agriculturai stories in marathi, agrowon, LED for medical purpose | Agrowon

शरीरात औषधे त्वरित पोचवण्यासाठी एलईडी ठरेल उपयुक्त
वृत्तसेवा
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017

एलईडी दिव्यांचा वापर पिकांच्या उत्पादनवाढीसह विविध क्षेत्रांमध्ये वाढत आहे. प्रिन्सटन विद्यापीठामध्ये या प्रकाशांच्या साह्याने किरणत्सारीत मूलद्रव्यांची निर्मिती करून औषधे रुग्णांच्या शरीरामध्ये देण्याचे नव तंत्रज्ञान शोधण्यात आले आहे. पूर्वी औषधे घेतल्यानंतर त्याचा परिणाम शरीरावर होण्यासाठी काही महिन्यांपर्यंतचा कालावधी लागत असे. मात्र, या नव्या पद्धतीमध्ये फोटोकॅटॅलिस्टिक प्रक्रियेने काही तासांतच हायड्रोजनची जागा ट्रिटियमने घेणे शक्य झाले आहे.

एलईडी दिव्यांचा वापर पिकांच्या उत्पादनवाढीसह विविध क्षेत्रांमध्ये वाढत आहे. प्रिन्सटन विद्यापीठामध्ये या प्रकाशांच्या साह्याने किरणत्सारीत मूलद्रव्यांची निर्मिती करून औषधे रुग्णांच्या शरीरामध्ये देण्याचे नव तंत्रज्ञान शोधण्यात आले आहे. पूर्वी औषधे घेतल्यानंतर त्याचा परिणाम शरीरावर होण्यासाठी काही महिन्यांपर्यंतचा कालावधी लागत असे. मात्र, या नव्या पद्धतीमध्ये फोटोकॅटॅलिस्टिक प्रक्रियेने काही तासांतच हायड्रोजनची जागा ट्रिटियमने घेणे शक्य झाले आहे.

वास्तविक पाहता किरणोत्सारी घटकांचे शरीरावर विपरीत परिणाम होतात. मात्र, वैद्यकीय कारणांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. या किरणोत्सारीतेचा वापर करून औषधे शरीरामध्ये योग्य ठिकाणी पोचवण्याची नावीन्यपूर्ण पद्धती प्रिन्सटन विद्यापीठातील रसायनशास्त्राचे प्रा. डेव्हिड मॅकमिलन यांनी विकसित केली आहे. त्याविषयी माहिती देताना प्रा. मॅकमिलन म्हणाले, की संशोधनानंतर औषधे बाजारपेठांमध्ये येण्याचा सरासरी कालावधी हा १२ ते १४ वर्षे इतका मोठा आहे. कारण त्यांच्या चाचण्या घेताना लागणारा कालावधी मोठा आहे. हा कालावधी कमी करणे नव्या तंत्रामुळे शक्य होणार आहे. परिणामी औषधांची उपलब्धताही वेगाने होऊ शकेल. कारण तोंडावाटे घेतलेले औषध लक्ष्य असलेल्या अवयवापर्यंत पोचण्यासाठी मोठा कालावधी लागतो. त्यात ते नेमके लक्ष्य असलेल्या अवयवापर्यंत जाते की नाही, परिणाम करते की नाही, याच्या सातत्याने चाचण्या घ्याव्या लागतात. या औषधी मूलद्रव्यासह किरणोत्सारीत घटक असल्यास त्यांचा मागोवा घेणेही अत्यंत सोपे जाते.

किरणोत्साराचा धोका कमी करण्यासाठी...
अर्थात, या तंत्रामध्ये किरणोत्सारी घटकांचा वापर केलेला असल्याने त्याचा परिणाम दीर्घकाळापर्यंत रुग्णांच्या शरीरात राहू शकतो. या धोक्यावर मात करण्यासाठी प्रा. मॅकमिलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निळ्या प्रकाशाच्या एलईडी दिवा आणि त्यावर कार्यान्वित होणाऱ्या घटकांचा आधार घेत नवी पद्धती तयार केली. हे संशोधन जर्नल सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. यात जड पाण्याचा वापर केला असून, त्यातील एच किंवा हायड्रोजन मूलद्रव्याची जागा ट्रिटियम घेते. यामध्ये प्रकाश मदत करतो. ही प्रक्रिया सर्व प्रकारच्या औषधांसाठी उपयुक्त ठरू शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे.
 

टॅग्स

इतर बातम्या
'टिळक महाराष्ट्र विद्यापीठा'तर्फे...पुणे : टिळक महाराष्ट्र अभिमत विद्यापीठाने ‘सकाळ’...
शेतकऱ्यांसाठी हमीभाव दिवास्वप्नचमुंबई : सध्या शेतीमाल हमीभावाच्या मुद्द्यावरून...
साखर मूल्यांकनात १३० रुपयांनी वाढकोल्हापूर : साखर दरात वाढ होत असल्याने त्याचा...
संयुक्त खतांच्या किमती वाढल्यानागपूर ः वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांसमोरील...
हेक्टरी २९१ किलोच तुरीची खरेदीसांगली : वेळ सकाळी दहाची...जत तालुक्‍यातील शेतकरी...
सरकार कांदा खरेदी करण्याची शक्यतानवी दिल्ली : देशात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना...
मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी गारपिटीची...पुणे ः कर्नाटकाचा उत्तर भाग आणि अरबी समुद्र, गोवा...
‘हवामान स्मार्ट शेती’ प्रकल्पाला...नवी दिल्ली : हवामानाच्या लहरीपणामुळे देशातील...
माझा शेतकरी चोर आहे का ः धनंजय मुंडेरावेर, जि. जळगाव ः मराठवाड्यातील गारपीटग्रस्त...
स्थलांतरित गावांतही मिळणार रेशनचे...नगर : रोजगारासाठी गाव सोडलेल्या कुटुंबांना आता...
राज्यातील धरणासाठा ५२.८३ टक्क्यांवरपुणे : राज्यात रब्बी हंगामात पाण्याचा मोठ्या...
नाशिक विभाग ‘मनरेगा’ची मजुरी जमा...नाशिक  : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’ खर्च करणार ‘केम...अकोला  ः कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास...
खतांवरील अनुदानाबरोबरच किमतीही हव्यात...खत उद्योगाच्या प्रगतीमध्ये केंद्र सरकार व राज्य...
आता आरोग्यासाठी ‘न्यूट्रासिटिकल्स’औषधनिर्माणशास्त्र आणि अन्ननिर्मितीशास्त्र...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पेटून उठासेलू, जि. परभणी : कधी गारपीट, कधी अवकाळी पाऊस,...
पंचायत तज्ज्ञ गटाचा अहवाल लवकरच सादर...पुणे  : राज्यातील ग्रामविकासाची भविष्यकालीन...
बायफचा फ्रान्स सरकारकडून गौरव पुणे : पशुसंवर्धन, ग्रामविकास व शेती क्षेत्रात...
परभणी जिल्ह्यातील १४ हजार जनावरांना इअर...परभणी : पशुसंवर्धन विभागांतर्गत राबविण्यात येत...
जळगाव जिल्ह्यात हवामानाचा बाजरी उगवणीवर...जळगाव  ः जिल्ह्यात बाजरीची पेरणी काही...