agriculturai stories in marathi, crop advice, ONION | Agrowon

फुलकिडे, करपा नियंत्रणाकडे लक्ष द्या
डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ. ए. थंगासामी, डॉ. मेजर सिंह
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

सध्या रांगडा कांदा व लसूण ही पिके शेतात उभी असून, रब्बी कांदा पुनर्लागवडीस येणार आहे. बीजोत्पादनाकरिता लावलेल्या कांद्यांची रोपेसुद्धा काही शेतात उभी आहेत. अशा परिस्थितीमध्ये पुढील उपाययोजना उपयुक्त ठरतील.

रांगडा कांदा उभे पीक ः

सध्या रांगडा कांदा व लसूण ही पिके शेतात उभी असून, रब्बी कांदा पुनर्लागवडीस येणार आहे. बीजोत्पादनाकरिता लावलेल्या कांद्यांची रोपेसुद्धा काही शेतात उभी आहेत. अशा परिस्थितीमध्ये पुढील उपाययोजना उपयुक्त ठरतील.

रांगडा कांदा उभे पीक ः

 • पुनर्लागवडीनंतर ४५, ६० आणि ७५ दिवसांनी फवारणीद्वारे सूक्ष्मद्रव्ये ५ ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात द्यावीत.
 • फुलकिडे व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी
 • पुनर्लागवडीनंतर १५ दिवसांनी, मॅन्कोझेब २.५ ग्रॅम अधिक मिथोमिल ०.८ ग्रॅम
 • पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, कार्बोसल्फान २ मिलि + ट्रायसायक्‍लॅझोल १ ग्रॅम
 • दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, प्रोफेनोफॉस १ मिलि + हेक्‍झाकोनॅझोल १ मिलि
 •  वरील नियोजनबद्ध फवारणींनंतरही कीड व रोगांचा बंदोबस्त झाला नसल्यास, १५ दिवसांनी फिप्रोनील १ मिलि + प्रोपिकोनॅझोल १ मिलि प्रतिलिटर.

रब्बी कांदा रोपांची पुनर्लागवड ः

 • पुनर्लागवडीकरिता खूप जास्त वाढ झालेली किंवा अतिशय कोवळी रोपे लावणे टाळावे. रोपे उपटल्यानंतर त्यांच्या पानांचा शेंड्याकडील १/३ भाग पुनर्लागणीपूर्वी कापून टाकावा.
 • बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता, कार्बेन्डाझिम
 • १ ग्रॅम प्रतिलिटर या द्रावणात रोपांची मुळे बुडवून नंतरच पुनर्लागवड करावी.
 • दोन ओळींमध्ये १५ सेंमी व दोन रोपांमध्ये १० सेंमी अंतर ठेवून ४५-५० दिवसांच्या रोपांची पुनर्लागवड करावी.
 • सुरवातीच्या अवस्थेत येणाऱ्या फुलकीडे आणि करपा रोगांच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर.
 • पुनर्लागवडीनंतर २० दिवसांनी, मिथोमिल ०.८ ग्रॅम + मॅन्कोझेब २ ग्रॅम
 • वरील फवारणीनंतर १५ दिवसांनी, प्रोफेनोफॉस १ मिलि + हेक्‍झाकोनॅझोल १ मिलि
 • पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांनी ३५ किलो प्रतिहेक्‍टर या प्रमाणात नत्र द्यावे.
 • पुनर्लागवडीनंतर ४०-६० दिवसांनी खुरपणी करावी.

कांदा बीजोत्पादनाच्या रोपांकरिता

 

 •  लागवडीनंतर ४०-६० दिवसांनी खुरपणी करावी.
 •  फुलकिडे आणि करपा रोग नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी
 •  ट्रायसायक्‍लॅझोल १ ग्रॅम + मिथोमिल १ ग्रॅम
 •  १५ दिवसांच्या अंतराने, प्रोफेनोफॉस १ मिलि + मॅन्कोझेब २.५ ग्रॅम
 •     वरील फवारणीनंतर १५ दिवसाने, कार्बोसल्फान १ मिलि + हेक्‍झाकोनॅझोल १ ग्रॅम
 •  वरील नियोजनबद्ध फवारणीनंतरही नियंत्रण न मिळाल्यास, फिप्रोनील १ मिलि + प्रोपिकोनॅझोल १ ग्रॅम
 •  लागवडीनंतर नत्र खताचा पहिला हप्ता ३० दिवसांनी ३० किलो प्रतिहेक्‍टर या प्रमाणात द्यावा. दुसरा हप्ता याच प्रमाणात ४५ दिवसांनी द्यावा.
 •  पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर १० ते १२ दिवस ठेवावे.
 • लागवडीच्या ८० दिवसांनंतर, तसेच फुले उमलल्यानंतर बुरशीनाशक किंवा कीटकनाशक यांच्या फवारण्या करू नयेत. कारण या फवारण्यांमुळे मधमाश्यांना हानी पोचते. त्याचा परागीकरणावर परिणाम होतो.

 

लसूण उभ्या पिकाकरिता ः

 •  लागवडीनंतर ३०, ४५ आणि ६० दिवसांनी सूक्ष्मद्रव्यांचा ५ ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात पानांवर छिडकाव करावा.
 •  कार्बोसल्फान २ मिलि प्रतिलिटर + ट्रायसायक्‍लाझोल १ ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात फवारणी करण्याची शिफारस आहे.
 • पहिल्या फवारणीच्या १५ दिवसानंतर आवश्‍यकतेनुसार मिथोमिल १ ग्रॅम प्रतिलिटर अधिक मॅन्कोझेब १ ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात फवारण्याची शिफारस आहे.
 • दुसऱ्या फवारणीच्या १५ दिवसांनंतर प्रोफेनोफॉस १ मिलि प्रतिलिटर अधिक हेक्‍झाकोनाझोल १ मिलि प्रतिलिटर या प्रमाणात आवश्‍यकतेनुसार फवारणी करावी.
 • वरील फवारणीनंतरसुद्धा फुलकिडे व पानांवरील रोग यांचा बंदोबस्त न झाल्यास फिप्रोनील १ मिलि  + प्रोपिकोनाझोल १मिलि प्रतिलिटर या प्रमाणात तिसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी फवारणी करावी.
 • लागवडीनंतर नत्र खताचा पहिला हप्ता २५ किलो प्रतिहेक्‍टर या प्रमाणात ३० दिवसांनी, तर दुसरा हप्ता याच प्रमाणात ४५ दिवसांनी द्यावा.
 • लाल कोळीचा प्रादुर्भाव आढळल्यास गंधक २ ग्रॅम प्रतिलिटर किंवा डायकोफॉल २ मिलि प्रतिलिटर या प्रमाणात फवारणी करावी.

संपर्क  ः ०२१३५ - २२२०२६
(कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे.)

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...