agriculturai stories in marathi, agrowon, modern silo technology for food grains | Agrowon

धान्य साठवणीसाठी आधुनिक सायलो तंत्रज्ञान
राकेश गुजराथी, विनोद आतकरी
रविवार, 3 डिसेंबर 2017

पिकांची काढणी ते प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोचेपर्यंतच्या काळामध्ये धान्य साठवण हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. या टप्प्यातील नुकसानीचे प्रमाण कमी करण्यासाठी सुधारित सायलो तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते. मात्र त्यामध्ये लहान उद्योजक व शेतकऱ्यांचा विचार होऊन कमी क्षमतेचे सायलो तयार झाले पाहिजेत.

पिकांची काढणी ते प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोचेपर्यंतच्या काळामध्ये धान्य साठवण हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. या टप्प्यातील नुकसानीचे प्रमाण कमी करण्यासाठी सुधारित सायलो तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते. मात्र त्यामध्ये लहान उद्योजक व शेतकऱ्यांचा विचार होऊन कमी क्षमतेचे सायलो तयार झाले पाहिजेत.

भारत सरकारच्या अंदाजानुसार २०१६-१७ या वर्षीचे देशपातळीवरील अन्नधान्य उत्पादन २७१.९८ दशलक्ष टन इतके होईल. हे प्रमाण २०१३-१४ च्या उत्पादनापेक्षा (२६५.०४ दशलक्ष टन) ६.९४ दशलक्ष टन ने जास्त आहे. एकूणच अन्नधान्यांच्या उत्पादनामध्ये सातत्याने वाढ होत गेलेली दिसून येते. एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी सुमारे ३० टक्के अन्नधान्य हे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) ही संस्था खरेदी करते.

अन्नधान्यांचे उत्पादन झाल्यानंतर प्रामुख्याने धान्यांची काढणी, मळणी, पॅकिंग, वाहतूक, साठवण व वितरण अशा अनेक घटकांचा समावेश होतो. यात प्रचंड नुकसान होते. काढणीपश्चात तंत्रज्ञानाच्या कमतरतेमुळे भारतामध्ये सुमारे १२ ते १६ दशलक्ष टन प्रति वर्ष नुकसान होते. याची किंमत ५० हजार कोटी रुपये इतकी असून, जागतिक बॅंकेच्या अहवालानुसार या नासाडी होणाऱ्या धान्यांतून भारतातील एकतृतीयांश गरिबांची अन्नधान्याची गरज भागू शकते.

काढणीपश्चात तंत्रज्ञानामध्ये विशेषतः संरक्षित साठवण करण्यासाठी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. अन्नधान्याच्या साठवणुकीवर परिणाम करणारे विविध जैविक व अजैविक घटक आहेत. त्यावर नियंत्रण ठेवून गोदामातील अन्नधान्य नासाडी रोखता येणे शक्य आहे. त्यासाठी युरोप, अमेरिकेसह जगभरात गॅलव्हनाइज्ड सायलो स्टोअरेज तंत्रज्ञान वापरले जाते. या साठवण तंत्रामध्ये अन्नधान्यातील ओलावा, कीटक, तापमान, उंदीर, पक्षी व अन्य घटकांमुळे धान्यांचे होणारे नुकसान पूर्णपणे रोखता येते. भारतात १९९० पासून खासगी क्षेत्राद्वारे ही साठवण प्रणाली वापरात आली असली तरी त्याचे सार्वत्रिकरण फारसे झाले नाही. प्रक्रिया उद्योगामध्येही सायलो तंत्रज्ञान भात गिरणी (बासमती), गहू आटा बनविणाऱ्या कंपन्या, मका प्रक्रिया केंद्रे, धान्य आधारित डिस्टिलरीज, पशुखाद्य निर्मिती कंपन्यांमध्ये वापरले जाताना दिसते. यात धान्य भरण्यापूर्वी प्री क्‍लीनर, फाइन क्‍लीनर, डी स्टोनर अशा यंत्रांमधून स्वच्छता केली जाते. धान्यातील आर्द्रतेचे प्रमाण योग्य तितके ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार ड्रायरचा वापर केला जातो. त्यानंतर हे धान्य सायलोमध्ये वरील बाजूला असलेल्या हॉपरद्वारे भरले जाते. सायलोमध्ये खास वायुविजन प्रणाली कार्यान्वित केलेली असते. त्यामुळे धान्यांची गुणवत्ता अधिक काळ चांगली राहण्यास मदत होते. धान्याच्या वाहतुकीसाठी विविध प्रकारचे कन्व्हेअर उपलब्ध आहेत. त्यामुळे सायलोमध्ये धान्य भरणे आणि काढणे या कामासाठीचे मनुष्यबळ कमी होऊ शकते. त्याच प्रमाणे वहनातील धान्य नासाडीही कमी होऊ शकते.

या तंत्रज्ञानाच्या वापरातील मुख्य अडचणी ः

  • परदेशामधील उद्योगाच्या दृष्टीने विकसित करण्यात आलेल्या सायलो तंत्रज्ञानाची क्षमता प्रचंड असते. आपल्याकडे लहान प्रक्रिया उद्योजकांच्या दृष्टीने त्यात सुधारणा होण्याची आवश्यकता आहे.
  • भारतीय परिस्थितीनुसार कमी साठवण क्षमतेच्या गॅल्व्हनाइज्ड सायलो प्रणालींचे आरेखन करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या साठवण आणि मागणीचा विचार करून प्रामुख्याने ५ ते २० टन क्षमतेचे सायलो उपयुक्त ठरतील, असा अंदाज आहे. विविध शेतकरी उत्पादक कंपन्या, बाजार समित्यांमध्ये त्यांचा वापर होऊ शकतो.

(लेखक खासगी कंपनीमध्ये कार्यरत आहेत.)

इतर कृषी प्रक्रिया
औषधी अन् आरोग्यदायी करवंदकरवंदामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर...
बेल फळापासून बनवा जॅम, कॅन्डी, स्क्वॅशबेलाचे फळ अतिशय गुणकारी आहे. बेलफळांचा वापर...
आरोग्यास उपयुक्त कुळीथआयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्‍तींसाठी...
आरोग्यदायी शेवगा भुकटीचे उपयोगशेवगा वनस्पतीचे इंग्रजी नाव ड्रमस्टिक असे असून,...
केळीपासून बनवा जेली, प्युरी, ज्यूस केळीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत. केळी शरीरातील...
उभारणी दूधप्रक्रिया उद्योगाचीप्रक्रिया प्रकल्पामध्ये दूध संकलन, गुणवत्ता...
प्रक्रियेसाठी भाताचा कोंडाभात कोंड्यामधील पोषक घटकांचे सक्रिय स्वरूप...
उभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...
प्रक्रिया उद्योगात मक्याला मागणी मक्याचा औद्योगिक प्रक्रियेमध्ये वापर वाढतो आहे....
AGROWON_AWARDS : ज्वारी उत्पादनांची...अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार...
प्रक्रिया, औषधीनिर्मितीमध्ये जांभळाला...जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे. त्याच्या...
आहारात असावी आरोग्यदायी ज्वारीज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा...
बिटापासून बर्फीनिर्मिती लाल बीट आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बीट हे...
हळदीपासून मूल्यवर्धीत पदार्थांची...हळद ही अन्नपचन, पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी आहे...
फळे, भाज्यांचा वापर करून दुग्धजन्य...विभागनिहाय उपलब्ध असणाऱ्या फळांना व भाज्यांना...
अंकुरित धान्यांपासून बेकरी उत्पादनेअंकुरलेल्या धान्यामध्ये अधिक पोषक तत्त्वे असतात....
अन्नप्रक्रिया उद्योगातील परवाने, कायदेप्रक्रिया उद्योग स्थापन केल्यानंतर या...
प्रक्रियेद्वारा आल्याचे मूल्यवर्धनआरोग्यदायी गुणधर्मामुळे आल्यापासून बनविलेल्या...
शेतकरी आठवडे बाजारचालक शेतकऱ्यांना...पुणे : शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने बाणेर येथे...
कांदा निर्जलीकरणास आहे वावकांदा हे भारतातील प्रमुख पीक असून, ते मुख्यत्वे...