agriculturai stories in marathl, agrowon, technowon, machines for KARALE (BITTER GAURD) processing | Agrowon

कारल्याचे प्रक्रियायुक्त पदार्थ
डॉ. आर. टी. पाटील
सोमवार, 12 मार्च 2018

कारले हे कडू असले तरी आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे आहे. कारल्याच्या रसापासून विविध पदार्थांना मागणी वाढत आहे. कारल्याचे वाळवलेले काप, भुकटी हे अधिक काळ टिकू शकतात. आरोग्यासाठी जागरूक लोकांमध्ये कारल्याच्या चहा लोकप्रिय बनत आहे.

कडूपणासाठी प्रसिद्ध असलेले कारले
(शा. नाव ः Momordica charantia) आरोग्यवर्धक गुणधर्मासाठीही तितकेच प्रसिद्ध आहे. आशिया उपखंडामध्ये आहारामध्ये भाजी स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात वापरही होतो.

कारले हे कडू असले तरी आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे आहे. कारल्याच्या रसापासून विविध पदार्थांना मागणी वाढत आहे. कारल्याचे वाळवलेले काप, भुकटी हे अधिक काळ टिकू शकतात. आरोग्यासाठी जागरूक लोकांमध्ये कारल्याच्या चहा लोकप्रिय बनत आहे.

कडूपणासाठी प्रसिद्ध असलेले कारले
(शा. नाव ः Momordica charantia) आरोग्यवर्धक गुणधर्मासाठीही तितकेच प्रसिद्ध आहे. आशिया उपखंडामध्ये आहारामध्ये भाजी स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात वापरही होतो.

आरोग्यासाठी फायदे ः
कारल्यातून फॉस्फरस आणि लोहासोबतच भरपूर प्रमाणात क जीवनसत्त्व, आणि काही प्रमाणात अ जीवनसत्त्व मिळते.

  1. रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी ः कारल्यामध्ये इन्सुलिनसारखे संयुग पॉलिपेप्टाईड-पी असून, नैसर्गिकरीत्या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. नियमितपणे २००० मिलिग्रॅम या प्रमाणात कारले आहारात असल्यास टाइप २ प्रकारच्या मधुमेहींच्या रक्तातील शर्करेचे मात्रा कमी होण्यास मदत होते. कारल्यातील वनस्पतिजन्य इन्सुलिनचा टाइप १ मधुमेहामध्येही फायदा होतो.
  2. बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी ः कारल्यातील लोह आणि फोलिक आम्लामुळे हृदयरोग, पक्षाघात यांचा धोका कमी होतो. पोटॅशिअमचे प्रमाण भरपूर असल्याने, ते शरीरातील अतिरिक्त सोडियमचे शोषण करते. त्याचा फायदा रक्तदाब स्थिर ठेवण्यात होतो.
  3. त्वचा व केसांच्या चमकदारपणांसाठी ः त्वचेवरील वार्धक्यांच्या खुणा कमी करण्यामध्ये कारल्यातील अॅँटिऑक्सिडन्ट घटक व जीवनसत्त्व अ आणि क महत्त्वाचे ठरतात. त्वचेवरील पुरळ, एक्झिमा आणि सोरायसीसचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. हानिकारक अतिनील किरणांमुळे त्वचेवर होणारे विपरीत परिणाम कमी होतात. कारल्याचा रस डोक्यामध्ये लावल्यास केस गळण्याचे, पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते. दुहेरी केस, केसांचा रखरखीतपणा, कोंडा कमी होतो.
  4. यकृताच्या स्वच्छतेसाठी ः कारल्यातील मोमोर्डिका चॅराटिया या संयुगामुळे युकृतातील आरोग्यकारक विकरांमध्ये (एंझायम्स) वाढ होते.
  5.  वजन कमी करण्यासाठी ः कॅलरी, मेद आणि कर्बोदकांचे प्रमाण कमी असल्यामुळे वजन कमी करण्याच्या आहारामध्ये त्यांचा समावेश केला जातो. यामुळे पोट भरल्याची भावना अधिक काळ राहते. कारल्याच्या रसामध्ये स्थौल्यत्व कमी करण्याचे गुणधर्म आहेत.
  6. प्रतिकारकता वाढवण्यासाठी ः विषाणू, जिवाणूंशी लढण्याची क्षमता असल्याने विविध अॅलर्जी रोखण्यासाठी उपयुक्त. ल्युकेमियासह विविध प्रकारच्या कर्करोगांविरुद्ध उपचारामध्ये फायदेशीर ठरू शकतात.
  7. डोळ्यांसाठी ः यातील बीटी कॅरोटिन आणि जीवनसत्त्व ‘अ’मुळे दृष्टीसंबंधी समस्यावर फायदेशीर. त्यासाठी प्रतिदिन ३० मिलि कारले रस घेण्याची शिफारस आहे.
  8. बद्धकोष्ठता रोखण्यासाठी ः कारले हा नैसर्गिक उपाय असून, त्यातील अन्य वाईट परिणाम दिसत नाहीत.

काढणी ः
अपक्व अवस्थेमध्ये योग्य आकार व रंग आल्यानंतर कारल्याची काढणी केली जाते. त्याची साल घट्ट व चमकदार असावी. कारले देठासह काढावे. मोठ्या गोल आकाराच्या जातींची काढणी व हाताळणी काळजीपूर्वक करावी. अधिक पक्वता झाल्यास कारले मऊ आणि बिया मोठ्या होतात.

कारल्याचे विविध पदार्थ

  • योग्य रंग आल्यानंतर ही फळे वाळवून बिगर हंगामामध्ये वापरली जातात. त्याच प्रमाणे कारल्याचे स्ट्यू किंवा लोणचेही करतात.
  • कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी ती मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवतात. शिजवण्यापूर्वी साल खरवडून घेतली जाते. कारल्यातील पाणी काढून टाकल्यानंतर चौकोनी तुकडे किंवा गोलाकार रिंग स्वरूपामध्ये साठवले जातात. त्याचा वापर भाज्यांमध्ये, तर तपकिरी रंगाच्या कारल्याचा उपयोग चहा तयार करण्यासाठी होतो. वाळवलेल्या रिंग, तुकड्यांना देशी आणि निर्यातीच्या बाजारात चांगली मागणी आहे.
  • वाळवल्यानंतर कारली अधिक काळ टिकू शकतात. त्याचा फायदा साठवण, वाहतूक आणि पॅकेजिंगमध्ये होतो.
  • कारले वाळवणे 
  • सूर्यप्रकाशामध्ये कारल्याचे तुकडे वाळवून त्यातील पाण्याचे प्रमाण कमी करता येते. त्यासाठी स्वच्छ करून कारल्याचे काप करून ते उन्हात वाळवावेत. त्यातील पोषक घटक त्यात राहत असल्याने चांगली किंमत (३०० रुपये प्रतिकिलोपर्यंत) मिळते.

कारल्याचा चहा ः
कारल्याच्या चहाला गोयाह चहा या नावाने ओळखले जाते. आरोग्यवर्धक चहा म्हणून याला मागणी आहे. यकृत, पचन यांच्या समस्या, इन्फ्लुएंजा रोखण्यासाठी, घशाचा दाह यामध्ये उपयुक्त असून, रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करतो.

चहा तयार करण्याची पद्धत-

  • वाहत्या पाण्यामध्ये कारली स्वच्छ धुऊन घ्यावीत. मऊ स्पंजच्या साह्याने वरील पृष्ठभाग घासून साफ करावा.
  • लांबीच्या बाजूने दोन भाग करून, त्यातील गर व बिया चमच्याने काढून टाकाव्यात.
  • त्यानंतर कारल्याचे पातळ काप करून घ्यावेत. हे काप जितके पातळ असतील, तितक्या लवकर वाळतात आणि बारीक करणे सोपे जाते.
  • ट्रेमध्ये हे काप एका थरामध्ये ठेवून, त्यावर जाळी लावावी. म्हणजे कीटक आणि धूळ रोखली जाते.
  • हे ट्रे सूर्यप्रकाशामध्ये वाळण्यासाठी ठेवावेत. काही तासांनंतर उलट्या बाजूनेही वाळवून घ्यावेत. यासाठी वातावरणानुसार एक किंवा दोन दिवस लागू शकतात.
  • कॉफी ग्रायंडर किंवा फूड प्रोसेसरच्या साह्याने वाळवलेल्या कापांची भुकटी करून घ्यावी.
  • ही भुकटी हवाबंद डब्यामध्ये भरून थंड आणि कोरड्या जागेमध्ये साठवून ठेवावी.
  • एक चमचा कारल्याची भुकटी एक कप गरम पाण्यामध्ये टाकावी. काही मिनिटे ढवळ्यानंतर त्यात आपल्याला आवश्यक गोडी येईपर्यंत एक किंवा दोन चमचे मध टाकावा.
  • पाण्यामध्ये अधिक विद्राव्य कारले पावडर बनवण्याची पद्धत
  • कारल्यातील प्रोटिन्स, पॉलिसॉॅकराईड आणि फिनॉलिक, फ्लॅवोनॉईड, सॅपोनिन यांसारखे घटक मिळवण्यासाठी कारले फ्रिज ड्रायिंग किंवा हीटपंप ड्रायिंग पद्धतीने वाळवून बारीक करावे. या पद्धतीमध्ये अत्यंत बारीक (५० m पेक्षा कमी आकाराची) भुकटी मिळवता येते.

फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
पाणी बचत, दर्जेदार उत्पादनासाठी मल्चिंग...पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत...
शाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या...पुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
बटाटा स्टार्चपासून विघटनशील प्लॅस्टिकची...प्लॅस्टिकचा वापर सातत्याने वाढत असून, त्यातून...
केळी खोडापासून धागानिर्मिती तंत्रकेळी झाडाचे खोड, पानांचा उपयोग धागा...
शेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध...सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके...
हरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण...हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी...
गूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...
जलनियंत्रण बॉक्सद्वारे कमी करता येईल...अधिक काळ पाण्याखाली राहत असलेल्या जमिनीतून...
योग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू...
शेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरणनंदुरबार जिल्ह्यातील आडगाव (ता. शहादा) येथील...
बॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल...सध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत....
छोट्या यंत्रांनी होतील कामे सुलभया वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी...
पेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो...बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा...
कमी वेळेत चांगल्या मशागतीसाठी रोटाव्हेटर१९३०च्या दशकात रोटरी कल्टिव्हेटर (रोटा + व्हेटर)...
पाच मिनिटांत एका एकरवर फवारणी !...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...
रोपांच्या मुळांची गुंडाळी टाळण्यासाठी...ट्रे किंवा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये रोपांची...
आरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...
सुधारित अवजारे करतात कष्ट कमीवैभव विळा : १) गहू, ज्वारी, गवत कापणी जमिनीलगत...
सुधारित ट्रेलरमुळे कमी होईल अपघाताचे...ट्रॅक्टर व उसाने भरलेला ट्रेलर हे ग्रामीण...