कांदा - लसूण पीकसल्ला

कांदा सल्ला
कांदा सल्ला

सद्यस्थितीत खरीप कांदा काढणीस आला आहे, तर रांगडा कांद्याचे पीक शेतामध्ये उभे आहे. शेतकऱ्यांच्या रोपवाटिकांमध्ये दहा ते पंधरा दिवसांची रब्बी कांद्यांची रोपे आहेत. तसेच लसूण व बीजोत्पादनाकरिता लावलेल्या कांद्यांची रोपेसुद्धा काही शेतकऱ्यांच्या शेतात दिसून येतात. त्यांचे खालीलप्रमाणे व्यवस्थापन करावे.

खरीप कांदा

  • पिकाची काढणी वेगवेगळ्या जातींनुसार पुनर्लागवडीनंतर १००-११० दिवसांनी करावी. खरिपात कांदा तयार झाला तरी माना पडतीलच असे नाही. अशा वेळी पीक काढणीच्या दोन किंवा तीन दिवस आधी रिकामा बॅरल फिरवून कृत्रिमरीत्या माना पाडून घ्याव्यात.
  • शेत कोरडे असताना पीक काढणी करावी. कांदा काढणीनंतर तो शेतामध्ये पातीसह तीन दिवस सुकण्यास पडू द्यावा.
  • कांद्याची पूर्ण सुकलेली पात २ ते २.५ सें.मी. लांब मान ठेवून कापावी. नंतर जोडकांदे, डेंगळे आलेले कांदे आणि चिंगळी कांदे काढून टाकावेत. चांगले कांदे गोळा करून सावलीत १०-१२ दिवस राहू द्यावेत.
  • खरिपातील कांदा काढणीवेळी पावसाची शक्‍यता असते. जर २-३ दिवस पावसाची शक्‍यता वाटत असल्यास काढणी लवकर (म्हणजेच पुनर्लागणीनंतर ९०-१०० दिवसांनी) सुद्धा करता येईल. मात्र असे कांदे ताबडतोब बाजारात विकावेत.
  • रांगडा कांदा :

  • पावसामुळे साठलेले पाणी शेताबाहेर काढावे.
  • नत्राचा पहिला हप्ता ३५ किलो प्रति हेक्‍टर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा.
  • पुनर्लागवडीनंतर ४०-६० दिवसांनी खुरपणी करावी.
  • नत्र खताचा दुसरा हप्ता ३५ किलो प्रति हेक्‍टर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावा.
  • सूक्ष्मअन्नद्रव्य मिश्रण (ग्रेड- २) ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणात पुनर्लागवडीनंतर ३०, ४५ आणि ६० दिवसांनी फवारणी करावी.
  • पीक संरक्षण : काळा करपा :

  • लक्षणे : पानांवर पाणीदार फिकट पिवळसर ठिपके निर्माण होतात. प्रादुर्भाव वाढल्यास संपुर्ण पान करपते.
  • नुकसान : प्रादुर्भावग्रस्त पाने कोमेजतात व गळ होते.
  • अनुकूल वातावरण - सलग तीन दिवस पाऊस, ८५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक सापेक्ष आर्द्रता आणि ढगाळ वातावरण
  • नियंत्रण - फवारणी प्रतिलिटर बेनोमिल २ ग्रॅम
  • फुलकीडे व करपा रोग फुलकीड :

  • लक्षणे : पिल्ले व प्रौंढ पानातून रसशोषण करतात. त्यामुळे पानांवर पांढरे ठिपके किंवा पट्टे दिसतात.
  • नुकसान : प्रकाशसंश्‍लेषण क्रियेवर परिणाम होऊन पीक लवकर पक्वतेस येते. उत्पादनात मोठी घट होते. फुलकिडींनी केलेल्या जखमांमुळे इतर रोगांचा पिकात शिरकाव होतो.
  • फवारणी प्रतिलिटर मॅंकोझेब २.५ ग्रॅम अधिक मिथोमिल ०.८ ग्रॅम वेळ : काळा करपा रोगासाठी फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने फवारणी घ्यावी.
  • रब्बी कांदा रोपवाटिका

  • पेरणीनंतर २० दिवसांनी खुरपणी करावी.
  • खुरपणीनंतर पाच गुंठे (५०० वर्ग मीटर) क्षेत्रासाठी २ किलो नत्र द्यावे.
  • ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीने जमिनीच्या मगदूरानुसार १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
  • रोपवाटिकेतील पीक संरक्षण मातीतून पसरणारे रोग (उदा. मुळकूज) नियंत्रण : मुळकूज :

  • लक्षणे : मुळे गुलाबी किंवा जांभळसर रंगाची होतात. प्रादुर्भाव वाढल्यास मुळांची मर होते.
  • नुकसान :  कांदा आकाराने लहान राहतो. अधिक तीव्रतेमध्ये रोपांची मर होते.
  • फवारणी प्रतिलिटर मेटालॅक्‍सिल अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम
  • फुलकीड नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर फिप्रोनील १ मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस १ मि.ली.

    काळा करपा रोग नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर मॅंकोझेब १ ग्रॅम

    जांभळा व तपकिरी करपा रोगनियंत्रण : ट्रायसायक्‍लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्‍साकोनॅझोल १ मि.लि.

    कांदा बीजोत्पादनाची रोपे :

  • नत्राचा पहिला हप्ता ३० किलो प्रति हेक्‍टर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा.
  • नत्राचा दुसरा हप्ता ३० किलो प्रति हेक्‍टर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावा.
  • पीकसंरक्षण करपा रोग व फुलकीड नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर

  • ट्रायसायक्‍लॅझोल १ ग्रॅम अधिक मिथोमिल १ ग्रॅम
  • १५ दिवसांच्या अंतराने फवारणी : प्रोफेनोफॉस १ मि.लि. अधिक मॅंकोझेब १.५ ग्रॅम
  • दुसऱ्या फवारणीनंतरही फुलकिडे व करपा रोगाचे पूर्ण नियंत्रण न झाल्यास, कार्बोसल्फान १ मि.लि. अधिक हेक्‍साकोनॅझोल १ मि.लि.
  • लसूण :

  • नत्राचा पहिला हप्ता २५ किलो प्रति हेक्‍टर याप्रमाणात पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांनी  द्यावा.
  • नत्राचा दुसरा हप्ता २५ किलो प्रति हेक्‍टर याप्रमाणात पुनर्लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावा.
  • पुनर्लागवडीनंतर ३०, ४५ आणि ६० दिवसांनी सूक्ष्मअन्नद्रव्य मिश्रण (ग्रेड- २) ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
  • पीक संरक्षण करपा व फुलकीड (फवारणी प्रतिलिटर)

  • कार्बोसल्फान २ मि.लि. अधिक ट्रायसायक्‍लॅझोल १ ग्रॅम
  • १५ दिवसांनी गरजेनुसार दुसरी फवारणी,
  • मिथोमिल १ ग्रॅम अधिक मॅंकोझेब १ ग्रॅम
  • गरजेनुसार दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी,
  • प्रोफेनोफॉस १ मि.लि. अधिक हेक्‍साकोनॅझोल १ मि.लि.
  • रब्बी कांदा व लसूण साठवणूक ः

  • कांद्याची सड आणि कोंब येणे या समस्या टाळण्यासाठी साठवणुकीतील कंदांवर नियमितपणे देखरेख ठेवावी. सडलेले कंद तात्काळ काढून टाकावेत. कांदा चाळीत हवा खेळती राहील अशी व्यवस्था करावी.
  • कांद्याचे ढीग फक्त ४-५ फूट उंचीपर्यंत ठेवून योग्यप्रकारे पसरवावे.
  • लसणाच्या गड्ड्या पातींसह हवादार चाळींमध्ये लटकवून किंवा वरच्या दिशेने निमुळते होत गेलेले वर्तुळाकार ढीग करून साठवून ठेवाव्यात.
  •  संपर्र्क : डॉ. शैलेंद्र गाडगे, ९९२२४९०४८३ (कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com