agriculturai stories in marathi, crop advice, sugercane, sorghum, | Agrowon

पीक सल्ला : रब्बी, भाजीपाला, लिंबूवर्गीय-वेलवर्गीय पिके
कृषी विद्या विभाग, राहुरी
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

ऊस
पूर्वहंगामी उसामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फुले ट्रायकोकार्ड एकरी २ या प्रमाणात लावावेत. आवश्यकतेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ प्रसारण्या कराव्यात.

ज्वारी
खोडकिडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
क्विनॉलफॉस (२५ ईसी) १.५ मि.लि.  

हरभरा
रोपावस्थेत कामगंध सापळे हेक्टरी ५ या प्रमाणात लावावेत. प्रादुर्भाव जास्त असल्यास
फवारणी ः प्रति लिटर पाणी

ऊस
पूर्वहंगामी उसामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फुले ट्रायकोकार्ड एकरी २ या प्रमाणात लावावेत. आवश्यकतेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ प्रसारण्या कराव्यात.

ज्वारी
खोडकिडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
क्विनॉलफॉस (२५ ईसी) १.५ मि.लि.  

हरभरा
रोपावस्थेत कामगंध सापळे हेक्टरी ५ या प्रमाणात लावावेत. प्रादुर्भाव जास्त असल्यास
फवारणी ः प्रति लिटर पाणी

 • निंबोळी अर्क ५ टक्के किंवा
 • अॅझाडिरॅक्‍टीन ३०० पीपीएम ५ मि.लि.
 • क्विनॉलफॉस (२५ टक्के) २ मि.लि. किंवा
 • क्‍लोरअॅन्ट्रानीलीप्रोल (१८.५ टक्के) ०.२५ मि.लि. किंवा
 • इमामेक्‍टीन बेन्झोएट (५ टक्के) ०.४४ ग्रॅम
  सूचना : जैविक नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही. विषाणू २५० एल.ई प्रतिहेक्‍टरी (५०० लिटर पाणी) या प्रमाणात वापरावेत.

करडई
मावा किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर,
डायमेथोएट (३०% प्रवाही) १.५  मि. लि.

लसूण

 • लसूण पिकाची लागवड झाल्यापासून २० ते २५ दिवसांनी खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे.
 • लसूण पिकाची लागवड झाल्यानंतर १० ते १५ दिवसांनी तणनाशक फवारणी प्रति लिटर पाणी
  ऑक्झिफ्लोरफेन १ ते १.५ मि. लि.  

मिरची
फळसड किंवा डायबॅक, करपा (पानावरील ठिपके) या रोगांचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी दिसत आहे. रोग आढळल्यास नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर फिप्रोनील १.५ मि. लि. किंवा थायोमेथोक्झाम ०.४ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा काॅपर आॅक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम किंवा डायफेनोकोनॅझोल १ मि. लि.
१० दिवसांच्या अंतराने कीडनाशक बदलून पुढील फवारणी घ्यावी.

वांगी
शेंडा व फळ पोखरणारी अळी

 • प्रार्दुभाव कमी करण्यासाठी ल्युसील्यूर हे कामगंध सापळे हेक्टरी १०० या प्रमाणात वापरावेत.  
 • कीडग्रस्त शेंडे दर आठवड्याने खुडून नष्ट करावेत.
 • तोडणीनंतर कीडग्रस्त फळे गोळा करून जमिनीत गाडून टाकावीत.
 • नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर  इंडोक्झाकार्ब १ मि. लि. किंवा क्लोरॲन्ट्रानीलीप्रोल (१८.५ टक्के एस.सी.) ०.३ मि. लि.

कांदा
फुलकिडे व करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर
फिप्रोनील (५ एस.सी.) १.५ मि. लि. किंवा प्रोफेनोफॉस (५० ईसी) १ मि. लि. किंवा कार्बोसल्फान (२५ ईसी) १.५ मि. लि. यापैकी एका किटकनाशकामध्ये मिसळून मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ मि. लि. किंवा कार्बेन्डाझीम १ ग्रॅम यापैकी एक बुरशीनाशक. अधिक सरफेक्टंट  १ मि. लि.

कोबी/फ्लॉवर  

 • करपा नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर
  मॅन्कोझेब किंवा काॅपर आॅक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम.
 • घाण्या हा जीवाणूजन्य रोग आढळून आल्यास, नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर
  काॅपर आॅक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन* एक ग्रॅम
 • कोबीवरील चौकोनी ठिपक्यांचा पतंग नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर
  स्पिनोसॅड (२.५ एस.सी.) १ मि. लि. किंवाइंडोक्झाकार्ब (१४.५ एस.सी.) १ मि. लि. किंवा क्लोरॲन्ट्रानीलीप्रोल (१८.५ एस.सी.) ०.२ मि. लि.
  टीप - फवारणी द्रावणामध्ये सरफेक्टंट १ मि. लि. प्रति लिटर मिसळावे.

लिंबूवर्गीय पिके
बागेत सिट्रस सिला व मावा किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १ मि. लि.

वेलवर्गीय पिके
काळा करपा, केवडा (डाऊनी मिल्ड्यू) दिसून येत आहे. नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर
मॅन्कोझेब किंवा काॅपर आॅक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम किंवा
मेटालॅक्झिल अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम
पुढील फवारणी १० दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार घ्यावी.

 संपर्क ः  ०२४२६- २४३२३९
(कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

 

इतर ताज्या घडामोडी
यंदा पीक आणि पाऊस साधारण : भेंडवळच्या...भेंडवळ जि. बुलडाणा : या हंगामात पीक आणि पाऊस...
मराठवाड्यासाठी २० सौरऊर्जा प्रकल्पांना... लातूर ः मराठवाड्यातील विजेची गरज लक्षात घेऊन...
तयारी हळद लागवडीची...हळद लागवडीसाठी चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची...
सांगली जिल्ह्यात खंडित वीजपुरवठ्याने... सांगली  : कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी...
मराठवाड्यातील ३२१ गावांना ३९६...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत...
मिरजगाव येथे यंत्रणा सुरळीत, मात्र... नगर : तूर, हरभरा खरेदीसह अन्य बाबी ऑनलाइन...
नांदेड विभागातील २४ कारखान्यांचा गाळप... नांदेड :  नांदेड विभागातील यंदा गाळप सुरू...
व्यापाऱ्यांकडून फसवणूक : मनमाड बाजार...मनमाड, जि. नाशिक  : मनमाड कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव येथे आंबा ४५०० ते ८००० रुपये... जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कृषिपंपांच्या वीज थकबाकीवरून...मुंबई  ः सुमारे २३ हजार कोटी रुपयांच्या कृषी...
आमदार-खासदारांची धोरणे व्यापारीहिताचीपरभणी  ः आमदार-खासदारांनी संघटित होऊन...
पीकविमा परताव्यासाठीचे अन्नत्याग आंदोलन...परभणी  ः जिल्ह्यातील पीकविमा परताव्यापासून...
गुजरातमध्ये उन्हाळी पीक लागवड क्षेत्रात...मुंबई : सरदार सरोवर प्रकल्पातील कमी ...
`जलयुक्त`साठी पुणे जिल्ह्यातील 221...पुणे  ः पाणीटंचाई कमी करण्यासाठी राज्य...
नगर जिल्ह्यात ‘नरेगा’तून साडेसहा हजार... नगर  ः ग्रामीण भागात मजुरांना रोजगार...
मराठवाड्यातील लघू प्रकल्पांत १४ टक्के... औरंगाबाद  : एकीकडे उष्णतेचे प्रमाण वाढत...
बुलडाण्यातील सात हजारांवर कृषिपंपांची... बुलडाणा  ः जिल्ह्यात सद्यःस्थितीत सात...
बुलडाण्यात सोयाबीन क्षेत्र वाढण्याची... बुलडाणा  ः गेल्या हंगामात बीटी कपाशीवर...
कोल्हापूर जिल्ह्यातील गाळप हंगाम आटोपला कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप...
तीन लाख ७२ हजार टन खतसाठा तीन...परभणी :  नांदेड, परभणी, हिंगोली...