agriculturai stories in marathi, agrowon, technowon, cotton picking machine made by farmer, Nathubhai Wadher | Agrowon

नटूभाई वाढेर यांनी तयार केले कापूस वेचणी यंत्र
अनामिका डे, अलजुबैर सय्यद
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

देशात कपाशी लागवडीखाली मोठे लागवड क्षेत्र आहे. परंतु आजही कपाशीची वेचणी ही मजुरांच्याकडून केली जाते. त्यामुळे वेळही जास्त लागतो आणि मजुरी खर्चातही वाढ झाल्याने नफा कमी राहतो. कपाशी वेचणीसाठी परदेशात यंत्रे उपलब्ध आहेत, परंतु आपल्याकडील शेतकऱ्यांचे मर्यादित लागवड क्षेत्रामुळे शेतकऱ्यांना या यंत्रांचा वापर करणे शक्य नाही. यंत्राची किंमतही जास्त आहेत. कपाशी उत्पादकांची गरज लक्षात घेऊन नटूभाई वाढेर यांनी कपाशी वेचणीसाठी यंत्राची निर्मिती केली.

देशात कपाशी लागवडीखाली मोठे लागवड क्षेत्र आहे. परंतु आजही कपाशीची वेचणी ही मजुरांच्याकडून केली जाते. त्यामुळे वेळही जास्त लागतो आणि मजुरी खर्चातही वाढ झाल्याने नफा कमी राहतो. कपाशी वेचणीसाठी परदेशात यंत्रे उपलब्ध आहेत, परंतु आपल्याकडील शेतकऱ्यांचे मर्यादित लागवड क्षेत्रामुळे शेतकऱ्यांना या यंत्रांचा वापर करणे शक्य नाही. यंत्राची किंमतही जास्त आहेत. कपाशी उत्पादकांची गरज लक्षात घेऊन नटूभाई वाढेर यांनी कपाशी वेचणीसाठी यंत्राची निर्मिती केली.

गरजेतून मिळाली संशोधनाला चालना ः
नटूभाई रतूभाई वाढेर हे गुजरात राज्यातील प्रयोगशील कपाशी उत्पादक. नटूभाई यांची एरवाडा (ता. दसाडा, जि. सुरेंद्रनगर) गावशिवारात २४ एकर शेती आहे. दरवर्षी बहुतांश क्षेत्रावर ते कपाशीची लागवड करतात. गुजरातमधील भरूच, सुरेंद्रनगर, जुनागड, बनासकांठा, हारिज या भागांत कपाशीच्या ठराविक देशी जातीची प्रामुख्याने लागवड केली जाते. ही जात कमी पाण्यातही चांगले उत्पादन देते, तसेच एकाचवेळी कापूस वेचणीला येतो. त्यामुळे बहुतांश शेतकरी याच जातीची लागवड करतात. याचबरोबरीने बाजारपेठेच्या मागणीनुसार आणि उत्पादनानुसार इतर जातींचीही लागवड शेतकरी आता करू लागले आहेत. परंतु कापूस उत्पादकांची समस्या म्हणजे लागवड, व्यवस्थापन आणि वेचणीचा वाढता खर्च. वेचणीसाठी मजुरांची कमतरता असल्याने जादा दराने मजुरीदेऊन कपाशीची वेचणी करावी लागते. वेचणी करणारा मजूर अकुशल असेल तर बोंडामध्ये कापूस राहतो, त्यामुळे आर्थिक नुकसानीत वाढच होते. हे लक्षात घेऊन नटूभाई यांनी कापूस वेचणी यंत्र निर्मितीला सुरवात केली. साधारणपणे दहा वर्षांपासून विविध प्रयोग करून त्यांनी ट्रॅक्टरचलित कापूस वेचणी यंत्राची निर्मिती केली. या उपक्रमाला ग्यान संस्थेने तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य केले आहे.

कापूस वेचणी यंत्राची वैशिष्ट्ये ः

  • ट्रॅक्टरच्यापुढे हे कापूस वेचणी यंत्र लावले जाते. या यंत्रामध्ये उभ्या सळ्या आणि त्याला चक्राकार आकाराच्या पट्टा लावलेल्या आहेत. यंत्रामध्ये कपाशीचे झाड जाऊल असी जागा ठेवलेली आहे. यंत्र झाडाच्या ओळीतून चालू लागले, की यंत्रातील सळ्या आणि चक्राकार पात्यांच्या कंपनामुळे तयार कापसाचे बोंड यंत्रांच्या तळात पडते. यंत्रामध्ये असलेल्या दोन ब्लोअरच्या मदतीने हा कापूस ट्रॅक्टरच्या मागे बसवलेल्या साठवण टाकीत जातो.
  • ही संपूर्ण यंत्रणा चालवण्यासाठी एका मनुष्याची गरज असते.
  • यंत्राच्या साह्याने एका तासात दीड एकर क्षेत्रावरील कपाशीची वेचणी पूर्ण होते.
  • यंत्र हे ट्रॅक्टरचलीत आहे. प्रतितास एक लिटर डिझेल लागते.
  • यंत्राच्या मदतीने एका तासामध्ये ६०० किलो कापसाची वेचणी होते.
  • यंत्रामुळे मजूर आणि वेळेची बचत होते.
  • या यंत्रामध्ये अधिक संशोधन करून यंत्रामध्ये सुधारणा करण्याचा नटूभाईंचा प्रयत्न आहे.

संपर्क ः ०७९- २६७६९६८६
(ग्यान संस्था, अहमदाबाद, गुजरात)
 

फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
दर्जेदार शेती अवजारे निर्मितीत उंद्री...बुलडाणा जिल्ह्यातील उंद्री गावाने शेती उपयोगी...
पुनर्भरणाद्वारे साधली पाण्याच्या...हरियाना येथील कैठाल जिल्ह्यातील मुंद्री, गियोंग,...
अवजारांच्या वापरांमुळे महिलांचे कष्ट...महिलांचा शेती कामातील वाटा लक्षात घेता,...
बंधाऱ्यांची परिस्थिती अन् परिणामसध्या जलसंधारण म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर...
शेतीची कृत्रिम बुद्धिमत्तेकडे वाटचाल...इतिहासाच्या अभ्यासातून भविष्याचा अंदाज घेत...
योग्य प्रकारे ट्रॅक्‍टर चालवा, दुर्घटना...शेतमाल वाहतुकीचा मुख्य स्त्रोत ट्रॅक्‍टर आहे....
कडधान्यांपासून पोषक बेकरी उत्पादनेभारतीय आहारामध्ये प्रथिनाच्या पूर्ततेचे कार्य हे...
ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचालकाची कार्यक्षमता...ट्रॅक्टरसाठी उपग्रह मार्गदर्शक आणि प्रकाश कांडी...
तण नियंत्रणासाठी स्वयंचलित यंत्रणातणे पिकांसोबत पाणी, अन्नद्रव्ये आणि...
फळे, भाजीपाला वाळवणीसाठी ‘डोम ड्रायर’बाजारपेठेतील गुणवत्तापूर्ण उत्पादनांची मागणी...
गहू बीजोत्पादनातून साधली उद्योजकताशिक्षण कमी असतानाही सातत्यपूर्ण कष्ट आणि...
जमीन सुधारणेसाठी मोल नांगरभारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी...
टोमॅटोमध्ये आणता येईल तिखटपणामिरचीचा तिखटपणा त्यातील कॅपासिसीन या घटकांमुळे...
हळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलरकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची...
धान्यांच्या तात्पुरत्या साठवणीचे...अन्नधान्यांचे उत्पादन हे हंगामी होऊन साधारणपणे...
शून्य मशागत... नव्हे, निरंतर मशागतीची...कोणत्याही पिकापूर्वी मशागत झालीच पाहिजे, हा...
शेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत...औरंगाबाद : आपल्या कल्पकतेचा वापर करून देवगिरी...
गव्हाच्या काडाचा भुसा करण्यासाठी भुसा...राहिलेल्या काडापासून भुसा मिळवण्यासाठी भुसा...
पाणी बचत, दर्जेदार उत्पादनासाठी मल्चिंग...पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत...
शाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या...पुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार...