हळद बॉयलर सयंत्रातून मिळाला उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत

हळद बॉयलर सयंत्रातून मिळाला उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत
हळद बॉयलर सयंत्रातून मिळाला उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत

भातउत्पादक म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात अलीकडे हळद लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. यातून हळद शिजवणीसह पुढील प्रक्रिया करण्याला मोठ्या संधी आहेत. त्याचा फायदा घेत जुनोना (ता. पवनी) येथील मुरलीधर वंजारी यांनी हळद शिजवण्यासाठी खास सयंत्र तयार केले आहे. हे बैलगाडीवर बसवले असून, परिसरातील शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर देत अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत तयार झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील जुनोना (ता. पवनी) येथील मुरलीधर वंजारी कुटुंबीयांकडे चार एकर शेती आहे. वडिलापासून पारंपरिक धान (भात) आणि त्यानंतर हरभरा ही पिके घेतली जात. मात्र, या परिसरात भिवापूर (जि. नागपूर) भागातील शेतकऱ्यांनी शेती भाडेतत्त्वावर घेत हळद लागवड सुरू केली. मुरलीधर यांचे सासरे गोविंद आष्टणकर (भिसी, ता. चिमूर) यांच्याकडेही हळद पीक होते. 12 वर्षांपूर्वी मुरलीधर यांनी सासऱ्यांकडून बेणे घेत अर्धा एकरवर लागवड केली. त्यात टप्प्याटप्प्याने वाढ करत आता हळद दोन एकरापर्यंत पोचले आहे. जुनोना, भेंडळ, वडेगाव या तीन गावांमध्ये आज हळदीखाली एकूण क्षेत्र दीडशे एकर आहे. तंत्रज्ञानाचा झाला अंतर्भाव थेट जमिनीवरील लागवडीऐवजी रुंद वरंबा-सरी तंत्राने लागवड होते. यामुळे पाण्याचा निचरा उत्तम होऊन, पीक चांगले पोसते. पूर्वी एकरी 9 ते 10 क्‍विंटल उत्पादन होई. अलीकडे नव्या तंत्रामुळे 12 ते 17 क्‍विंटल एकरी उत्पादन मिळत असल्याचे मुरलीधर यांनी सांगितले. बॉयलर केले तयार ः

  • हळद शिजवण्यासाठी घरगुती 200 लिटर क्षमतेच्या लोखंडी टाकी कापून सयंत्र मुरलीधर यांनी तयार केले. मात्र, त्यातून ऊर्जा वाया जात असल्याने जळण अधिक लागे. उष्णता बाहेर वाया जाऊ नये, यासाठी सुधारणा करण्याचा निर्णय घेतला.
  • 500 लिटर क्षमतेची टाकी खास तयार करून घेत, त्यात उष्णता टिकवण्यासाठी ग्लासवुलचा वापर करण्याची सोय करून घेतली. यात सुमारे 43 किलो ग्लासवुलचा वापरला. ग्लासवुल 110 रुपये किलोप्रमाणे मिळाला. टाकीचे वजन पाच क्‍विंटल भरते.
  • या टाकीत 20 लोखंडी पाइप उभे केले आहेत. ते पाईप गरम झाल्यानंतर पाणी गरम होते. या पाण्याच्या वाफेवर हळद शिजवली जाते. या पाण्याच्या टाकीतून दोन पाइप काढून ते अतिरिक्‍त दोन लोखंडी ड्रमला जोडले आहेत.
  • या संरचनेमुळे कार्यक्षमता वाढली आहे. हे सयंत्र बैलगाडीवर बसवले असल्याने शेतापर्यंत नेणे सोयीचे ठरते. सयंत्र निर्मितीसाठी एक लाख 45 हजार रुपयांचा खर्च झाल्याचे मुरलीधर वंजारी यांनी सांगितले.
  • अशी आहे सयंत्राची क्षमता

  • प्रतिदिन (आठ तासांमध्ये) 40 ड्रम हळद शिजवता येते. एका ड्रममध्ये 150 किलो या प्रमाणे 6 हजार क्‍विंटल हळद शिजवता येते.
  • साधारणतः 32 ड्रम हळद वाफेवर उकळल्यानंतर टाकीतील पाणी संपते. त्यामुळे 30 ड्रम झाल्यानंतर व्हॉल्वद्वारे टाकीतील उपलब्ध पाणी तपासले जाते.
  • इंधन म्हणून शेतीतील टाकाऊ घटकांचा वापर करता येतो.
  • परिसरामध्ये या सयंत्राला मागणी ः परिसरातील हळद उत्पादकांकडून मुरलीधर वंजारी यांच्या मोबाईल बॉयलर सयंत्राला हंगामात चांगली मागणी राहते. प्रतिदिवस 1 हजार रुपये याप्रमाणे भाडे आकारले जाते. अतिरिक्‍त मजूर आवश्‍यक असल्यास 300 रुपये प्रमाणे पुरवले जातात. आत्मा मधून मिळाले अनुदान

  • वंजारी यांनी गावातील तेराजणांसह संताजी कृषी स्वयंसहाय्यता समूह स्थापन केला आहे. यातून त्यांनी सयंत्र तयार करण्यासाठी 15 हजार रुपयांचे कर्ज घेतले.
  • वंजारी यांच्या प्रयोगशीलता व कल्पकतेला प्रोत्साहन म्हणून आत्मा यंत्रणेच्या वतीने 40 हजार रुपयांचे अनुदान दिले. त्यासाठी आत्माचे प्रकल्प संचालक के.बी. तरकसे, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे योगेश खिराडे यांनी पुढाकार घेतल्याचे वंजारी सांगतात.
  • संपर्क ः मुरलीधर वंजारी, 9172474660

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com