agriculturai stories in marathi, agrowon,sugarcane stem borrer | Agrowon

उसातील खोड किडीचे नियंत्रण
डॉ. मंगेश बडगुजर, डॉ. आनंद सोळंके
बुधवार, 4 एप्रिल 2018

राज्यात ऊस पिकामध्ये येणाऱ्या प्रमुख २५ किडीपैकी खोड कीड ही अत्यंत महत्त्वाची कीड आहे. ऊस लागवडीपासून मोठ्या बांधणीपर्यंत पाण्याची कमतरता भासल्यास खोड किडीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात येऊ शकतो. वाढलेल्या तापमानात आणि हलक्‍या जमिनीत या किडीचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो.

राज्यात ऊस पिकामध्ये येणाऱ्या प्रमुख २५ किडीपैकी खोड कीड ही अत्यंत महत्त्वाची कीड आहे. ऊस लागवडीपासून मोठ्या बांधणीपर्यंत पाण्याची कमतरता भासल्यास खोड किडीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात येऊ शकतो. वाढलेल्या तापमानात आणि हलक्‍या जमिनीत या किडीचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो.

अधिक ऊस उत्पादनासाठी सुरू उसाची लागवड १५ फेब्रुवारीपर्यंतच करणे आवश्‍यक असते. मात्र, अनेक अडचणींमुळे सर्व शेतकऱ्यांना वेळेत लागवड शक्‍य होत नाही. विशेषतः गहू व हरभरा असणाऱ्या शेतात उसाची लागवड ही उशिराच होते. अशा वेळेस आधीच पाणी कमी असलेल्या क्षेत्रामध्ये ऊस लागवडीनंतर मोठ्या बांधणीपर्यंत खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वाढते. तसेच खोडवा पिकातही याचा प्रादुर्भाव हा जास्त असतो.

पोषक वातावरण ः

 • हलकी जमीन, कमी पाणी व जास्त तापमान (३७-४१ अंश सेल्सिअस), कमी आर्द्रता (४०-५० टक्के) या बाबी कीड वाढीला पोषक आहेत.
 • खोड किडीचा प्रादुर्भाव ऊस लागवडीपासून ते मोठ्या बांधणीपर्यंत (कांडी तयार होईपर्यंत) आढळून येतो.
 • महाराष्ट्रात या किडीचा प्रादुर्भाव आडसाली (जुलै-ऑगस्ट) ते सुरू (फेब्रुवारी) लागवडीपर्यंत आढळतो.

खोड किडीची लक्षणे ः

 • पोंगा मर ः अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली अळी रांगत अथवा चंदेरी धाग्याला लटकत उसाच्या खोडाजवळ येते. अळी खोडावरील मऊ पेशीवर उपजीविका करते. नंतर ती अळी खोडाच्या आत शिरुन उगवणाऱ्या कोंबाला ७-८ दिवसांत खाऊन टाकते. त्यामुळे १२-१८ दिवसांत आपणास पोंगा मर दिसतो. या किडीचा प्रादुर्भाव फुटव्यावर व लागवडीपेक्षा खोडवा पिकात अधिक प्रमाणात दिसून येतो. सदरील पोंगा ओढल्यास सहज उपटून येतो व त्याचा उग्र वास येतो.
 • विरळ झालेले पीक ः शिफारशीत वेळेपेक्षा सुरू लागवड जेवढी उशिरा होईल, त्या प्रमाणात या किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. उसाची लागवड अरुंद ओळीत (९० सें.मी. किंवा त्या पेक्षा कमी) या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. किडीमुळे ऊस उशिरा तयार होतो. परिणामी उत्पादनात (३३ टक्के) व साखर उताऱ्यात (१ ते १.५ टक्के) घट होते. या किडीमुळे नुकसान झालेले उसाचे पीक विरळ दिसते.

खोड किडीचा जीवनक्रम ः
१) अंडी ः मादी पतंग हिरवीगार व टोकाकडे वाकलेल्या पानांवर अंडी देतात. या किडीची अंडी उसाच्या जमिनीलगतच्या तीन हिरव्या पानावरील मध्यशिरेजवळ आढळतात. नुकतीच दिलेली अंडी ही शुभ्र पांढरी असतात. साधारणपणे मादी पतंग पहिल्या रात्रीत ४०० अंडी काही पुंजक्याच्या स्वरुपात देतात. नंतर दुसऱ्या रात्री १२५ अंडी २ ते ५ पुंजक्यांमध्ये देतात. या किडीचा अंडी अवस्था ३ ते ६ दिवस राहते.

२) अळी ः अंड्यातून बाहेर पडलेल्या अळीच्या अंगावर नारंगी रंगाचे पट्टे असतात. ती अळी रात्रीच्या वेळी उसाच्या कोवळ्या पानावर उपजीविका करते. परिणामी उसात पोंगा मर आढळतो. पूर्ण वाढ झालेली अळी कोषावस्थेमध्ये जाण्याआधी खोडाच्या आतून जमिनीच्या वरील भागावर ४ ते १० सें.मी. अंतरावर पतंगाला बाहेर पडणे शक्य व्हावे, यासाठी छिद्र करून ठेवते. नंतर चंदेरी आवरणामध्ये पोंग्याच्या आत कोषावस्थेत जाते. अळी अवस्थआ २२ ते ३१ दिवस राहते.

३) कोष ः कोष खोडामध्ये (पोंग्यात) तयार होतात. हे कोंब लांब, पिवळसर ते तपकिरी रंगाचे दिसतात. ही अवस्था ५-९ दिवस राहते.

४) पतंग ः या किडीचा पतंग शक्‍यतो सूर्योदयापूर्वी बाहेर पडतो. प्रौढ अवस्था ५-९ दिवस राहते.

अन्य यजमान वनस्पती ः ज्वारी, भात, बाजरी, मका, राळा, गिन्नी गवत, बोरु इ.

खोड किडीचा नुकसान कालावधी ः ऊस उगवणीपासून ते मोठ्या बांधणीपर्यंत (साधारणतः ४ महिने) या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो.

खोड किडीचे नियंत्रण व्यवस्थापन ः
हलक्‍या जमिनीत उसाची लागवड टाळावी. सुरू उसाची लागवड १५ फेब्रुवारी पूर्वीच करण्याचे नियोजन करावे. बेणे मळ्यातील निरोगी व किडीविरहीत बेण्याची निवड करावी.

 1. फार प्रादुर्भाव झाल्यास शेत विरळ दिसते. अशा वेळेस एकरी रोपांची योग्य प्रमाण राखण्यासाठी लागवडीबरोबर प्लॅस्टिकच्या पिशव्यामध्ये पुरेसे रोपे तयार करून ठेवावीत. योग्य वेळी विरळ जागी ही रोपे लावावीत.
 2. पाण्याच्या पाळ्या जर वेळेवर देता येत नसतील, तर पाचटाचे मल्चिंग अवश्‍य करावे. त्यामुळेदेखील खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
 3. उसाला एक ते दीड महिन्यानंतर बाळ बांधणी केल्यास खोडकिडीचे पतंग बाहेर पडणारी छिद्रे बंद होण्यास मदत होईल. पतंग बाहेर पडणार नाहीत.
 4. उसामध्ये मका, ज्वारी व गहू ही आंतरपिके न घेता कांदा, लसूण, कोथिंबीर, पालक ही आंतरपिके घ्यावीत.
 5. वाढ जोमदार व फुटवे जास्त प्रमाणात येणाऱ्या वाणांवर या किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात येतो.
 6. ऊस लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी ३ ते ४ फुले ट्रायकोकार्ड प्रति हेक्‍टर या प्रमाणात साधारणतः १० ते १५ दिवसांच्या अंतराने लावावीत.
 7. खोडकीडग्रस्त ऊस उपटून अळीसह नष्ट करावा.
 8. हेक्‍टरी ५ कामगंध सापळे शेतात लावावे.
 9. पुरेशा प्रमाणात पालाशयुक्त खते वापरल्यास या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

कीटकनाशकांचा वापर ः

 किटकनाशक (कोणतेही एक) फॉर्म्युलेशनचे प्रमाण (ग्रॅम/मि.ली.) प्रति हेक्टरी घ्यावयाचे पाणी (लिटर प्रति हेक्टर) कीडनाशक फवारणीनंतर प्रतिक्षा कालावधी
 क्लोरअँट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के एस.सी.) ३७५ मि.ली. १००० २०८ दिवस
 क्लोरअँट्रानिलीप्रोल (०.४ जी.आर.) १८.७५ किलो -- १४७ दिवस
 क्लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) १२५०-१५०० मि.ली. ५००-१००० --
 सायपरमेथ्रीन (१० टक्के प्रवाही) ६५०-७६० मि.ली. ५००-७०० १४ दिवस
 फिप्रोनिल (५ टक्के एस.सी.) १५००-२००० ५०० ९ महिने
 फिप्रोनिल (०.३ जी.आर.) २५०००-३३३०० ग्रॅम -- ९ महिने
 क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २०० मि.ली. ५०० ते १००० --

- डॉ. मंगेश बडगुजर, ९४२२७७११२६
(मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव)

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...