कृषी सल्ला : खरीप कपाशी, रब्बी ज्वारी, करडई, वांगी, मिरची, भाजीपाला पिके

कृषी सल्ला
कृषी सल्ला

हवामानाचा संक्षिप्त अंदाज ः पुढील पाच दिवस वातावरण अंशतः ढगाळ राहणार असून, १८ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

  • कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस व किमान तापमान १९ ते २० अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ९ ते १२ कि.मी. राहील.
  • कमाल आर्द्रता ८८ ते ९२ टक्के, तर किमान आर्द्रता ६० ते ८० टक्के राहील. खरीप कपाशी ः अवस्था - पाते किंवा बोंडे लागणे
  • ढगाळ वातावरण व वाढलेले तापमान यामुळे काही ठिकाणी पांढरी माशी, मावा, तुडतुडे या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी, (फवारणी प्रति लिटर पाणी ) अॅसिफेट (५० टक्के) अधिक इमिडाक्लोप्रीड (१.८ टक्के) (संयुक्त कीटकनाशक) २ ग्रॅम.
  • पिकांच्या वाढीसाठी, युरिया ४ किलो अधिक डीएपी ४ किलो प्रति एकरी २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • सोयाबीन :
  • अवस्था : शेंगा लागणे, दाणे भरणे
  • सोयाबीन पिकावर पाने खाणारी अळी व उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी,
  • फवारणी ः प्रोफेनोफॉस २.५ मि.लि. प्रति लिटर.
  • रब्बी ज्वारी :
  • अवस्था ः पेरणीचे नियोजन
  • पेरणीची वेळ (१५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर) साधण्यासाठी आपल्या विभागातील शिफारशीत वाणाचे बियाणे व खत मिळवून ठेवावे.
  • बीज प्रक्रिया
  • रोपावस्थेमध्ये खोडमाशी व खोडकिडी चा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी बीज प्रक्रिया करावी. त्यासाठी थायामेथोक्झाम (३० एफ.एस.) किंवा इमिडाक्लोप्रीड (४८ एफएस) १० मि.लि. प्रति किलो बियाणे वापरावे.
  • काणी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पेरणीपूर्व गंधक (३०० मेश) ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे.
  • अॅसिटोबॅक्टर २५ ग्रॅम अधिक अॅझोटोबॅक्टर २५ ग्रॅम अधिक स्फुरद विरघळणारे जिवाणू २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे
  • कांदा :
  • अवस्था : वाढीच्या अवस्थेत पीक.
  • करपा रोग व फुलकिडे यांच्या एकत्रित नियंत्रणासाठी,
  • कांदा लागवडीनंतर (फवारणी प्रति लिटर पाणी)
  • मॅन्कोझेब ३ ग्रॅम अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) १ मि.लि. प्रति लिटर.
  • करडई :
  • सुधारित वाण - एस. एस. एफ. ७०८, फुले चंद्रभागा.
  • बीज प्रक्रिया (प्रति किलो बियाणे)
  • अॅझोटोबॅक्टर २५ ग्रॅम अधिक पी.एस. बी. २५ ग्रॅम
  • रोपावस्थेत बुरशीजन्य रोगांपासून बचावासाठी, ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम.
  • वांगी
  • अवस्था : फळे लागणे.
  • रोप पुनर्लागवडीनंतर २० दिवसांनी सर्वेक्षण करून प्रादुर्भावित शेंडे काढून टाकावेत.
  • फळे तोडणी वेळी कीडग्रस्त फळे गोळा करून नष्ट करावीत किंवा खोल खड्ड्यात पुरून टाकावीत.
  • फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, (फवारणी प्रति लिटर पाणी) क्लोरअॅण्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के) ०.४ मि.लि. किंवा स्पिनोसॅड (४५ एस.सी.) ०.५ मि.लि.
  • टीप : आवश्यकतेनुसार पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.
  • मिरची ः
  • अवस्था ः वाढीची.
  • मिरचीवर लिफ कर्ल (चुरडा मुरडा) हा रोग दिसून आल्यास, रोग व रोगप्रसारक रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी, रोप लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी (फवारणी प्रति लिटर पाणी) मॅन्कोझेब २.५ ग्रॅम अधिक डायमेथोएट (३० ईसी) १.५ मि.लि.
  • फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी , (फवारणी प्रति लिटर पाणी) फिप्रोनील (५ एससी) १.५ मि.लि.
  • कोळी नियंत्रणासाठी , (फवारणी प्रति लिटर पाणी) फेनाक्झाक्विन (१० ईसी) २.५ मि.लि.
  • टोमॅटो ः
  • अवस्था - फळे लागणे
  • रसशोषक किडीं च्या नियंत्रणासाठी, (फवारणी प्रति लिटर पाणी) इमिडाक्लोप्रीड (१८.५ एससी) ०.५ मि.लि. किंवा फिप्रोनील (५ ईसी) १.५ मि.लि.
  • फळ पोखरणाऱ्या अळी नियंत्रणासाठी, (फवारणी प्रति लिटर) क्विनॉलफॉस (२५ ईसी) २ मि.लि
  • करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, (फवारणी प्रति लिटर) मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १ ग्रॅम.
  • ढोबळी मिरची ः
  • अवस्था : वाढीची
  • फुलकिडीच्या नियंत्रणासाठी, (फवारणी प्रति लिटर) फिप्रोनील (५ एससी) १ मि.लि.
  • भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी, (फवारणी प्रति लिटर) पाण्यात विरघळणारे गंधक ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १ ग्रॅम टीप ः पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक बदलून करावी.
  • काकडीवर्गीय पिके ः
  • दमट हवामानामुळे केवडा या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पानांच्या खालील बाजूला रोगाची प्राथमिक लक्षणे दिसून येताच,
  • (फवारणी प्रति लिटर पाणी)
  • कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम किंवा
  • मेटॅलॅक्झील (८ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६५ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम.
  • फळमाशीच्या नियंत्रणासाठी, कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
  • भाजीपाला पिके :
  • पांढऱ्या माशी च्या नियंत्रणासाठी पिवळ्या रंगाचे चिकट सापळे शेतात लावावेत.
  • अधिक प्रादुर्भाव असल्यास, (फवारणी प्रति लिटर) व्हर्टीसिलिअम लेकॅनी ५ ग्रॅम
  • मूळकुज रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, (ड्रेंचिग प्रति लिटर पाणी) ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम.
  • डाळिंब :
  • अवस्था : वाढीची.
  • खोडाला लहान छिद्रे पाडणारे भुंगेरे (शॉट होल बोरर) यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी,
  • गेरू ४०० ग्रॅम प्रति लिटर पाणी रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी त्यात क्लोरपायरीफॉस (२० ईसी) ५ मि.लि. अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे मिसळून द्रावण तयार करावे.
  • हे द्रावण झाडाच्या खोड व मुळांना लावावे.
  • जरबेरा :
  • नागअळीच्या नियंत्रणासाठी, (फवारणी प्रति लिटर पाणी)
  • क्लोरपायरीफॉस (२० ईसी) १ मि.लि. किंवा अॅसिफेट (७५ एसपी) १.५ ग्रॅम.
  • संपर्क : ०२४२६- २४३२३९
  • (ग्रामीण कृषी हवामान सेवा आणि कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com