agricultural marathi news, weekly weather advisary | Agrowon

ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पावसाची शक्‍यता
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 17 मार्च 2018

महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल तर अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर केवळ १००८ हेप्टापास्कल तसेच उत्तर प्रदेश, दिल्ली, हिमाचल प्रदेश व सिक्कीमवरही १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे या आठवड्यात ढगाळ हवामान राहील आणि तुरळक ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता राहील. १८ मार्च रोजी मध्य ते दक्षिण भारत या संपूर्ण भागावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील तर सिक्कीम, हिमाचल प्रदेश व उत्तर प्रदेशवर १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे वारे दक्षिण भारतातून उत्तर भारताच्या दिशेने वाहतील आणि येताना मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणून ढग निर्मिती होऊन पाऊस होईल.

महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल तर अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर केवळ १००८ हेप्टापास्कल तसेच उत्तर प्रदेश, दिल्ली, हिमाचल प्रदेश व सिक्कीमवरही १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे या आठवड्यात ढगाळ हवामान राहील आणि तुरळक ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता राहील. १८ मार्च रोजी मध्य ते दक्षिण भारत या संपूर्ण भागावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील तर सिक्कीम, हिमाचल प्रदेश व उत्तर प्रदेशवर १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे वारे दक्षिण भारतातून उत्तर भारताच्या दिशेने वाहतील आणि येताना मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणून ढग निर्मिती होऊन पाऊस होईल. १९ व २० मार्च रोजी ही स्थिती कायम राहील.

२१ मार्च रोजी कर्नाटक ते केरळ भागावर १०१० तसेच मध्य महाराष्ट्रापासून पूर्वेस १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे ढगाळ हवामान आणि अल्पशा पावसाची शक्‍यता राहील. केरळ भागावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. २२ मार्च रोजी उत्तर ते मध्य व पश्‍चिम भारतावर तसेच मराठवाडा व विदर्भावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र राहील. त्यामुळे हवामान ढगाळ राहून पावसाची शक्‍यता निर्माण होईल. तसेच कोलकता भागावर १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे वारे वाहतील आणि पावसास वातावरण अनुकूल बनेल. हा पाऊस लागून राहणार नाही. मात्र तुरळक ठिकाणी महाराष्ट्रात तो होत राहील. १७ व १८ मार्च रोजी मध्य महाराष्ट्र विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्‍यता असून, दिनांक १९ ते २१ मार्च या काळात अत्यंत तुरळक ठिकाणी म्हणजे मराठवाड्याचा काही भाग व पश्‍चिम महाराष्ट्राच्या काही भागांत अत्यंत तुरळक ठिकाणी आणि २२ ते २३ मार्च रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात चांगल्या पावसाची शक्‍यता आहे.

कोकण ः
संपूर्ण कोकणात १७ रोजी व त्यापुढे अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. रायगड जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील तर रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील तर रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यात ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५४ टक्के रत्नागिरी जिल्ह्यात राहील. तर सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६७ टक्के राहील. ठाण जिल्ह्यात ८१ टक्के इतकी सकाळची सापेक्ष आर्द्रता राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात ३८ टक्के राहील तर सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यात ४४ ते ५० टक्के राहील. ठाणे जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५ किलोमीटर तर उर्वरित जिल्ह्यात ताशी ६ किलोमीटर राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याची दिशा पूर्वेकडून राहील तर उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र ः
उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता असून १७ मार्च रोजी ती ३ ते ५ मिलिमीटर अपेक्षित आहे. नाशिक व धुळे जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ किलोमीटर राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस आणि उर्वरित जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. हवामान ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात ५१ टक्के तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ५९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात २१ टक्के तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत २३ टक्के राहील.

मराठवाडा ः
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत ३ ते ४ मिलिमीटर एवढी १७ मार्च रोजी पावसाची शक्‍यता असून वाऱ्याचा ताशी वेग नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत २ ते ४ किलोमीटर इतका कमी राहील तर उर्वरित जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत ताशी ६ किलोमीटर आणि लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत ताशी ७ ते ९ किलोमीटर राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात वारा इशान्येकडून वाहील तर लातूर जिल्ह्यात अग्नेयेकडून राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून वाहील. हिंगोली व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर उस्मानाबाद लातूर व परभणी जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस आणि नांदेड व बीड जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली व जालना जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील तसेच नांदेड, बीड, परभणी व औरंगाबाद जिल्ह्यांत ते २० अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४७ ते ६२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता हिंगोली व जालना जिल्ह्यांत ४३ टक्के व उर्वरित जिल्ह्यांत २२ ते ३० टक्के इतकी कमी राहील.

पश्‍चिम विदर्भ ः
बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांत १७ मार्च रोजी ४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा बुलडाणा जिल्ह्यात नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत ताशी २ ते ३ किलोमीटर इतका कमी राहील. तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत तो ५ ते ६ किलोमीटर राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा जिल्ह्यात ६५ टक्के राहील तर उर्वरित जिल्ह्यात ६० टक्के राहील आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा जिल्ह्यांत १५ टक्के आणि अकोला, वाशिम व अमरावती जिल्ह्यांत २० टक्के राहील. बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. वाशीम व बुलडाणा जिल्ह्यांत कमाल तापमान १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील आणि अकोला व अमरावती जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

मध्य विदर्भ ः
यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ४ ते ६ मिलिमीटर १७ मार्च रोजी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा यवतमाळ जिल्ह्यात दक्षिणेकडून, वर्धा जिल्ह्यात नैऋत्येकडून नागपूर जिल्ह्यात वायव्येकडून राहील. नागपूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ३ किलोमीटर राहील तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत तो ताशी ६ किलोमीटर राहील. वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १७ ते २१ अंश सेल्सिअस राहील.

पूर्व विदर्भ ः
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १७ मार्च रोजी ६ ते ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३ ते ४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. गडचिरोली जिल्ह्यात वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ३ किलोमीटर राहील. चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील तर गडचिरोली जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यात १७ ते १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० टक्के राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र ः
पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्हा वगळता सर्वच जिल्ह्यांत २ ते ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता १७ मार्च रोजी असून त्यापुढेही आठवडाभरात १८ तेच २२ व २३ मार्च रोजी चांगल्या पावसाचा अंदाज आहे. नगर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. सांगली जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १२ किलोमीटर राहील. तर उर्वरित जिल्ह्यात तो ताशी ५ ते ९ किलोमीटर राहील. सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील तर कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस आणि नगर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत ते २१ अंश सेल्सिअस राहील आणि सांगली, सातारा आणि नगर जिल्ह्यांत ते २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० टक्के राहील तर उर्वरित जिल्ह्यांत ५० ते ६५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते ५६ टक्के राहील.

कृषी सल्ला ः

  • आठवडाभर विविध भागात प्रतिदिनी अल्पशा पावसाची शक्‍यता असल्याने धान्य उन्हात वाळत घातले असल्यास पावसाची शक्‍यता लक्षात घेऊन ते सुरक्षित स्थळी साठवावे.
  • हळदीची काढणी करून हळद शिजवून उन्हात वाळत घातली असल्यास ती गोळा करून सुरक्षित ठिकाणी साठवावी.
  • तयार फळे अाणि भाजीपाला काढून बाजारात विक्री करावी.
  • पावसाची शक्‍यता लक्षात घेऊन शेतीकामांचे नियोजन करावे.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्‍ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अाणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...