सुधारित पद्धतीने शिजवा हळद

हळद शिजवण्यासाठी सुधारीत तंत्र
हळद शिजवण्यासाठी सुधारीत तंत्र

पारंपरिक पद्धतीमध्ये हळद पाण्यात शिजवली जाई. पाण्याऐवजी वाफेचे तापमान हे अधिक जाऊ शकते. त्यामुळे कमी कालावधीमध्ये हळद शिजवण्यासाठी वाफेचा वापर उपयुक्त ठरतो. वाफेवर हळद शिजविणे ही सर्वात सुधारित पद्धत आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये हळद पाण्यामध्ये शिजविली जाते, तर या पद्धतीमध्ये हळद वाफेवर शिजवली जाते. या पद्धतीमध्ये ट्रॅक्‍टर ट्रॉलीच्या सांगाड्यावर २००० ते ३००० लिटर क्षमतेची पत्र्याची पाण्याची टाकी बसवलेली असते. टाकीच्या खालील बाजूस लोखंडी पाईपच्या सहाय्याने उष्णता देण्यासाठी जागा वाढवलेली असते. त्यामुळे पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणावर तयार होते. पाण्याच्या टाकीला दोन व्हॉल्व्ह ठेवले असतात. खालील व्हॉल्व्हपर्यंत कमीत कमी पाणी असावे तर वरील व्हॉल्व्हपर्यंत जास्तीत जास्त पाणी भरावे. वरील १० ते १२५ सें.मी. जागेमध्ये पाण्याची वाफ गोळा होते. ही वाफ पाइपच्या सहाय्याने हळदकंदांनी भरलेल्या ड्रममध्ये सोडली जाते. या पद्धतीमध्ये आवश्‍यकतेनुसार चार ड्रम (प्रति तास २ टन हळद शिजविण्यासाठी), दोन ड्रम (प्रति तास १ टन हळद शिजविण्यासाठी) यांचा वापर करता येतो. किंवा न हलवता येणारे दोन ड्रमचे संयंत्रही तयार करता येते.

वाफेवर हळद शिजविण्याचे फायदे ः

  • एका ड्रममध्ये २५० ते ३०० किलो हळद बसते.
  • ३ क्विंटल हळद शिजविण्यासाठी १५ ते २० मिनिटे लागतात.
  • कुशल मजुरांची गरज नसते. घरातील लोकही हे काम करू शकतात.
  • शेतकऱ्यांच्या आवश्‍यकतेनुसार या युनिटचे आकारमान वाढविता येते.
  • हळकुंड सुकण्यासाठी पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी कालावधी लागतो.
  • एक एकर क्षेत्रातील हळद एका दिवसात शिजवू शकतो.
  • हळद शिजलेली ओळखण्याची चाचणी

  • कच्च्या हळदीमधून आगपेटीतील काडी सहजासहजी घुसत नाही. मात्र शिजलेल्या हळदीमध्ये ती सहजासहजी घुसते.
  • हळकुंड चांगले शिजले असल्यास अंगठ्या शेजारील बोटाने दाब दिल्यास ते चिरडते.
  • शिजलेले हळकुंड मधोमध हळुवारपणे मोडल्यास बारीक तार दिसते.
  • हळद सुकविणे ः

  • हळदीच्या उत्तम गुणवत्ता आणि टिकाऊपणासाठी भिजवलेली हळद एकसारखी व चांगली वाळविणे आवश्‍यक असते. त्यासाठी खालील बाबींकडे लक्ष द्यावे.
  • हळद शिजवल्यानंतर सुकण्यासाठी टाकताना ५ सें.मी. पेक्षा जास्त थर देऊ नये. वाळत घातलेली हळकुंडे दोन ते तीन दिवसांनी हलवावीत.
  • हळद सुकवण्यासाठी शेडनेट किंवा जुन्या साड्यांचा वापर करावा. हळदीचे पाऊस, धुके, दव यांच्यापासून संरक्षण करावे.
  • हळद शिजविताना त्यामध्ये ७२ ते ७५ टक्के पाण्याचा अंश असतो, तो सुकलेल्या हळदीमध्ये ६ ते ८ टक्‍क्‍यांपर्यंत येईपर्यंत हळद सुकवावी.
  • हळद शिजवण्याच्या पद्धतीनुसार हळद सुकण्यासाठी बारा ते पंधरा दिवस लागतात.
  • संपर्क : डॉ. जितेंद्र कदम, ९८२२४४९७८९ (काढणीपश्‍चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था, रोहा, जि. रायगड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com