agriculturai stories in marathi, agrowon, nursery business growth in australia | Agrowon

ऑस्ट्रेलियात वाढतोय रोपवाटिका व्यवसाय
वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये रोपवाटिका आणि बागकाम उद्योगातून चांगला व्यवसाय होत आहे. त्यासंबंधीची माहिती नुकतीच ‘नर्सरी अॅण्ड गार्डन इंडस्ट्री ऑस्ट्रेलिया’ (NGIA) या संस्थेने प्रकाशित केली आहे. २०१५-१६ मध्ये या उद्योगामध्ये सुमारे २.२९ अब्ज डॉलरचा व्यवसाय झाल्याचे दिसून येते.

ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये रोपवाटिका आणि बागकाम उद्योगातून चांगला व्यवसाय होत आहे. त्यासंबंधीची माहिती नुकतीच ‘नर्सरी अॅण्ड गार्डन इंडस्ट्री ऑस्ट्रेलिया’ (NGIA) या संस्थेने प्रकाशित केली आहे. २०१५-१६ मध्ये या उद्योगामध्ये सुमारे २.२९ अब्ज डॉलरचा व्यवसाय झाल्याचे दिसून येते.

शेतीच्या दृष्टीने रोपवाटिका हा अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय असूनही त्यांच्या योगदानाविषयी फारशी माहिती उपलब्ध होत नाही. मात्र, ऑस्ट्रेलियातील नर्सरी अॅण्ड गार्डन इंडस्ट्री ऑस्ट्रेलिया (NGIA) या संस्थेने त्याबाबत केलेल्या सर्वेक्षणाची माहिती नुकतीच उघड केली आहे. त्याविषयी बोलताना हॉर्ट इनोव्हेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन लॉईड यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियातील अन्न, तंतुमय पदार्थ, वनस्पती उत्पादनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. शहरी बागकाम व्यवसायामध्येही उत्तम वाढ दर्शवत असून, फळे, भाज्या, वन उत्पादने आणि सुशोभीकरणाला चालना मिळत आहे.

  • २०० पेक्षा अधिक रोपवाटिकांना १.६ अब्जापेक्षा अधिक रोपांची विक्री केली.
  • संपूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये १७८० रोपवाटिका आणि बागकाम व्यावसायिक असून, त्यांच्याकडे २३ हजार लोकांना रोजगारही उपलब्ध होतो.
  • यामध्ये बाह्य वातावरणासाठी ६२२९ हेक्टर क्षेत्रावर, तर घरे किंवा कार्यालयामध्ये अंतर्गत सजावटीसाठी १२७३ हेक्टर क्षेत्रावर रोपांची निर्मिती केली जाते.

स्पष्टता येण्यास मदत ः
‘व्हिक्टोरियन ग्रोअर’चे हमीश मिटचेल हे प्रामुख्याने वनशेती किंवा मोठ्या झाडांच्या रोपांची निर्मिती करतात. त्यांची रोपवाटिका ही नरे वॅरन ईस्ट आहे. सर्वेक्षणातून पुढे आलेल्या गोष्टीबाबत समाधान व्यक्त करतानाच ऑस्ट्रेलियातील रोपवाटिका उद्योगाचे एकूण उद्योगक्षेत्रातील योगदान, रोजगाराची उपलब्धता आणि आकार याविषयी स्पष्टता येण्यास मदत झाल्याचे सांगितले. नव्या सुरू होत असलेल्या प्रकल्पाच्या उभारणी संदर्भात सुमारे २०० रोपवाटिकांनी सहभाग घेतला होता. यातून स्वतंत्र संशोधन सल्लागार, प्रत्यक्षातील संशोधनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...
मिरज पूर्व भागात पाण्यासाठी भटकंती सुरूच सांगली : म्हैसाळ योजनेचा उपसा सुरू होऊन महिना...
धुळ्यात हरभरा खरेदी केंद्रांची संख्या... धुळे  ः धुळे जिल्ह्यातही हरभरा व तुरीला...
येवल्यातून यंदा २८७३ टन द्राक्ष निर्यात येवला, जि. नाशिक : उन्हाळा आला की ५० वर गावांची...
फळबाग लागवडीकडे नाशिकमधील शेतकऱ्यांची... नाशिक : अस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेल्या...
अकोला जिल्ह्यातील कृषी विभागात १०६ पदे...अकोला : जिल्ह्यात कृषी विभागात शंभरावर विविध पदे...
यंदा पीक आणि पाऊस साधारण : भेंडवळच्या...भेंडवळ जि. बुलडाणा : या हंगामात पीक आणि पाऊस...
मराठवाड्यासाठी २० सौरऊर्जा प्रकल्पांना... लातूर ः मराठवाड्यातील विजेची गरज लक्षात घेऊन...
तयारी हळद लागवडीची...हळद लागवडीसाठी चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची...
सांगली जिल्ह्यात खंडित वीजपुरवठ्याने... सांगली  : कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी...