व्यवस्थापन सबसरफेस ठिबक सिंचन यंत्रणेचे...

व्यवस्थापन सबसरफेस ठिबक सिंचन यंत्रणेचे...
व्यवस्थापन सबसरफेस ठिबक सिंचन यंत्रणेचे...

सबसरफेस ठिबक यंत्रणेने अगदी काळजीपूर्वक पाण्याचे व्यवस्थापन, नियोजन करावे लागते. उसाच्या जवळील जमिनीतील ओलावा सातत्याने तपासावा. जमीन वाफसा अवस्थेत राहील इतकाच वेळ ठिबक संच सुरू ठेवावा. मेनलाइन आणि सबमेन लाइन दर १५ दिवसांनी फ्लॅश व्हॉल्व्ह उघडून फ्लॅश करावी. उसामध्ये जमिनीच्या खाली (सबसरफेस ड्रिप) ठिबक सिंचन वापरताना जमिनीच्या वर ज्या प्रमाणे काळजी घ्यावी लागते, तशीच जमिनीच्या खाली ठिबक वापरताना काळजी घ्यावी. जमिनीच्यावर ठिबक वापरापेक्षा अधिक काळजी सबसरफेसमध्ये घ्यावी लागते. कारण जमिनीवरील ठिबक चालविल्यानंतर जमिनीत ओल किती झाली ते दिसून येते. परंतु, सबसरफेसमध्ये ते लक्षात येत नाही. त्यामुळे यामध्ये ठिबक यंत्रणेने अगदी काळजीपूर्वक पाण्याचे व्यवस्थापन, नियोजन करावे लागते. उसाच्या जवळील जमिनीतील ओलावा सातत्याने तपासावा. जमीन वाफसा अवस्थेत राहील इतकाच वेळ ठिबक संच सुरू ठेवावा. ठिबकची इनलाइन नळी जमिनीत १५ सेंमी खोल आहे; आणि नळीच्या खाली ५ ते ७ सेंमी खोल उसाची लागवड केलेली असते हेसुद्धा लक्षात घ्यावे.

  • ऊस लागवडीवेळी मुख्य, दुय्यम, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा बेसल डोस देऊन तसेच जमिनीत पुरेशी ओल (लागवडी योग्य) आलेली बघूनच लागवडीस सुरवात करावी.
  • ऊस लागवडीसाठी उत्तम गुणवत्तेचे बेणे निवडावे. लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया महत्त्वाची आहे.
  • जमीन वाफसा अवस्थेत राहील, एवढाच वेळ ठिबक सिंचनाने पाणी द्यावे. जमिनीत जास्त ओल होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • ठिबक सिंचन वापरताना फिल्टरजवळ दीड ते दोन किलो आणि सबमेन जवळ १.०० किलो/ चौसेंमी दाब असावा.
  • लागवडीनंतर एक महिन्याने उसाची मुळे ठिबक सिंचनाच्या नळीतील ड्रिपरमध्ये जाऊ नये याची काळजी घ्यावी. तज्ज्ञांच्या सल्यानुसार ठिबक सिंचन यंत्रणेचे व्यवस्थापन ठेवावे.
  • ऊस पिकास ठिबकने नियमित सिंचन करावे. पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये. अन्यथा उसाची मुळे ड्रिपरमध्ये जाऊन ड्रिपरमधून पाणी येणे बंद होऊ शकते.
  • मेनलाइन आणि सबमेन लाइन दर १५ दिवसांनी फ्लॅश व्हॉल्व्ह उघडून फ्लॅश करावा.
  • ठिबकच्या इनलाइन नळ्या जमिनीत १५ सेंमी आत आहेत, तसेच नळ्यांच्या शेवटच्या टोकांना एंड कॅप नसून, नळ्यांची टोके कलेक्‍टिव्ह सबमेनला जोडली असल्यामुळे नळ्यांची टोके उघडता येणार नाही. या नळ्या फ्लश करण्यासाठी कलेक्‍टिव्ह सबमेनवरील फ्लश व्हॉल्व्हद्वारे नळ्या पाण्याने फ्लश करून घ्याव्यात.
  • तोडणीपूर्वी ऊस पिकास पाणी देणे बंद करावे.
  • उसाची तोडणी करताना शेतात ट्रॅक्‍टर कसाही फिरवू नये. ऊस गोळा करण्यासाठी ट्रॅक्‍टर शेताच्या बांधाच्या बाजूनेच न्यावा. शेतामध्ये उसासाठी ठिबकच्या नळ्या फक्त १५ सेंमी खोल बसविल्या आहेत, हे लक्षात ठेवावे. ठिबकच्या नळ्यांवरून ट्रॅक्‍टर जाणार नाही याची काळजी घ्यावी.
  • बी. डी. जडे ः ९४२२७७४९८१ (लेखक जैन इरिगेशन सिस्टिम, जळगाव येथे कार्यरत आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com