agriculturai stories in marathi, agrowon, modern silo technology for food grains | Agrowon

धान्य साठवणीसाठी आधुनिक सायलो तंत्रज्ञान
राकेश गुजराथी, विनोद आतकरी
रविवार, 3 डिसेंबर 2017

पिकांची काढणी ते प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोचेपर्यंतच्या काळामध्ये धान्य साठवण हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. या टप्प्यातील नुकसानीचे प्रमाण कमी करण्यासाठी सुधारित सायलो तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते. मात्र त्यामध्ये लहान उद्योजक व शेतकऱ्यांचा विचार होऊन कमी क्षमतेचे सायलो तयार झाले पाहिजेत.

पिकांची काढणी ते प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोचेपर्यंतच्या काळामध्ये धान्य साठवण हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. या टप्प्यातील नुकसानीचे प्रमाण कमी करण्यासाठी सुधारित सायलो तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते. मात्र त्यामध्ये लहान उद्योजक व शेतकऱ्यांचा विचार होऊन कमी क्षमतेचे सायलो तयार झाले पाहिजेत.

भारत सरकारच्या अंदाजानुसार २०१६-१७ या वर्षीचे देशपातळीवरील अन्नधान्य उत्पादन २७१.९८ दशलक्ष टन इतके होईल. हे प्रमाण २०१३-१४ च्या उत्पादनापेक्षा (२६५.०४ दशलक्ष टन) ६.९४ दशलक्ष टन ने जास्त आहे. एकूणच अन्नधान्यांच्या उत्पादनामध्ये सातत्याने वाढ होत गेलेली दिसून येते. एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी सुमारे ३० टक्के अन्नधान्य हे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) ही संस्था खरेदी करते.

अन्नधान्यांचे उत्पादन झाल्यानंतर प्रामुख्याने धान्यांची काढणी, मळणी, पॅकिंग, वाहतूक, साठवण व वितरण अशा अनेक घटकांचा समावेश होतो. यात प्रचंड नुकसान होते. काढणीपश्चात तंत्रज्ञानाच्या कमतरतेमुळे भारतामध्ये सुमारे १२ ते १६ दशलक्ष टन प्रति वर्ष नुकसान होते. याची किंमत ५० हजार कोटी रुपये इतकी असून, जागतिक बॅंकेच्या अहवालानुसार या नासाडी होणाऱ्या धान्यांतून भारतातील एकतृतीयांश गरिबांची अन्नधान्याची गरज भागू शकते.

काढणीपश्चात तंत्रज्ञानामध्ये विशेषतः संरक्षित साठवण करण्यासाठी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. अन्नधान्याच्या साठवणुकीवर परिणाम करणारे विविध जैविक व अजैविक घटक आहेत. त्यावर नियंत्रण ठेवून गोदामातील अन्नधान्य नासाडी रोखता येणे शक्य आहे. त्यासाठी युरोप, अमेरिकेसह जगभरात गॅलव्हनाइज्ड सायलो स्टोअरेज तंत्रज्ञान वापरले जाते. या साठवण तंत्रामध्ये अन्नधान्यातील ओलावा, कीटक, तापमान, उंदीर, पक्षी व अन्य घटकांमुळे धान्यांचे होणारे नुकसान पूर्णपणे रोखता येते. भारतात १९९० पासून खासगी क्षेत्राद्वारे ही साठवण प्रणाली वापरात आली असली तरी त्याचे सार्वत्रिकरण फारसे झाले नाही. प्रक्रिया उद्योगामध्येही सायलो तंत्रज्ञान भात गिरणी (बासमती), गहू आटा बनविणाऱ्या कंपन्या, मका प्रक्रिया केंद्रे, धान्य आधारित डिस्टिलरीज, पशुखाद्य निर्मिती कंपन्यांमध्ये वापरले जाताना दिसते. यात धान्य भरण्यापूर्वी प्री क्‍लीनर, फाइन क्‍लीनर, डी स्टोनर अशा यंत्रांमधून स्वच्छता केली जाते. धान्यातील आर्द्रतेचे प्रमाण योग्य तितके ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार ड्रायरचा वापर केला जातो. त्यानंतर हे धान्य सायलोमध्ये वरील बाजूला असलेल्या हॉपरद्वारे भरले जाते. सायलोमध्ये खास वायुविजन प्रणाली कार्यान्वित केलेली असते. त्यामुळे धान्यांची गुणवत्ता अधिक काळ चांगली राहण्यास मदत होते. धान्याच्या वाहतुकीसाठी विविध प्रकारचे कन्व्हेअर उपलब्ध आहेत. त्यामुळे सायलोमध्ये धान्य भरणे आणि काढणे या कामासाठीचे मनुष्यबळ कमी होऊ शकते. त्याच प्रमाणे वहनातील धान्य नासाडीही कमी होऊ शकते.

या तंत्रज्ञानाच्या वापरातील मुख्य अडचणी ः

  • परदेशामधील उद्योगाच्या दृष्टीने विकसित करण्यात आलेल्या सायलो तंत्रज्ञानाची क्षमता प्रचंड असते. आपल्याकडे लहान प्रक्रिया उद्योजकांच्या दृष्टीने त्यात सुधारणा होण्याची आवश्यकता आहे.
  • भारतीय परिस्थितीनुसार कमी साठवण क्षमतेच्या गॅल्व्हनाइज्ड सायलो प्रणालींचे आरेखन करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या साठवण आणि मागणीचा विचार करून प्रामुख्याने ५ ते २० टन क्षमतेचे सायलो उपयुक्त ठरतील, असा अंदाज आहे. विविध शेतकरी उत्पादक कंपन्या, बाजार समित्यांमध्ये त्यांचा वापर होऊ शकतो.

(लेखक खासगी कंपनीमध्ये कार्यरत आहेत.)

इतर कृषी प्रक्रिया
शेतमाल प्रक्रियेसाठी सोपी यंत्रेभारतीय कृषी संशोधन परिषदेची ‘सिफेट’ ही अत्यंत...
प्रक्रियेपूर्वी तपासा दुधाची गुणवत्तादूध काढल्यानंतर दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण...
प्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रेप्रक्रिया उद्योगामध्ये विविध यंत्रांची आवश्यकता...
पाैष्टिक गुणवत्तेचे सोया दूधसोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने, २० टक्के तेल व...
सोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...
अर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...
मसाला प्रक्रिया उद्योगात अाहेत संधीमसाले व त्यावर आधारित प्रक्रियायुक्त पदार्थांना...
खरबूज प्रक्रियेत आहेत संधी...खरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने...
गिरणी उद्योगातून उभारला उत्पन्नाचा शाश्...जळगाव शहरातील पुष्पा विजय महाजन यांनी एका...
भोंगळेंचा शुद्ध नीरेचा ‘कल्पतरू' ब्रँडमाळीनगर (ता. माळशिरस, जि.सोलापूर) येथील नीलकंठ...
मका उत्पादनवाढ अन् प्रक्रियेलाही संधीमका उत्पादकता वाढीसाठी एकेरी संकरित, उशिरा पक्व...
उत्तम व्यवस्थापनातून बांबूपासून मिळते...गेल्या भागामध्ये आपण व्यावसायिक बांबू लागवड,...
शेवग्याच्या पानापासून पराठा, चहाआहारतज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या शेंगा व झाडाची...
प्रक्रिया उद्योगातून घेतली उभारीमुलांच्या शिक्षणासाठी औरंगाबाद शहरात स्थायिक...
पशुधनाला हवा भक्कम विमा महापूर, दुष्काळ, गारपीट, चक्री वादळे, वीज पडणे...
फणसाचा दुग्धजन्य पदार्थांमध्ये वापरफणसाच्या गऱ्यांना शहरी बाजारपेठेत मागणी आहे....
युवकाची 'वंडरफूल' डाळिंब ज्यूस निर्मितीसोलापूर येथील रविराज माने या तरुणाने बाजारपेठेतील...
केळी पदार्थांच्या निर्मितीतून कुटुंबाला...जळगाव शहरातील प्रियंका हर्षल नेवे यांनी पाककलेतील...
शेंगालाडू व्यवसायातून नीशाताईंना मिळाले...पंढरपुरात एकादशी तसेच अन्य दिवशी येणाऱ्या...
बेदाणा तारण कर्ज योजना ज्या बाजार समित्या बेदाणा या शेतीमालासाठी...