agriculturai stories in marathi, agrowon, technowon, rotating lamp for protection of crop | Agrowon

फिरत्या दिव्याने रोखली रानडुकरे!
गोपाल हागे
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

वन्यप्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत असले तरी तुलनेने योग्य नुकसानभरपाई कधीच मिळत नाही. वन्यप्राण्यांना त्यातही रानडुकरांना प्रतिबंध करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील चितलवाडी (ता. तेल्हारा) येथील विजय इंगळे यांनी नामी उपाय शोधला आहे. केवळ सातशे रुपये खर्चामध्ये फिरत्या तेजस्वी दिव्याच्या साह्याने पिकाचे संरक्षण करण्यात यश मिळवले आहे.

वन्यप्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत असले तरी तुलनेने योग्य नुकसानभरपाई कधीच मिळत नाही. वन्यप्राण्यांना त्यातही रानडुकरांना प्रतिबंध करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील चितलवाडी (ता. तेल्हारा) येथील विजय इंगळे यांनी नामी उपाय शोधला आहे. केवळ सातशे रुपये खर्चामध्ये फिरत्या तेजस्वी दिव्याच्या साह्याने पिकाचे संरक्षण करण्यात यश मिळवले आहे.

जंगल परीसरामध्ये असलेल्या शेतकऱ्यांना प्रामुख्याने वन्य प्राण्यांमुळे नुकसान सोसावे लागते. चितलवाडी (ता. तेल्हारा, जि. अकोला) या भागामध्ये रानडुकरांची प्रचंड दहशत आहे. त्यांच्या त्रासामध्ये हाता-तोंडाशी अालेले पीक नष्ट होते. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पाणी देण्यासह अन्य कामे करता येत नाहीत. त्यातच वन्यप्राणी कायद्यामुळे संरक्षित असल्याने त्यांना प्रतिबंध कसा करावा हीच शेतकऱ्यांसमोर प्रमुख समस्या बनली आहे. या गावातील प्रयोगशील शेतकरी विजय इंगळे यांचीही शेती ही सातपुड्याला लागून असलेल्या भागात अाहे. या भागात शेतीला वन्यप्राण्यांचा प्रचंड त्रास होतो. पिकाला जपण्यासाठी मोठा खर्च येतो. रात्र रात्र जागरण करावे लागते. शेतामध्ये एकट्या दुकट्या शेतकऱ्यांवरही वन्यप्राण्यांकडून हल्ला होण्याची भीती असते. अनेक शेतकरी फोरेट या उग्र गंध असलेल्या दाणेदार कीटकनाशकांचा वापर करून वन्यप्राण्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अलीकडे त्यालाही रानडुकरे जुमानत नसल्याचे दिसून आले आहे. या समस्येवर मात करण्यासाठी विजय इंगळे यांनी उत्तम उपाय शोधला आहे.

असा आहे उपाय ः

  • तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील एका कारागीराच्या मदतीने विजय इंगळे यांनी फिरणारा व तीव्र प्रकाश फेकणारा लाइट तयार करून घेतला. याला ऊर्जा पुरवण्यासाठी सहा व्हॅट क्षमतेच्या बॅटरीचा वापर केला आहे. या बॅटरी दिवसभर चार्ज केल्यास रात्रभर दिवा कार्यरत राहतो. या साऱ्यासाठी अवघे सातशे रुपये खर्च आला.
  • शेताच्या मध्यभागी हा लाइट लावल्यास सुमारे सहा एकरांपर्यंत लखलखीत प्रकाश पडतो. एलईएडी लाइटचा प्रकाश हा डोळे दिपवणारा असल्याने डुकरे येत नसल्याचा अनुभव आहे.
  • असे तीन लाइट बनवून घेतले असून, रब्बीत लागवड केलेल्या हरभरा, मका पिकांमध्ये त्यांचा वापर केला आहे. त्याचा चांगला फायदा होत असल्याचे विजय इंगळे यांनी सांगितले.

संपर्क ः विजय इंगळे, ९६०४०५६९४४

इतर टेक्नोवन
ट्रॅक्टरचलित न्युमॅटिक प्लॅंन्टरउच्च गुणवत्तेच्या बियाण्यांचा वापर केल्याने...
दर्जेदार शेती अवजारे निर्मितीत उंद्री...बुलडाणा जिल्ह्यातील उंद्री गावाने शेती उपयोगी...
पुनर्भरणाद्वारे साधली पाण्याच्या...हरियाना येथील कैठाल जिल्ह्यातील मुंद्री, गियोंग,...
अवजारांच्या वापरांमुळे महिलांचे कष्ट...महिलांचा शेती कामातील वाटा लक्षात घेता,...
बंधाऱ्यांची परिस्थिती अन् परिणामसध्या जलसंधारण म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर...
शेतीची कृत्रिम बुद्धिमत्तेकडे वाटचाल...इतिहासाच्या अभ्यासातून भविष्याचा अंदाज घेत...
योग्य प्रकारे ट्रॅक्‍टर चालवा, दुर्घटना...शेतमाल वाहतुकीचा मुख्य स्त्रोत ट्रॅक्‍टर आहे....
कडधान्यांपासून पोषक बेकरी उत्पादनेभारतीय आहारामध्ये प्रथिनाच्या पूर्ततेचे कार्य हे...
ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचालकाची कार्यक्षमता...ट्रॅक्टरसाठी उपग्रह मार्गदर्शक आणि प्रकाश कांडी...
तण नियंत्रणासाठी स्वयंचलित यंत्रणातणे पिकांसोबत पाणी, अन्नद्रव्ये आणि...
फळे, भाजीपाला वाळवणीसाठी ‘डोम ड्रायर’बाजारपेठेतील गुणवत्तापूर्ण उत्पादनांची मागणी...
गहू बीजोत्पादनातून साधली उद्योजकताशिक्षण कमी असतानाही सातत्यपूर्ण कष्ट आणि...
जमीन सुधारणेसाठी मोल नांगरभारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी...
टोमॅटोमध्ये आणता येईल तिखटपणामिरचीचा तिखटपणा त्यातील कॅपासिसीन या घटकांमुळे...
हळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलरकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची...
धान्यांच्या तात्पुरत्या साठवणीचे...अन्नधान्यांचे उत्पादन हे हंगामी होऊन साधारणपणे...
शून्य मशागत... नव्हे, निरंतर मशागतीची...कोणत्याही पिकापूर्वी मशागत झालीच पाहिजे, हा...
शेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत...औरंगाबाद : आपल्या कल्पकतेचा वापर करून देवगिरी...
गव्हाच्या काडाचा भुसा करण्यासाठी भुसा...राहिलेल्या काडापासून भुसा मिळवण्यासाठी भुसा...
पाणी बचत, दर्जेदार उत्पादनासाठी मल्चिंग...पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत...