अंतराने लागवड केली आहे. येत्या काळात फळबागेतूनही शाश्वत उत्पन्नास सुरवात होणार आहे.

उत्पादनात सातत्य  
सर्वसाधारणपणे तुरीचे एकरी तीन क्विंटलपासून सहा क्विंटलपर्यंत उत्पादन घेणारे असंख्य शेतकरी अाहेत. मात्र पाटील यांनी अाधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व योग्य नियोजनावर भर दिला. लागवडीपासून ते काढणीपर्यंत प्रत्येक अवस्थेत योग्य व्यवस्थापन केल्याने त्यांना तुरीचे दरवर्षी १० क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन मिळते.

तीन वर्षांतील उत्पादन (क्विंटल)

वर्ष   तूर   उडीद
२०१५       ११   ३
२०१६          १०         ३.५
२०१७            १०      ३

जमा खर्चाचा तपशील
तुरीचा एकरी खर्च

जमीन तयार करणे - १,५००
शेणखत - २,५००
बियाणे - ३००
खत - ४,०००  
अांतरमशागत - २,५००
फवारणी - ३,०००
कापणी - २,०००
मळणी - २,०००
एकूण - १७,८०० रू.

उडदाचा एकरी खर्च
बियाणे - ५००
खते - १,२००
मशागत - १,२००
फवारणी - १,२००
कापणी + मळणी - ३,०००
एकूण - ७,१०० रु.

वाहतूक, हमाली आणि इतर खर्च - २००० रुपये

एकूण खर्च - २६,९०० रु.
टीप ः यंत्रे, अवजारे स्वतःची असल्याने काही प्रमाणात खर्चात बचत झाली आहे.

उत्पादन (एकरी)
तूर उत्पादन - १० क्विंटल
हमीभाव - ५,४५० रुपये
उत्पन्न (रुपये) - ५४,५००

उडीद उत्पादन - ३ क्विंटल
हमीभाव - ५,४००
उत्पन्न (रुपये) - १६,२००

तूर +उडीद उत्पन्‍न - ७०,७०० रुपये

निव्वळ उत्पन्न - ४३,८०० रू.
 
संपर्क ः बाळकृष्ण पाटील, ९२८४४७८७५१

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
परभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...
‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...
साखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...
सहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...
चला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...
‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...
तुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...
कृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
होय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
अठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...
‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...