agriculturai stories in marathi, grapes advice, powdery mildew in grapes | Agrowon

भुरीसह थंडीपासून वाचवा द्राक्षबागा
डॉ. एस. डी. सावंत
गुरुवार, 4 जानेवारी 2018

सर्व द्राक्ष विभागांमध्ये सध्या थंडीची लाट आहे. ही लाट येत्या शनिवार-रविवारपर्यंत (ता. ६, ७) अशीच राहील. शनिवार-रविवारनंतर सर्वच विभागांमध्ये कमी-जास्त प्रमाणामध्ये वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. याच काळामध्ये दुपारचे तापमान सर्व विभागामध्ये ३० अंश सेल्सिअसच्या पुढे जाईल. सांगली, सोलापूर भागांमध्ये ३४-३५ अंश, तर नाशिक-पुणे भागामध्ये ३२-३३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. ढगाळ वातावणामुळे रात्रीचे तापमान बऱ्यापैकी वाढेल. ते नाशिक भागामध्ये १७-१८ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. सांगली, सोलापूरमध्ये तापमान २० ते २१ पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

सर्व द्राक्ष विभागांमध्ये सध्या थंडीची लाट आहे. ही लाट येत्या शनिवार-रविवारपर्यंत (ता. ६, ७) अशीच राहील. शनिवार-रविवारनंतर सर्वच विभागांमध्ये कमी-जास्त प्रमाणामध्ये वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. याच काळामध्ये दुपारचे तापमान सर्व विभागामध्ये ३० अंश सेल्सिअसच्या पुढे जाईल. सांगली, सोलापूर भागांमध्ये ३४-३५ अंश, तर नाशिक-पुणे भागामध्ये ३२-३३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. ढगाळ वातावणामुळे रात्रीचे तापमान बऱ्यापैकी वाढेल. ते नाशिक भागामध्ये १७-१८ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. सांगली, सोलापूरमध्ये तापमान २० ते २१ पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये भुरीच्या नियंत्रणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. बहुतांशी बागा या सर्वसाधारणपणे छाटणीनंतरच्या ७० दिवसांपुढे आहेत. आता ट्रायअझोल किंवा एचडीएचआय गटातील कोणतीही बुरशीनाशके भुरीच्या नियंत्रणासाठी वापरल्यास त्यांचे रेसिड्यू एमआरएलपेक्षा कमी झाले तरीही निदर्शनास येणार, हे नक्की. या दृष्टीकोनातून विचार केल्यास एक ते दोन वेगवेगळ्या बुरशीनाशकांचा वापर जास्त वेळा करावा. त्यामुळे एक ते दोन रसायनापेक्षा जास्त उर्वरित अंश अहवालात दिसणार नाहीत. त्यासाठी शक्यतो सल्फर व त्यानंतर जैविक नियंत्रक घटकांची फवारणी भुरीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरेल. एअर ब्लास्ट नोझल किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक तंत्रज्ञान असणाऱ्या फवारणी यंत्रामध्ये सर्वसाधारपणे एकरी १०० लिटर पाणी जाईल, अशी व्यवस्था करावी व त्यानंतर सल्फर (८० डब्ल्यूजी) एकरी ६०० ते ८०० ग्रॅम फवारल्यास भुरीचे नियंत्रण चांगले मिळते. मण्यावर डागही दिसत नसल्याचा बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव आहेत. डाग न येता सल्फर फवारणीचे तंत्रज्ञान शक्य तेवढे आत्मसात करावे.

  • फक्त सल्फर वापरलेल्या बागांमध्ये जैविक नियंत्रणाचा वापर केल्यास भुरीच्या नियंत्रणाला मदत होईल. दोन सल्फरच्या फवारणीमध्ये एक जैविक नियंत्रण घटकांची (अॅम्पिलोमायसीस किंवा ट्रायकोडर्मा किंवा बॅसिलस सबटिलिस) फवारणी घेतल्यास बागेमध्ये भुरी वाढणार नाही.
  • मागील सल्ल्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ७५ दिवसांपर्यंत कॅल्शिअम पूर्तता करण्यासाठीच्या फवारण्या भुरीच्या नियंत्रणासाठीही मदत करतात.
  • मोनो पोटॅशिअम फॉस्फेट किंवा एसओपी मण्यांवर वापरल्यास भुरीचे नियंत्रण चांगले मिळते.

थंडीचे परिणाम ः

  • मण्यांमध्ये पाणी भरण्यास सुरवात झालेल्या बागांमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये (प्रामुख्याने सकाळ व दुपारच्या तापमानामध्ये २० अंशांपेक्षा अधिक फरक असताना) पिंक बेरी वाढण्याची शक्यता असते. या कारणासाठी मण्यात पाणी भरण्यास सुरवात होण्याच्या काळात घडावर पेपर लावतात. हे पेपर लावण्याआधी भुरीच्या नियंत्रणासाठी चांगली फवारणी करून घ्यावी. पेपर चढवल्यानंतर मण्यामध्ये भुरी वाढणार नाही. पेपर चढवण्याआधी मण्यावर बॅसिलस सबटिलिस या जिवाणूजन्य घटकांची फवारणी भुरीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकेल.
  • ज्या ठिकाणी अजूनही जास्त थंडी आहे, अशा बागांच्या बाहेर रात्रीच्या वेळी शेकोटी लावाव्यात. थंडीने खराब होणारे घड वाचवता येतील. त्याचप्रमाणे सिलिसिलिक अॅसिड फवारणीसाठी वापरल्यास मण्यांची फार कमी तापमानामध्ये किंवा दुपारच्या जास्त तापमानासाठी सहनशीलता वाढते.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...