agriculturai stories in marathi, pest- disease advice, rice | Agrowon

भातावरील पर्ण करपा, कडा करपा रोग नियंत्रण
डॉ. अनिल गायकवाड, डॉ. चंद्रशेखर क्षीरसागर, डॉ. युवराज बालगुडे
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

राज्यात भातामध्ये अनेक ठिकाणी पर्ण करपा व कडा करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी तातडीने खालील उपाययोजना कराव्यात.

पर्ण करपा ः
रोगकारक बुरशी ः रिंकोस्पोरियम ओरायझी
लक्षणे ः सुरवातीला पानाचे टोक किंवा कडेवर अर्धवर्तुळाकार फिक्कट ठिपके येतात. पुढे ते रुंद होत तपकिरी होतात. पानांचे शेंडे व काही वेळेस पानांचा मधला भागही करपलेला दिसतो.

राज्यात भातामध्ये अनेक ठिकाणी पर्ण करपा व कडा करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी तातडीने खालील उपाययोजना कराव्यात.

पर्ण करपा ः
रोगकारक बुरशी ः रिंकोस्पोरियम ओरायझी
लक्षणे ः सुरवातीला पानाचे टोक किंवा कडेवर अर्धवर्तुळाकार फिक्कट ठिपके येतात. पुढे ते रुंद होत तपकिरी होतात. पानांचे शेंडे व काही वेळेस पानांचा मधला भागही करपलेला दिसतो.

नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर
कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा
प्रोपीकोनॅझोल १ मि.लि. किंवा
मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल १ मि.लि.

  • यासोबत स्टिकर १ मि.लि. या प्रमाणात मिसळावे.
  • आवश्यकतेनुसार दोन ते तीन फवारण्या बुरशीनाशक बदलून १० दिवसांच्या अंतराने कराव्यात.

कडा करपा ः
रोगकारक जिवाणू ः झान्थोमोनस ओरायझी पी. व्ही. ओरायझी

लक्षणे ः

  • पानाचे शेंडे व कडा फिक्कट हिरव्या होऊन करपतात. पुढे त्यांचा रंग राखाडी ते फिक्कट तपकिरी होतो. हिरवट भागाजवळच्या कडा सरळ न राहता वेड्यावाकड्या असतात.
  • रोगग्रस्त भागातून जिवाणूद्वारे द्रव पाझरल्यामुळे पानावर असंख्य पिवळसर दवबिंदू असल्याप्रमाणे दिसते. या द्रवामुळे रोगाचा प्रसार वेगाने होतो.
  • रोगग्रस्त भागाचा स्पर्श खडबडीत लागतो.

अनुकूल वातावरण ः
उष्ण तापमान (२७ ते ३२ अंश सेल्सिअस), अधिक आर्द्रता (५५ टक्क्यांपेक्षा अधिक) रोगप्रसारासाठी अनुकूल असते.

नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर
कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन* ०.२० ते ०.२५ ग्रॅम अधिक स्टिकर १ मि.लि.
आवश्यकतेनुसार पुढील फवारणी १० ते १५ दिवसांच्या अंतराने करावी.

संपर्क ः ०२११४-२७२५४८
डॉ. अनिल गायकवाड, ९४२०४९८८११

(लेखक डॉ. क्षीरसागर, डॉ. बालगुडे हे कृषी संशोधन केंद्र, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे येथे, तर डॉ. गायकवाड हे अळिंबी सुधार प्रकल्प, कृषी महाविद्यालय, पुणे येथे कार्यरत आहेत.)

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
कोरडवाहू शेतकऱ्यांकडे लक्ष कधी देणार?आज घडीला कोरडवाहू शेतकरी मित्रांना एक विवंचना...
उद्विग्न शेतकरी; उदासीन बॅंकामृग नक्षत्र चार दिवस बरसल्यानंतर पावसाने उघडीप...
सतर्क राहा ! बियाणे खरेदीतील फसवणूक...पुणे : खरिपाची लगबग प्रत्येक शिवारापासून ते...
कृषिक्षेत्रात काॅर्पोरेट गुंतवणुकीसाठी...नवी दिल्ली : भारतातील कृषिक्षेत्रात काॅर्पोरेट...
यवतमाळात दोन दिवसांत ३० कोटींचे पीककर्ज...यवतमाळ : पेरणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी...
पीककर्ज वाटपात गोंधळचअकोला : शेतकऱ्याला शेतातील कुठलेही काम करणे कठीण...
अल्पभूधारकांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी...केवळ शिक्षण आहे म्हणून व्यवसाय यशस्वी होत नाही,...
खरिपाची पेरणी ९३ लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः देशात यंदा वेळेवर मॉन्सून दाखल...
शेतकऱ्यांच्या जीवनात ‘ॲग्रोवन’चे...सातारा : जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाल्याने...
कीटकनाशक कक्षाला कमकुवत ठेवण्यात ‘यश’पुणे : विषबाधा, अप्रमाणित मालाचा पुरवठा यामुळे...
...आता बॅंकेसमोरच जीव द्या लागतेयवतमाळ : कर्जाच्या फायलीसाठीच दहा हजार खर्च झाला...
बचत गटाने दिली शेती, पूरक व्यवसायाला साथचिंचोली काळदात (ता. कर्जत, जि. नगर) गावातील दहा...
फळबागेतून माळरान झाले हिरवेगारमिरज शहरात वकिली करताना चंद्रशेखर शिवाजीराव...
चांगला निर्णय; पण उशिरानेच!बीटीबाबत बोंड अळ्यांमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण...
प्रवास त्रिशुळी नदीबरोबरचा‘नेपाळ’ हा दक्षिण आशियामधील चीन, भारत आणि...
खाद्यतेलांचे आयात शुल्क वाढविले;...नवी दिल्ली/पुणे : देशातील सोयाबीनसह तेलबिया...
पीककर्जप्रश्‍नी जिल्हाधिकाऱ्यांचा...यवतमाळ/अकोला : राज्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप...
कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र...
आंबा महोत्सवात १५ कोटींची उलाढालपुणे ः शेतकरी ग्राहक थेट आंबा विक्री...
‘डीबीटी’तून औजारे वगळण्यासाठी 'आयमा'चा...पुणे: डीबीटीतून सुधारित औजारे वगळण्यासाठी...