agriculturai stories in marathi, crop advice, CITRUS | Agrowon

लिंबूवर्गीय फळपीक सल्ला
डाॅ. एम. एस. लदानिया
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

या महिन्यामध्ये लिंबूवर्गीय फळ पिकामध्ये येणाऱ्या संभाव्य कीड, रोग व समस्यांचा अंदाज घेऊन बागेमध्ये खालील प्रकारे नियोजन करावे.

या महिन्यामध्ये लिंबूवर्गीय फळ पिकामध्ये येणाऱ्या संभाव्य कीड, रोग व समस्यांचा अंदाज घेऊन बागेमध्ये खालील प्रकारे नियोजन करावे.

पाणी व्यवस्थापन
ठिबक सिंचन संच असल्यास त्याच्या नळ्या पसरून घ्याव्यात. या दिवसांमध्ये संत्रा व मोसंबीच्या एक वर्षाच्या झाडाला प्रति दिन ८ लिटर, चार वर्षांच्या झाडाला ३६ लिटर, आठ वर्षांच्या झाडाला ८५ लिटर आणि दहा वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या झाडाला १०५ लिटर पाणी द्यावे.  संत्रा, मोसंबीच्या तुलनेमध्ये लिंबूच्या झाडांची पाण्याची गरज कमी असते. एक वर्षाच्या झाडाला प्रति दिन ४ लिटर, चार वर्षांच्या झाडाला १५ लिटर, आठ वर्षांच्या झाडाला ५३ लिटर पाणी आणि दहा वर्षे व त्यावरील झाडाला ८८ लिटर पाणी द्यावे.
ठिबक सिंचनाची सुविधा नसल्यास दुहेरी रींग पद्धतीने सिंचनासाठी आळे करावे. पाटपाणी बागेमध्ये देऊ नये.

खताचे व्यवस्थापन

 • एक वर्षे वयाच्या झाडाला १०८ ग्रॅम युरिया व ४५ ग्रॅम म्युरेट आॅफ पोटॅश प्रति झाड देणे आवश्यक असते. दोन वर्षांच्या झाडाला दुप्पट, तीन वर्षांच्या झाडास तीनपट व चार किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या झाडासाठी चौपट खतांची मात्रा द्यावी. रासायनिक खते झाडाच्या आळ्यात माती ओलसर असताना द्यावीत.
 • ज्या झाडावर फळे आली आहेत, त्यांच्यासाठी प्रति झाड ५०० ग्रॅम युरिया, ६०० ग्रॅम सिंगल सुपर फाॅस्फेट, १५० ग्रॅम म्युरेट आॅफ पोटॅश सोबत १०० ग्रॅम झिंक सल्फेट, १०० ग्रॅम फेरस सल्फेट, १०० ग्रॅम मॅंगेनिज सल्फेट आणि ५० ग्रॅम बोरॅक्स द्यावे.
 • खुंटासाठी रंगपूर किंवा जंबेरीच्या बियांची पेरणी करावी.

कीड व्यवस्थापन

 • या महिन्यात फळांतील रस शोषणाऱ्या पतंगाचाही प्रादुर्भाव असतो. प्रौढ पतंग सायंकाळी बाहेर पडून, पिकणाऱ्या आणि पिकलेल्या फळांच्या सालीत बारीक छिद्र पाडतात. या पतंगांना आकर्षित करून मारण्यासाठी प्रॅति दोन लिटर पाण्यात २० मि.लि. मॅलॅथिआन अधिक  २०० ग्रॅम गूळ किंवा फळांचे रस मिसळून विषारी मिश्रण तयार करावे. हे मिश्रण मोठ्या तोंडाच्या बाटलीमध्ये ठेवून, झाडांवर अडकवून ठेवाव्यात. गळालेली फळे एकत्र करून मातीत गाडून नष्ट करावीत.
 • कोळी कीडीचा प्रादुर्भाव दिसताक्षणीच, फवारणी प्रति लिटर
  डायकोफाॅल १.५ मि.ली. किंवा द्राव्य गंधक ३ ग्रॅम.
  आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.
 • नर फळमाशीला आकर्षित करण्यासाठी मिथाईल युजेनॉल १ मि.लि. अधिक मॅलेथिआॅन अर्धा मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण रुंद तोंडाच्या बाटलीत ठेवून, बागेत ठेवावे. त्याकडे नर फळमाश्या आकर्षित होऊन बळी पडतात. फळ तोडणीच्या ६० दिवस आधीच हेक्टरी २५ बाटल्या प्रति हेक्टर बागेत ठेवाव्यात. यातील द्रावण दर सात दिवसांनी बदलावे.

रोग व्यवस्थापन

 • फायटोफ्थोरा ग्रस्त झाडावर (फवारणी प्रति लिटर पाणी)
  मेटॅलॅक्झील एम अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.७५ ग्रॅम किंवा फोसेटील एएल २.५ ग्रॅम.
 • टीप ः संपूर्ण झाड ओले होईपर्यंत फवारणी करावी. उर्वरीत द्रावण झाडाभोवती आळ्यातही टाकावे.
 • झाडाच्या बुंध्यावर २ फुटापर्यंत बोर्डोपेस्ट ब्रशच्या साह्याने लावावी.
 • बोर्डोपेस्ट तयार करण्याची पद्धत : १ किलो मोरचूद व १ किलो चूना वेगवेगळा ५ लिटर पाण्यांत रात्रभर भिजवून, दुसऱ्या दिवशी सकाळी एकत्र करून पेस्ट तयार करावी.

जमिनीची मशागत आणि निंदणी करावी.

फळगळ व्यवस्थापन

 • प्रादुर्भावीत झाडांवर कार्बेन्डाझीम किंवा थायोफिनेट मिथाईल प्रत्येकी १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. पुढील फवारणी १० दिवसांच्या अंतराने घ्यावी.
 • फळबागेत खाली पडलेली फळे वेचून नष्ट करावीत.
 • झाडावरील वाळलेल्या फांद्याच्या टोकाची छाटणी करावी. त्यानंतर त्वरीत वर उल्लेखलेल्या बुरशीनाशकांची फवारणी करावी.
 • प्रति १०० लिटर पाण्यात २,४-डी दीड ग्रॅम किंवा जी.ए. ३ दीड ग्रॅम
 • यामध्ये पोटॅशिअम नायट्रेट १.५ किलो किंवा युरिया १.५ किलो मिसळून फवारणी करावी.
 • दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.
 • झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट प्रत्येकी २०० ग्रॅम प्रमाणात झाडांच्या आळ्यामध्ये टाकून मातीत चांगल्या प्रकारे मिसळावे.
 • हलक्या जमिनीत लागवड केलेल्या संत्रा बागेत हलके पाणी द्यावे.
 • संत्राबाग सुदृढ व रोगविरहित ठेवण्याकरिता मुख्य व सुक्ष्म अन्नद्रव्ये शिफारशीप्रमाणे द्याव्यात.
 • भारी चोपण माती असणाऱ्या बागांमध्ये पाण्याचा निचरा करण्याकडे लक्ष द्यावे.

संपर्क : ०७१२-२५००८१३
(केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर)

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांच्या वाढल्या ‘खरीप वेदना’पुणे : सोयाबीनचे कोसळेले भाव, तूर-मुगाची वेळेत न...
लोकभावनेच्या दबावामुळे कर्जमाफीत काही...नागपूर : कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिवाळीआधी...
अखेर ‘डीबीटी’ धोरण जिल्हा परिषद सेस...पुणे  : राज्यात जिल्हा परिषदांमधील सेस...
साखर उद्योगाबाबत केंद्राशी वाटाघाटी करानागपूर : शेतकरी संघटना उसाला ३,५०० रुपयांची मागणी...
गोंदिया 11.5 अंशांवरपुणे : उत्तरेकडून थंड वारे वाहू लागले आहेत. याचा...
सरकारने शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला ः...औरंगाबाद: आलटून पालटून सत्ता भोगण्याचे सत्ताधारी...
भाजीपाला उत्पादकांचा धुक्‍यात घुसमटतोय...कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांत भाजीपाल्याचे दर...
बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष बागा...सांगली : जिल्ह्यातील द्राक्ष पट्ट्यात गेल्या तीन...
कोल्हापूरचे शिवसेना आमदार प्रकाश...नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
बोंडअळीग्रस्तांना मदतीसाठी रॅपरची अट...नागपूर ः बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त शेतकऱ्यांना...
कीडरोग सर्व्हेक्षकांना टाकणार काळ्या...नागपूर : कीडरोग सर्व्हेक्षकांनी आपल्या विविध...
विदर्भासाठी कृषी विभागाचा ॲक्‍शन प्लॅननागपूर ः कापूस आणि सोयाबीन उत्पादक पट्टयात रेशीम...
मदतीअभावी राज्यातील सूतगिरण्यांना घरघर...सोलापूर ः कापसाचे वाढलेले दर, सरकारचे कुचकामी...
उसामध्ये योग्य प्रकारे करा मोठी बांधणीउसाची भरणी केल्यानंतर १ ते १.५ महिन्याने लहान...
उपक्रमशीलता असावी तर चांगदेवच्या...जळगाव जिल्ह्यातील चांगदेव गाव परिसरातील...
सेंद्रिय भाजीपाल्यासाठी थेट मिळवले...नागपूरचे रहिवासी असलेल्या सुनील कोंडे या...
अर्थकारण सुधारणारी तरुणाची एकात्मिक...एकात्मिक शेती पद्धतीचा अंगीकार केल्यानेच सराफवाडी...
कृषी आयुक्तालयातील दक्षता पथक प्रमुखाची...पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तालयातील दक्षता...
थेट विक्री, प्रक्रियेतून फायदेशीर...दुग्ध व्यवसाय अत्यंत खर्चिक झाला आहे. केवळ...
धान, बोंड अळीग्रस्तांना मदत : पांडूरंग...नागपूर ः गुलाबी बोंड अळीमुळे २० जिल्ह्यांतील...