agricultural news in marathi, agro advisory, AGROWON, marathi | Agrowon

कृषि सल्ला : भाजीपाला, फळभाज्या
डॉ. यू. एन. आळसे, डी. डी. पटाईत, डॉ. एस. जी. पुरी
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

मिरची :

 • परभणी तेजस, पुसा ज्वाला, पंत सी-१, जी-४, आणि संकेश्‍वरी या वाणांची लागवड महिनाअखेरपर्यंत करावी.
 • प्रतिहेक्‍टरी १ किलो बियाणे वापरावे.
 • ६० बाय ६० सें.मी. किंवा ६० बाय ४५ से.मी. अंतरावर सरी वरंबा लागवड करावी.
 • लागवडीवेळेस ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश जमिनीत पेरुन द्यावे. लागवडीनंतर ४५ दिवसांनी ५० किलो नत्र बांगडी पद्धतीने द्यावे. खते दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे.

फ्लॉवर :

मिरची :

 • परभणी तेजस, पुसा ज्वाला, पंत सी-१, जी-४, आणि संकेश्‍वरी या वाणांची लागवड महिनाअखेरपर्यंत करावी.
 • प्रतिहेक्‍टरी १ किलो बियाणे वापरावे.
 • ६० बाय ६० सें.मी. किंवा ६० बाय ४५ से.मी. अंतरावर सरी वरंबा लागवड करावी.
 • लागवडीवेळेस ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश जमिनीत पेरुन द्यावे. लागवडीनंतर ४५ दिवसांनी ५० किलो नत्र बांगडी पद्धतीने द्यावे. खते दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे.

फ्लॉवर :

 • स्नोबॉल-१६, पुसा सिंथेटिक या वाणांची निवड करावी.
 • लागवडीसाठी २१ ते २५ दिवसांची रोपे निवडावीत.
 • लागवड ६० बाय ४५ सें.मी. अंतरावर नोव्हेंबर महिनाखेरपर्यंत संपवावी.
 • रोप प्रक्रिया- कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या द्रावणात रोपांची मुळे बुडवून लावावीत.
 • लागवड करताना १६० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ८० किलो पालाश अशी खते द्यावीत.

वाटाणा :

 • आरकेल, सिलेक्‍शन-८२, सिलेक्‍शन-९३ आदी वाणांची निवड करावी.
 • मध्यम ते भारी निचऱ्याच्या जमिनीत लागवड करावी.
 • लागवडीसाठी प्रतिहेक्‍टरी ७५ किलो बियाणे लागते.
 • लागवडीपूर्वी जमिनीत हेक्टरी २० टन शेणखत टाकावे. पेरणी ३० बाय १० किंवा ४५ बाय १० सें.मी. अंतरावर करावी.

मेथी :

 • पुसा अर्लिब्रांचींग, पुसा कसुरी, आरएमटी-१ सिलेक्‍शन आदी वाण निवडावेत.
 • प्रतिहेक्टरी २५ ते ३० किलो बियाणे आवश्यक.
 • बी फेकून किंवा सपाट वाफे (२५ से.मी. अंतरावर आणि ३ बाय २ मीटर आकार) करून पेरणी करावी.
 • लागवडीवेळी नत्र ५० किलो व स्फुरद ५० किलो अशी खते द्यावीत. मेथीच्या प्रत्येक कापणीनंतर ५० किलो नत्र द्यावे.

कोथिंबीर :

 • स्थानिक वाण शिंपी, डीडब्ल्यूडी-३, सीएस-४ आदींची निवड करावी.
 • प्रतिहेक्टरी ३०-४० किलो बियाणे आवश्यक.
 • मध्यम काळी जमिनीत हेक्टरी १० ते १२ गाड्या शेणखत टाकून लागवड करावी.
 • लागवडीसाठी १० बाय १५ सें.मी. अंतरावर सरी-वरंबे करावेत.

पालक :

 • ऑल ग्रीन, पुसा ज्योती, पुसा हरित या वाणांची निवड करावी.
 • प्रतिहेक्टरी ८ ते १० किलो बियाणे आवश्यक.
 • बी फेकून किंवा सपाट वाफे (२५ से.मी. अंतरावर आणि ३ बाय २ मीटर आकार) करून पेरणी करावी.
 • लागवडीवेळी नत्र ५० किलो व स्फुरद ५० किलो अशी खते द्यावीत. मेथीच्या प्रत्येक कापणीनंतर ५० किलो नत्र द्यावे.

गाजर :

 • नॉन्टेज, पुसा केशरी या वाणांची निवड करावी.
 • हेक्टरी ६ किलो बियाणे आवश्यक.
 • लागवडीसाठी मध्यम काळी ते हलकी जमीन निवडून लागवडीपूर्वी हेक्टरी २० टन शेणखत टाकावे.

नोव्हेंबर महिन्यात करावयाची कामे :

 • खरीप ज्वारी व बाजरीची कापणी करून उतारास आडवी नांगरट करावी.
 • रब्बी ज्वारीस पोटरी अवस्थेत पाणी द्यावे.
 • बागायती हरभरा व करडई पिकास पेरणीनंतर ४५ दिवसांनी पहिले पाणी द्यावे.
 • सूर्यफुलास बोंडे लागते वेळी व फुलोऱ्यात असताना पाणी द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी हेक्‍टरी ३० किलो नत्र द्यावे. 

संपर्क : डी. डी. पटाईत, ०२४५२-२२९०००
(कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
जळगावात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ११००...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
बारामती कृषी महाविद्यालय देशात रोल मॉडेलबारामती, जि. पुणे ः येथील कृषिक प्रदर्शनासाठी...
सांगली जिल्ह्यात तूर काढणी अंतिम...सांगली : जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ,...
मका विक्रीच्या रकमेसाठी जळगावमधील...जळगाव ः जिल्ह्यात खरिपातील मका विक्रीचे...
संपूर्ण कर्जमाफी; 'स्वामिनाथन'साठी...मुंबई : शेतकऱ्यांची कर्जमाफी, आत्मसन्मान योजना...
वाटाण्याच्या मुळांतील वैशिष्ट्यपूर्ण...पिकांची पांढरी मुळे ही खतांच्या शोषणामध्ये मोलाची...
साखर कारखानदारीला ५ हजार कोटींचा तोटाभवानीनगर, जि. पुणे ः साखरेच्या घसरलेल्या भावाचा...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ४७ टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांमध्ये...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या...औरंगाबाद : बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या...
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या केंद्राचा...मुंबई : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील चौथ्या...
खतांची कार्यक्षमता वाढवेल ठिबकचा वापरऊस पिकामध्ये केवळ पाटपाण्याऐवजी ठिबक सिंचनाचा...
मोसंबी बागेचे खत व्यवस्थापनप्रगत देशांमध्ये मोसंबीची उत्पादकता ही हेक्टरी २५...
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या...
हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणाजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
चिकू बागेत आच्छादन, पाणी व्यवस्थापन...चिकूचे झाड जस जसे जुने होते त्याप्रमाणे त्याचा...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...