agriculturai stories in marathi, agrowon, types of soil granuales | Agrowon

मातीच्या कणांची रचना ठरते पीकवाढीसाठी महत्त्वाची
डॉ. मेहराज शेख
शनिवार, 2 डिसेंबर 2017

मातीचे भौतिक गुणधर्म, कणांची रचना व त्यांच्या परस्पर संबंधामुळे जमिनीचे गुणधर्म ठरत असतात. या कणांच्या रचनांमुळे मातीतील पाण्याचे वहन, हवा खेळण्याचे व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण ठरत असते. या घटकांच्या पिकांच्या वाढीवर चांगले किंवा वाईट परिणाम होतात.

मातीचे भौतिक गुणधर्म, कणांची रचना व त्यांच्या परस्पर संबंधामुळे जमिनीचे गुणधर्म ठरत असतात. या कणांच्या रचनांमुळे मातीतील पाण्याचे वहन, हवा खेळण्याचे व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण ठरत असते. या घटकांच्या पिकांच्या वाढीवर चांगले किंवा वाईट परिणाम होतात.

जमिनीच्या रचनेमध्ये कणांचे एकमेकांशी असलेले संबंध महत्त्‍वाचे असतात. मातीच्या कणांच्या एकत्रीकरणातून मातीचे संच (स्थानिक भाषेमध्ये ढेकळे) तयार होतात. या ढेकळांचे आकार आणि प्रकारानुसार त्यातून होणाऱ्या पाण्याच्या प्रवाहांचा वेग ठरतो. पाण्याच्या आंतरप्रवाहात पाण्याचा खाली जाण्याचा वेग (इनफिल्टरेशन), आजूबाजूला पसरण्याचा वेग (परक्युलेशन) यांचा समावेश असतो.

सर्वसाधारणपणे जमिनीची रचना सहा प्रकारची असते.

 1. ग्रॅन्युलार (सुपारीपेक्षा लहान आकाराचे मातीचे संच (ढेकूळ) वेगळे असतात.)
 2. सब अँग्युलार ब्लॉकी (ढेकूळ फोडल्यास त्याला कोन किंवा कडा दिसतात.)
 3. कोरस अँग्युलार ब्लॉकी (ढेकूळ फोडल्यास त्याला तीव्र कोन दिसतात)
 4. प्रीझमॅटिक (काचेच्या त्रिकोणाकृती लोलकाप्रमाणे उभ्या व अनेक बाजूने कडा असतात.)
 5. कॉल्युमिनार (उभ्या कॉलमप्रमाणे उंच कडा असतात.)
 6. प्लेटी (आडवे एकावर एक थर असतात.)

वरील सर्व प्रकारच्या जमिनीच्या रचनेच्या प्रकाराच्या पिकांच्या लागवडीच्या दृष्टीने विचार केल्यास त्यात छोटे भेद आहेत. उदा. रोपवाटिकेसाठी ग्रॅन्युलार प्रकारची रचना उत्कृष्ट असते. मात्र, हीच रचना मुख्य पिकासाठी योग्य नाही. आपल्या महाराष्ट्रात ब्लॅक कॉटन जमिनीत मात्र सब अँग्युलर, अँग्युलर ब्लॉकी अशा रचना जास्त सापडतात. त्यानंतर कॉल्युमिनार व प्रीझमॅटिक रचना बेसाल्ट प्लेटच्या मूळ खडकापासून तयार झालेल्या जमिनीमध्ये सापडतात.

ज्या जमिनीमध्ये कर्बाचे प्रमाण जास्त असेल (साधारणः ०.६ ते १.० पर्यंत) व रचना कॉल्युमिनार, प्रीझमॅटिक असल्यास त्यात मोठ्या पोकळ्या किंवा सच्छिद्रता (मॅक्रोपोअर्स) आणि सूक्ष्म पोकळ्या (मायक्रोपोअर्स) जास्त प्रमाणात असतात.
जमिनीच्या मोठ्या सच्छिद्रामध्ये जिवाणूचे घर असते. त्यात पिकांच्या मुळांसाठी प्रवेश करणे कमालीचे सोपे असते. अशा जमिनीत पाणी व अन्नद्रव्याची उपलब्धता चांगली होत असल्याने वनस्पतीची वाढ जोमाने होऊ शकते. या पिकांची पाने जास्तीत जास्त प्रकाशसंश्‍लेषण करतात. या विपरीत परिस्थिती असल्यास वनस्पती संप्रेरकाद्वारे संदेश देऊन स्वतःची वाढ नियंत्रित करतात. परिणामी पिकाच्या उत्पादनात घट येते.

मातीच्या कणांवर परिणाम करणारे घटक ः

 • अलीकडे मोठ्या ट्रॅक्टर व यंत्रांमुळे खोलवर मशागत होऊ लागली आहे. जमिनीच्या नैसर्गिक रचनांमध्ये माणसाने शेतीसाठी केलेल्या मशागतीमध्ये बदल झाले आहेत. अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशातही गेल्या तीन दशकांमध्ये आलेल्या धुळींच्या वादळामुळे शून्य मशागत पद्धती किंवा किमान मशागत पद्धतींकडे कल वाढत आहे. एकाच क्षेत्रातील दहा वर्षे शून्य मशागतीखाली असलेल्या शेतीतील मातीचे ढेकूळ आणि दरवर्षी मशागत होत असलेल्या शेतातील मातीचे ढेकूळ यांतील फरक स्पष्टपणे दिसून येतो. आपल्याकडेही धुळीचे प्रमाण वाढत असून, या पद्धतींचा प्रसार होण्याची गरज आहे.
 • जमिनीतील कणांच्या संचांची घनता (ब्लॉक डेन्सिटी) व कर्बाची उपलब्धता ही जमिनीच्या आरोग्यावर दीर्घकाळासाठी परिणामकारक ठरते. जमिनीच्या कणांची घनता १.१ ते १.३ मिलिग्रॅम प्रतिघनमीटर असल्यास ती अतिशय उत्तम मानली जाते. जमिनीतील कर्बाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले. सातत्याने तीनही हंगामांमध्ये विश्रांती दिल्याविना घेतल्या जाणाऱ्या पिकांमुळे त्यात घट होत आहे.
 • अधिक उत्पादनक्षम संकरित पीक जातींमुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा उपसा वाढला आहे. त्या तुलनेत अन्नद्रव्यांचा भरणा होत नाही. रासायनिक घटकांमुळे त्याची त्वरित पूर्तता होत असली, तरी सेंद्रिय कर्ब मिळण्यासाठी कंपोस्टखत, शेणखत व पिकांच्या अवशेषांचा पुनर्वापर याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
 • जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण १.० पेक्षा जास्त असलेल्या जमिनी उत्तम, तर त्यापेक्षा कमी (०.५ ते ०.९ पर्यंत) असल्यास मध्यम व चांगल्या मानल्या जातात. मात्र, ०.५ पेक्षा कमी सेंद्रिय कर्ब असलेल्या जमिनीचे आरोग्य धोक्‍यात येणार असल्याचे समजावे.
 • नैसर्गिक संरचना असलेली, उत्तम कर्ब असलेली, जल व वायू धारण क्षमता असलेली, सूक्ष्मजीवांचे अधिक प्रमाण असलेली जमीन उत्तम मानली जाते.

संपर्क ः डॉ. मेहराज शेख, ९९७०३८७२०४

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...
...कृत्रिम पावसाचीही तयारी !सोलापूर  : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...
आरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...
राज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...
शेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर  : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...
अंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली  : वाढती उष्णतेची झळ...
व्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक  : अंदरसूल येथील कांदा...
'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर  ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...
दुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर  : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...
चंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर  ः काजूच्या...
पुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे  ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...
नांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड :  नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर  : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...
उभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...
‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...
हिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली  : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
भाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...