agriculturai stories in marathi, agrowon, Technowon, new Jaivaik Bharat logo for organic products | Agrowon

सेंद्रिय उत्पादनासाठी ‘जैविक भारत’ लोगो बंधनकारक
वृत्तसेवा
सोमवार, 25 डिसेंबर 2017

सध्या मांसाहारी आणि शाकाहारी अन्नपदार्थांच्या पॅकेटवर अनुक्रमे लाल आणि हिरवा ठिपका हे चिन्ह असणे बंधनकारक आहे. मात्र, त्यातून तो पदार्थ सेंद्रिय आहे की नाही, ते समजत नाही. ते स्पष्टपणे समजण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाणीकरण प्राधिकरण (FSSAI) या संस्थेने जैविक भारत हा लोगो तयार केला आहे. यापुढे सेंद्रिय उत्पादनाच्या विक्रीसाठी हा लोगो मिळवणे व छापणे बंधनकारक असणार आहे.

सध्या मांसाहारी आणि शाकाहारी अन्नपदार्थांच्या पॅकेटवर अनुक्रमे लाल आणि हिरवा ठिपका हे चिन्ह असणे बंधनकारक आहे. मात्र, त्यातून तो पदार्थ सेंद्रिय आहे की नाही, ते समजत नाही. ते स्पष्टपणे समजण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाणीकरण प्राधिकरण (FSSAI) या संस्थेने जैविक भारत हा लोगो तयार केला आहे. यापुढे सेंद्रिय उत्पादनाच्या विक्रीसाठी हा लोगो मिळवणे व छापणे बंधनकारक असणार आहे.

आरोग्याविषयी जागरुकता वाढत असल्याने ग्राहकांची सेंद्रिय उत्पादनांना मागणीही वाढत आहे. मात्र, सेंद्रिय उत्पादने वेगळी लक्षात येण्यासाठी कोणतीही तरतूद नसल्याने ग्राहकांची अडचण होते. हे टाळण्यासाठी भारतीय शासनाने पुढाकार घेतला असून, भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाणीकरण प्राधिकरण (एफएसएसएआय) या अधिकृत संस्थेने त्याचा खास लोगो तयार केला आहे. येथून पुढे सेंद्रिय पदार्थांच्या विक्रीसाठी हा लोगो बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, वितरकांचा परवाना आणि नोंदणी रद्द करण्यात येईल. बाजारपेठेमध्ये खोटी सेंद्रिय उत्पादने असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असल्याने संस्थेने हा निर्णय घेतला आहे.

हा लोगो मिळवण्यासाठी सेंद्रिय शेतीचे सर्व निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. संस्थेचे उपसंचालक व्ही. के. पांचाल यांनी सांगितले, की सेंद्रिय उत्पादनांच्या प्रमाणिकरण करणाऱ्या ‘नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑरगॅनिक प्रोडक्शन’ (एनपीओपी) आणि ‘पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टिम फॉर इंडिया’ (पीजीएस -इंडिया) या दोन यंत्रणा आहेत. त्या उत्पादक आणि वितरकांना प्रमाणपत्र देतात. या नव्या लोगोमुळे ग्राहकांना सेंद्रिय उत्पादन ओळखणे सोपे होणार आहे.

सेंद्रिय उत्पादनांची विक्री करणाऱ्या व्यक्ती किंवा कंपनीला या दोन्ही संस्थांकडून प्रमाणपत्र मिळवावे लागेल. त्यानंतर हे प्रमाणपत्र एफएसएसएआयकडे देऊन लोगो उत्पादनावर छापण्याची परवानगी मिळवावी लागेल. पॅकेजिंग व लेबलिंगच्या २०११ च्या नियमानुसार अन्य बाबीही नोंदवणे बंधनकारक असेल. सेंद्रिय उत्पादनांची विक्री या लोगोशिवाय करणाऱ्या उत्पादकांची तक्रार ग्राहकांना एफएसएसएआय संस्थेकडे करता येईल.

असा असेल लोगो
हिरव्या वर्तुळामध्ये झाडाचे पान व त्यावर बरोबरची खूण असे या लोगोचे स्वरुप आहे. त्यातील वर्तुळ हे जागतिक निर्मळ चांगुलपणाचे, तर झाडाचे पान हे निसर्गाचे आणि बरोबरचे चिन्ह हे संस्थेने प्रमाणित केल्याचे सुचवत असल्याचे एफएसएसएआयच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

शेतीपद्धतीमध्ये हे बदल अपेक्षित

  • शेतजमिनीचे रासायनिक कीटकनाशके आणि तणनाशक मुक्त अशा सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक.
  • शेतीमध्ये वापरले जाणारा प्रत्येक घटक किंवा निविष्ठा या नैसर्गिक असाव्यात.
  • जनुकीय सुधारित निविष्ठा किंवा विकिरण तंत्राचा वापर केलेले घटक वापरू नयेत.
  • भौतिक, जैविक आणि यांत्रिक घटकांच्या एकात्मिक वापर संपूर्ण शेतीमध्ये आवश्यक.
  • शेजारच्या किंवा अन्य कोणत्याही प्रकारे प्रदूषण होण्याची शक्यता नसावी.
  • शाश्वत शेती पद्धतीचा शेतीमध्ये वापर करणे बंधनकारक.

इतर टेक्नोवन
पोल्ट्री वेस्टपासून बायोगॅस निर्मितीभारतात दरवर्षी २८ ते ३० दशलक्ष टन इतकी...
माशांतील प्रदूषणकारी घटक ओळखण्यासाठी...ताज्या माशांमध्ये होणारी भेसळ त्वरीत ओळखण्यासाठी...
फुलांच्या पाकळ्यांचे प्रकियायुक्त पदार्थअत्यंत नाजूक, सुगंधी असलेल्या फुलांच्या...
रोबोटिक तणनियंत्रण पकडतेय वेगजगभरातील संशोधन संस्था आणि कंपन्यांमध्ये सुरू आहे...
पदार्थांची गुणवत्ता टिकवणारा सोलर ड्रायरअकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
दुग्ध व्यवसायासाठी सौरऊर्जा तंत्रज्ञानपारंपरिक ऊर्जेला अंशतः किंवा पूर्ण पर्याय म्हणून...
शहरी भागात रूजतेय व्हर्टिकल फार्मिंगकॅनडामधील एका कंपनीने शहरी लोकांची बाग कामाची आवड...
नव संशोधनाला देऊया चालना...अडचणींवर मात करण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही...
श्रम, मजुरी, वेळ, पैसा वाचविणाऱ्या...नगर जिल्ह्यातील टाकळी मिया येथील प्रसाद देशमुख व...
यंत्र सांगेल तुमच्या सोन्याची शुद्धता !बॅंकेमध्ये नव्याने आलेल्.या सोन्याची शुद्धता...
तंत्रज्ञानातूनच अंकुरतील कृषी...तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात परिवर्तन आणले असून,...
सेंद्रिय उत्पादनासाठी ‘जैविक भारत’ लोगो...सध्या मांसाहारी आणि शाकाहारी अन्नपदार्थांच्या...
एकाच उपकरणाद्वारे मिळू शकेल सिंचनासाठी...अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सेन्सरमध्येही मोठ्या...
फोर्स्ड सर्क्युलेशन टाइप सोलर ड्रायरफोर्स्ड सर्क्युलेशन टाइप सोलर ड्रायर हा अधिक...
तंत्र कोळसा उत्पादनाचे...कार्बनच्या प्रमाणावर कोळशाचे औष्णिक मूल्य ठरते....
छोट्या छोट्या तंत्रांनी शेती झाली सुलभ शेतीसमोरील प्रश्‍न वाढत असतानाच नवे तंत्रज्ञान...
बटाट्यातील शर्करेचे प्रमाण तपासण्याची...सिमला येथील केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेने...
अवघ्या ३०० रुपयांत बनविले हरभरा शेंडे...एक एकर हरभरा खुडणीसाठी पाच ते सहा मजुरांची...
अननसाच्या टाकाऊ सालीपासून पर्यावरणपूरक...अननस खाल्ल्यानंतर त्याची साल सहसा फेकून दिली जाते...
उष्ण हवेसाठी वापरा ‘सोलर एयर हिटर`सोलर एयर हिटर यंत्रमेमुळे सर्वसाधारण तापमानाच्या...