कृषी सल्ला

आंबा फळांना पिशवी गुंडाळल्याने दर्जेदार फळनिर्मिती होते.
आंबा फळांना पिशवी गुंडाळल्याने दर्जेदार फळनिर्मिती होते.

भुईमूग उन्हामध्ये वाढ होत असल्याने भुईमूग पिकाला पेरणीनंतर १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पीक महिन्याचे झाले असल्यास फुलोरा अवस्थेत असेल. या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये. सपाट वाफ्यावर पिकास निंदणी करून भर देण्याचे काम सुरू करावे. त्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या स्वस्तिक या भरणी अवजाराचा वापर करावा. लागवडीनंतर ४५ ते ६० दिवसांनी पिकावर रिकामे पिंप फिरवावे. त्यामुळे पिकाच्या आऱ्या जमिनीत जाण्यास व शेंगा चांगल्या पोसण्यास मदत होते.

कडधान्य पिके तयार झालेल्या कडधान्य पिकांची सकाळी किंवा संध्याकाळी काढणी करून उन्हात व्यवस्थित वाळवावे. वाळलेल्या पिकाची संरक्षित ठिकाण साठवण करावी.

काजू या पिकावर ढेकण्या (टी मॉस्किटो) चा प्रादुर्भाव दिसून येताच, फवारणी प्रति लिटर लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि करपा रोगाच्या प्रादुर्भाव असल्यास, फवारणी प्रति लिटर थायोफिनेट मिथाईल १ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा प्रोपीनेब २ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम (१२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६३ टक्के) १ ग्रॅम (या कीटकनाशकास लेबल क्लेम नाही.) भाजीपाला   वांगी, टोमॅटो, मिरची, मिरची, नवलकोल या पिकांमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल (५ टक्के) ०.५ मि.लि. किंवा गंधक (८० टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. टीप : गंधकाची फवारणी प्रखर उन्हात टाळावी.

आंबा

  • तापमानातील बदलामुळे आंब्याची फळगळ होण्याची शक्यता आहे. फळधारणा झालेल्या आंबा झाडास १५० ते २०० लिटर पाणी याप्रमाणे १५ दिवसाच्या अंतराने दोन पाळ्या द्याव्यात. झाडाच्या बुंध्याभोवती आच्छादनाचा वापर करावा.
  • आंबा फळांना कागदी किंवा वर्तमानपत्रांच्या पिशव्यांचे आवरण घातल्यास फळमाशी, वाढते तापमान व काही ठिकाणी पडणाऱ्या हलक्या सरींपासून संरक्षण होते.
  • आंब्यावर करपा रोगाचा प्रदुर्भाव झाला असल्यास, त्याच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी थायोफिनेट मिथाईल १ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा प्रोपीनेब २ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (१२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६३ टक्के) १ ग्रॅम
  • फळधारणा झालेल्या आंबा झाडावरील मोहोर झाडून घ्यावा. त्यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.
  • तुडतुड्यांच्या प्रादुर्भाव असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी डायमिथोएट (३० टक्के प्रवाही) १ मिलि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि.
  • फळमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यांच्या नियंत्रणासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले रक्षक सापळे हेक्टरी चार या प्रमाणे लावावेत.
  • नारळ, सुपारी अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, हवेत वाढलेली आर्द्रता यामुळे फळगळ या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याच्या नियंत्रणासाठी १ टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.

  • नारळावर गेंडा भुंगा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेणखतांच्या खड्ड्यामध्ये मिथील पॅराथिऑन २ टक्के दाणेदार किंवा क्विनॉलफॉस २ टक्के दाणेदार या कीटकनाशकांचा वापर करावा. दर दोन महिन्यांनी असा वापर करावा.
  • सोंड्या भुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी खोडावर एक मीटर उंचीवर गिरमीटाच्या साह्याने १५ ते २० सेंमी खोल तिरपे छिद्र पाडावे. या छिद्रात क्लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही)२ मि.लि. प्रतिलिटर नरसाळ्याच्या साह्याने ओतावे. छिद्र सिमेंटच्या साह्याने बंद करून घ्यावे.
  • टीप : तज्‍ज्ञांच्या सल्‍ल्‍याने व पूर्ण काळजी घेऊन या शिफारसीचा अवलंब करावा.

  • सुपारीवर कोळे  (सुपारीची गळ) या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी, १ टक्के बोर्डो मिश्रण किंवा फोसेटिल ए.एल ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
  • संपर्क : ०२३५८ - २८२३८७ (कृषीविद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com