फोर्स्ड सर्क्युलेशन टाइप सोलर ड्रायर

फोर्स्ड सर्क्युलेशन टाइप सोलर ड्रायर
फोर्स्ड सर्क्युलेशन टाइप सोलर ड्रायर

फोर्स्ड सर्क्युलेशन टाइप सोलर ड्रायर हा अधिक कार्यक्षम आणि स्वस्त आहे. शेतमाल वाळवण्यासाठी ड्रायरचा वापर होतो. वाळविलेल्या उत्पादनाचा दर्जा, रंग आणि सुगंध टिकून राहतो. शेतमालाची जलद वाळवणी करणे हे या यंत्रणेचे महत्त्वाचे कार्य आहे. फोर्स्ड सर्क्युलेशन टाइप सोलर ड्रायर या उपकरणात विजेवर चालणारा ब्लोअर किंवा एक्झॉस्ट फॅन वापरला जातो. याचा वापर हवा तापवणारे यंत्र, टॅंक आणि वाळवण्याचा कक्ष यामधून हवा फिरवण्यासाठी केला जातो. हा ड्रायर अधिक कार्यक्षम आहे. एकाच वेळी अधिक प्रमाणात शेतमाल वाळवण्यासाठी हा ड्रायर फायदेशीर ठरतो. शेतमालाची जलद वाळवणी करणे हे या यंत्रणेचे महत्त्वाचे कार्य आहे.

वैशिष्ट्ये ः

  • हा ड्रायर कमी किंवा अधिक तापमानावर वापरता येतो.
  • बीन टाइप, टनेल टाइप , बेल्ट टाइप, कॉलम टाइप आणि रोटरी टाइप असे ड्रायरचे प्रकार आहेत.
  • उपकरणासोबत उष्णता साठवणारे यंत्र, उष्णतेसाठी साहाय्यकारी तंत्रदेखील वापरता येते.
  • उपकरणातून तयार होणारी ऊर्जा विद्युत उष्णतेद्वारे किंवा तेल व वायू ज्वलनापासून निर्माण होणाऱ्या उष्णतेद्वारा पुरवली जाते.
  • जेव्हा सोलर ड्रायर औष्णिक ऊर्जा पुरवण्यासाठी असमर्थ ठरेल, त्या वेळी या ऊर्जेचा वापर केला जातो.
  • उष्णता साठवण्यासाठी अनेक यंत्रणा वापरल्या जातात; परंतु सर्वांत अधिक पसंती ‘रॉक बेड स्टोअरेज सिस्टिम’ला दिली जाते. कारण हे उष्णता साठवणे आणि दळणवळण करणे या दोन्हींचे कार्य करते.
  • या यंत्रणेची किंमत साडेतीन हजार रुपये प्रति चौरस मीटर आहे.
  • विद्युतचलित हीटरच्या तुलनेत सोलर ड्रायरमध्ये वाळवल्याने ५० टक्क्यांपर्यंत आर्थिक फायदा होतो. पैशांची बचत होते.
  • कांदे, टोमॅटो, अळिंबी, तसेच सर्व प्रकारचा शेतमाल यामध्ये वाळविता येतो.
  • सोलर एअर हीटर, विद्युतचलित ब्लोअर, जोडणारे पाइप, वाळविण्यासाठी स्वतंत्र विभाग आणि नियंत्रण प्रणाली अशा घटकांचा समावेश आहे.
  • नियंत्रण प्रणालीद्वारा हवेचे तापमान आणि प्रमाण दोन्ही नियंत्रित केले जाते.
  • अधिक कार्यक्षम आणि स्वस्त.
  • अडचणीच्या वेळी आधार म्हणून विद्युतचलित किंवा जैविकभारचलित एअर हीटर उपलब्ध असतो. रात्रीच्या वेळीही वापर शक्य आहे.
  • शेतमाल वाळवण्यासाठी ड्रायरचा वापर होतो.
  • पॅक्ड सोलर हीटरची कार्यक्षमता ही औद्योगिक हीटरपेक्षा ४० टक्के अधिक
  • वाळविलेल्या उत्पादनाचा दर्जा, रंग आणि सुगंध टिकून राहतो.
  • संपर्क : डॉ. वैभवकुमार शिंदे, ९९६०९७५२७१ (सहायक प्राध्यापक, कृषी अभियांत्रिकी विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com