agriculturai stories in marathi, agrowon, technowon, get fast, accurate root zone moisture and EC data | Agrowon

एकाच उपकरणाद्वारे मिळू शकेल सिंचनासाठी आवश्यक माहिती
वृत्तसेवा
सोमवार, 25 डिसेंबर 2017

अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सेन्सरमध्येही मोठ्या प्रमाणात सुधारणा होत असून, त्यांची कार्यक्षमता वाढत आहे. इंग्लंड येथील डेल्टा टी डिव्हायसेस यांनी ‘वेट सेन्सर’ तयार केले आहेत. हे सेन्सर मातीतील आर्द्रतेचे प्रमाण, पाण्याची विद्युत वाहकता आणि तापमानाची नोंद घेऊ शकतात. या तीन निकषाद्वारेच शेतीतील सिंचन प्रक्रिया अत्यंत सोपी होणार आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सेन्सरमध्येही मोठ्या प्रमाणात सुधारणा होत असून, त्यांची कार्यक्षमता वाढत आहे. इंग्लंड येथील डेल्टा टी डिव्हायसेस यांनी ‘वेट सेन्सर’ तयार केले आहेत. हे सेन्सर मातीतील आर्द्रतेचे प्रमाण, पाण्याची विद्युत वाहकता आणि तापमानाची नोंद घेऊ शकतात. या तीन निकषाद्वारेच शेतीतील सिंचन प्रक्रिया अत्यंत सोपी होणार आहे.

सध्या काटेकोर पाणी व्यवस्थापनासाठी मातीतील पाण्याचे प्रमाण, तापमान आणि विद्युत वाहकता तपासण्यासाठी तीन वेगवेगळ्या उपकरणांचा वापर केला जातो. अलीकडे डिजिटल उपकरणे उपलब्ध असली तरी तीन उपकरणे हाताळावी लागतात. त्यावर मात करण्यासाठी इंग्लंड येथील डेल्टा टी डिव्हायसेस या कंपनीने एकाच उपकरणामध्ये तीनही सेन्सर बसवले आहे. त्याविषयी माहिती देताना कंपनीचे प्रवक्ते टोनी पेलॉय म्हणाले की, सिंचनाचा निर्णय घेण्यासाठी मातीतील पाण्याचे प्रमाण आणि त्याचा दर्जा अत्यंत महत्त्वाचा असतो. या विषयी अधिक काटेकोर माहिती उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना निर्णय घेणे सोपे होते. वास्तविक शेतीमध्ये प्रतिदिन अशा उपकरणाची आवश्यकता असली तरी वेळखाऊ आणि सदोष उपलब्ध तंत्रामुळे वापर फारसा होत नाही. त्यासाठी कंपनीने प्रत्यक्ष रिडींग दिसणाऱ्या व साठवता येणाऱ्या उपकरणाची निर्मिती केली आहे. ते सहज हाताळणीयोग्य असून, त्यातील माहिती नंतर संगणकामध्ये भरता येते.

हे उपकरण कसे काम करते, ते पहा....

  • वेट सेन्सरमध्ये धारदार, स्टेनलेस स्टिलचा रॉड असून, तो मातीमध्ये मुळांच्या कक्षेमध्ये खुपसता येतो. त्याद्वारे मातीतील तापमान, पाण्याची विद्युत वाहकता अत्यंत अचूकतेने मोजता येते.
  • एकाच उपकरणाद्वारे विविध तीन प्रकारची माहिती उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांनी तीन वेगळी उपकरणे घ्यावी लागत नाहीत.
  • वेट सेन्सर हे मातीसह कॉयर, पीट, मिनरल वूल यामध्येही वापरता येते. या माध्यमानुसार त्यात पाच प्रकारचे कॅलिब्रेशन करता येतात.
  • पिकाच्या हंगामामध्ये प्रति दिन शेकडो नोंदी घेणे व साठवून ठेवणे शक्य असल्याने वेट सेन्सर हे उत्तम व्यवस्थापन साधन ठरते. अचूक नोंदींमुळे पिकाचा दर्जा आणि उत्पादनामध्ये वाढ शक्य होत असल्याचे टोनी पेलॉय यांनी सांगितले.

 

इतर टेक्नोवन
खरबूज प्रक्रियेत आहेत संधी...खरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने...
जलशुद्धीकरणासाठी सूर्यप्रकाशावर आधारीत...सूर्यप्रकाशाच्या साह्याने पाण्याचे शुद्धीकरण...
उपकरण देईल आजारी जनावराची पूर्व सूचनाएसएनडीटी विद्यापीठाच्या मुंबईमधील प्रेमलीला...
शालेय विद्यार्थी झाले कृषी संशोधकजळगावात जैन हिल्स येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘...
साठवणुकीसाठी प्री फॅब्रिकेटेड गोदाम,...शेतमालाची योग्य गुणवत्ता जपण्यासाठी योग्य साठवणूक...
दिवस-रात्रीच्या तापमान फरकातूनही मिळवता...कमाल आणि किमान तापमानातील बदलाद्वारे विद्युत...
पवनचक्क्यांची झीज कमी करणारे नवे...वातावरणातील विविध घटकांचा परिणाम होऊन...
शहरात व्हर्टिकल फार्मिंग रुजवण्यासाठी...कॅनडामधील लोकल ग्रोस सलाड या स्वयंसेवी संस्थेने...
हवेच्या शुद्धीकरणासाठीही इनडोअर वनस्पती...वाढत्या शहरीकरणासोबतच प्रदूषणाची समस्याही वेगाने...
आंब्यावरील प्रक्रिया अन् साठवणआंबा हा कच्च्या आणि पिकलेल्या दोन्ही स्वरुपामध्ये...
संजयभाई टिलवा यांनी तयार केले...भुईमुगाच्या शेंगा जमिनीतून काढणीसाठी मजूर मोठ्या...
शेवाळाची शेती हेच ठरेल भविष्यभविष्यामध्ये आहार, जैव इंधन, जागतिक पातळीवरील...
सेन्सर छोटे, कार्य मोठे!इटली येथील युनिव्हर्सिटी ऑफ बारो अल्दो मोरोमधील...
आंबा रस आटविण्यासाठी गॅसिफायरकोकणात अजूनही आंबा आटवण्यासाठी चुलीमध्ये लाकडाचा...
कलिंगडापासून विविध पदार्थनिर्मितीउन्हाळ्यामध्ये कलिंगड हे फळ उत्तम मानले जाते....
योग्य पद्धतीने होईल खेकड्यांचे फॅटनिंगखेकड्यांचे फॅटनिंग करण्यासाठी तलावातील संवर्धन,...
सेन्सरद्वारे तापमान, आर्द्रता, कार्बन...काटेकोर शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
कल्पनेतून केली अडचणींवर मातजगभरात शेतकरी आपली दैनंदिन कार्य करीत असताना अनेक...
परागीकरण करणारा रोबोजगभरात फळांची मागणी वाढत असल्याने विविध देशांत...
हळकुंडावरील प्रक्रियेसाठी यंत्रेकोणत्याही भारतीय स्वयंपाकामध्ये हळदीचा वापर होत...