agriculturai stories in marathi, crop advice, water management in rabbi crops | Agrowon

रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे
शरद नायक, डॉ. वा. नि. नारखेडे, विशाल सुतार
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी जमिनीच्या ओलाव्याचे महत्त्व मोठे आहे. पिकांच्या संवेदनशील अवस्थांमध्ये पाणी दिल्यास उत्पादनामध्ये चांगली वाढ मिळते.

रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी जमिनीच्या ओलाव्याचे महत्त्व मोठे आहे. योग्य पाणी नियोजनामुळे उत्पादनातील वाढीसबोतच पिकाखालील क्षेत्रही वाढवणे शक्य आहे. त्यासाठी हवामान व जमिनीनुसार पिकांची निवड, संकरित व अधिक उत्पादन देणारे वाण, योग्य वेळी पेरणी, प्रति हेक्टरी ठराविक रोपांची संख्या, खतांची योग्य मात्रा आणि पीक संरक्षण या बाबींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागते.

रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी जमिनीच्या ओलाव्याचे महत्त्व मोठे आहे. पिकांच्या संवेदनशील अवस्थांमध्ये पाणी दिल्यास उत्पादनामध्ये चांगली वाढ मिळते.

रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी जमिनीच्या ओलाव्याचे महत्त्व मोठे आहे. योग्य पाणी नियोजनामुळे उत्पादनातील वाढीसबोतच पिकाखालील क्षेत्रही वाढवणे शक्य आहे. त्यासाठी हवामान व जमिनीनुसार पिकांची निवड, संकरित व अधिक उत्पादन देणारे वाण, योग्य वेळी पेरणी, प्रति हेक्टरी ठराविक रोपांची संख्या, खतांची योग्य मात्रा आणि पीक संरक्षण या बाबींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागते.

बाष्पीभवन आणि पाणी मात्रा ः
वर्षभरात घेतल्या जाणाऱ्या पिकांचे तीन हंगामांतील पाणी नियोजन हे वेगळे असते.

 • उन्हाळी हंगामात अधिक तापमान असल्यामुळे सरासरी १० ते ११ मि.मी. बाष्पीभवन होते. त्यामुळे जमिनीतील शिल्लक राहणारा ओलावा गृहीत धरून, बाष्पीभवन होणाऱ्या पाण्याच्या सुमारे ४५ ते ५० टक्के पाणी या हंगामात लागते.
 • पावसाळी हंगामात सरासरी दररोज ६ ते ७ मि.मी. बाष्पीभवन होते.
 • रब्बी हंगामात ३ ते ५ मि.मी. बाष्पीभवन होते, त्यामुळे या पावसाळी व रब्बी या हंगामांमध्ये सुमारे २० टक्के पाणी लागते.
 • आपल्याकडील उपलब्ध असलेल्या पाण्याच्या प्रमाणानुसार पिकांची निवड करावी. विशेषतः रब्बी हंगामात प्रामुख्याने गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, करडई, सूर्यफूल आणि मोहरी ही पिके घेतली जातात. त्यांच्या पाण्याचे शास्त्रीय नियोजन पाहू.

गहू

 • मध्यम खोल (६० सें.मी.) ते खोल जमिनीत (९० सें.मी.) गव्हाचे पीक घ्यावे. अशा जमिनीत गव्हाचे शिफारस केलेले वाण ५ पाण्यावर हेक्टरी ३५ ते ४० क्विंटल उत्पादन घेऊ शकतात.
 • ओलवणीचे पाणी सोडून नंतरचे चारही पाणी गहू पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत द्यावे. प्रत्येक पाण्याच्या पाळीस ७ ते ८ सें. मी. पाणी पिकास द्यावे.
 • वारा बंदीमध्ये एक क्युसेक प्रवाह (एक घनफूट पाणी प्रति सेकंदास) एका एकरास चार तास दिल्यास वरीलप्रमाणे पिकास आवश्यक पाणी मिळते. यात शेतचारीतून वाया गेलेल्या पाण्याचासुद्धा अंतर्भाव केलेला आहे.
 • पेरणीच्या वेळेस जमिनीस ओल कमी असेल, तर पेरणी ओलावून करणे फायद्याचे ठरते.

सूर्यफूल
सूर्यफूल हे पीक रब्बी हंगामात मध्यम, खोल ते भारी जमिनीत घेतल्यास फायदेशीर ठरते.
बाष्पीभवन गुणांकावर आधारित पाणी देण्याच्या पद्धतीनुसार, ०.७५ बाष्पीभवन गुणांक मानून ६ सें.मी. खोलीचे पाणी दिल्यास सूर्यफुलास एकूण चार पाळ्यांमध्ये ४५ ते ४८ सें.मी. पाणी लागते.

मोहरी

 • मोहरीच्या पिकास मध्यम खोल ते भारी जमीन निवडावी. सीता, पुसा बोल्ड या जाती लागवडीसाठी निवडाव्यात. या पिकास एकूण ३ पाण्याच्या पाळ्या व २०-२५ सें.मी. पाणी लागते.
 • रब्बी हंगामात तक्त्यात दिल्याप्रमाणे संवेदनशील अवस्थात पाणी दिल्यास पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ होते. पाणी वापरक्षमता वाढल्यास क्षेत्रामध्ये देखील वाढ शक्य होते. पाण्याच्या जादा वापराने होणारी जमिनीची हानी टळू शकते.

रब्बी ज्वारी
पाण्याची उपलब्धता ३ ते ४ पाळ्या देण्याइतकी असल्यास रब्बी ज्वारीचे पीक हे मध्यम खोल ते खोल जमिनीत घेणे फायदेशीर ठरते.
भारी जमिनीस कमी, तर हलक्या जमिनीस जादा पाणी लागते.

करडई

 • करडई हे पीक मध्यम प्रतीच्या जमिनीत जिराईत व बागाईत क्षेत्रात येते.
 • जिराईत करडईचे पीक हे जमिनीत साठविलेल्या ओलाव्यावर येते.
 • करडईसाठी एकूण २५ ते ३० सें.मी. पाणी लागते व हे पाणी दोन पाळ्यांत देता येते.

हरभरा

 • शेतकऱ्यांना केवळ दोनच पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असल्यास गहू, सूर्यफूल अथवा ज्वारी पीक घेण्याऐवजी हरभ­ऱ्याचे पीक घ्यावे.
 • मध्यम खोल, परंतु पाण्याचा निचरा होणा­ऱ्या जमिनीत हरभरा पिकाची पेरणी करावी.
 • हरभरा पिकास जास्त पाणी सहन होत नाही. त्यामुळे पिकाच्या उत्पादनात घट येते. कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विकास, आकाश, दिग्विजय या हरभ­ऱ्याच्या पारंपरिक जातींना तर पाण्याच्या जास्त पाळ्या अजिबात सहन होत नाहीत.
 • हरभ­रा पिकाला सर्वसाधारणपणे एकूण २५ ते ३० सें.मी. पाणी लागते.

अतिरिक्त पाणी टाळावे...

 • जमिनीत प्रमाणापेक्षा जास्त ओलावा किंवा कमी ओलावा असल्यास, त्याचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
 • पिकांना जरुरीपेक्षा जास्त पाणी दिले गेल्यास कालांतराने ती जमीन नापीक बनते. दिलेल्या खतांचा पाण्यासोबत निचरा होऊन अपव्यय होतो. कालांतराने अशा जमिनी पाणथळ व चिबड होतात. या जमिनींना ग्रामीण भागामध्ये क्षारयुक्त किंवा मीठ फुटलेल्या जमिनी म्हणतात. हे टाळण्यासाठी पाण्याचा योग्य वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.
पीक  पाण्याच्या   एकूण
पाळ्या
पाण्याची    एकूण गरज
(सें.मी.) 
पाण्याच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्था  पेरणीनंतरचा कालावधी (दिवस)
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन
गहु   ४-५   ४० 

१) मुकुटमुळे फुटण्याची अवस्था 

२) फुटवे फुटण्याची अवस्था

३) पीक फुलो­ऱ्यात असताना

४)दाणे पिकात असताना 

२०-२१

 

४०-४२

   

 

६०-६५

 

८०-८५

रब्बी ज्वारी ३   ३९-४१  

१)गर्भावस्था

२) पीक फुलो­ऱ्यात असताना

३) दाणे भरण्याची अवस्था 

२८-३०

७०-७५

९०-९५

हरभरा  २   २५-३० 

 १) पिकास फांद्या फुटताना

२) घाटे भरताना

३०-३५

 

 ६०-६५

करडई २   २५-३० 

१) पिकाची लुसलुशीत वाढीची अवस्था

२) पीक फुलावर असताना

२५-३०

 

५०-६०

सुर्यफुल ४५-४८

 १) रोपवस्था

२) फूुलकळ्या लागण्याची अवस्था

    ३) फुलो­ऱ्यात असताना

 ४) दाणे भरण्याची अवस्था

 १५-२०

 

३०-३५

 

 

४०-४५

 

 

६०-६५

मोहरी  २०-२५

 १) पेरणीच्या वेळेस

 २) फांद्या फुटण्याच्या वेळेस

३) फुलावर येण्याच्या वेळी 

 

३०-३५

 

४५-५०

 

संपर्क ः डॉ. वा. नि. नारखेडे, ०९८२२९९२८६४

(मुख्य कृषिविद्यावेत्ता, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

 

इतर अॅग्रो विशेष
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...
कांदा निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपातनवी दिल्ली : केंद्र सरकारने कांद्यावरील...
जमीन आरोग्यपत्रिकांसाठी एप्रिलपासून '...पुणे ः महाराष्ट्रात सुरू असलेल्या जमीन...
फक्त फळ तुमचे, बाकी सारे मातीचे..! नैसर्गिक शेतीचे प्रणेते म्हणून संपूर्ण...
असा घ्यावा मातीचा नमुना मातीचा नमुना तीन ते चार वर्षांनंतर एकदा घेतला...
हिरवळीच्या खतांवर भर द्या : सुभाष शर्मायवतमाळ येथील सुभाष शर्मा यांच्याकडे वीस एकर शेती...
कापूस आयात शुल्कवाढीचा विचारमुंबई ः केंद्र सरकारने देशांतर्गत शेतमालाचे दर...
कृषी संजीवनी प्रकल्पाचे एक पाऊल पुढेमुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि खारपाण पट्ट्यातील ५,...
कृषी, घरगुती पाणी वापर दरात १७ टक्के...मुंबई: महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने...
फळबागेचे फुलले स्वप्न‘माळरानात मळा फुलला पाहिजे` हे वडिलांचे वाक्‍य...
नांदूरमध्यमेश्वरच्या पक्षी महोत्सवास...नाशिक : महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळखले जाणारे...
रसायन विरहित फायद्याची शेती शक्य भारतात आज नेमकी सेंद्रिय व नैसर्गिक शेती...
राज्यातील जमिनीत जस्त, लोह, गंधक,...डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद...