राज्यात उष्ण, ढगाळ हवामान राहण्याची शक्यता

राज्यात उष्ण, ढगाळ हवामान राहण्याची शक्यता
राज्यात उष्ण, ढगाळ हवामान राहण्याची शक्यता

या आठवड्यात भारतातील हवेचे दाबात बदल होत असून वाऱ्याची दिशा दिनांक १४ मार्चपासून दक्षिणेकडून उत्तर दिशेस सुरू होईल. आगामी मॉन्सूनसाठी  तसेच मॉन्सूनपूर्व पावसासाठी हे एक शुभ  चिन्ह आहे. भारतात अकोला येथे सर्वोच्च कमाल तापमान नोंदले गेले आहे. यापूर्वी कोकणातील भिरा येथे सर्वोच्च तापमान नोंदले गेले होते. याचा अर्थ मान्सूनचा पाऊस चांगला होईल. परंतू तो सर्वत्र चांगला होईल का याचे उत्तर मिळण्यासाठी आणखी काही काळ निरीक्षणांची गरज लागणार आहे. दिनांक १० ते ११ मार्च या काळात महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावर समान हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतका राहील तर ईशान्य भारतावर ते १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक असेल. दिनांक १२ मार्च रोजी उत्तर भारतातील सिक्कीम व हिमाचल प्रदेशवर १००८ हेप्टापास्कल इतका कमी तर मध्य, पश्‍चिम व दक्षिण भारतावर १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील तेव्हापासूनच वाऱ्याच्या दिशेत बदल होण्यास सुरवात होईल आणि वारे दक्षिणेकडून  उत्तरेकडे वाहतील. वाऱ्याची दिशा कायम होईल. दिनांक १० व ११ रोजी विदर्भात हवामान ढगाळ राहील व अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाची शक्‍यता आहे. दिनांक १६ मार्च रोजी पालघर, मुंबई, नाशिक, ठाणे, धुळे भागांत आणि दि. १७ रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्‍यता आहे.

कोकण रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील तर ठाणे जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस आणि रत्नागिरी जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० टक्के तर सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात ६१ ते ६२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ टक्के राहील तर रायगड व ठाणे जिल्ह्यात केवळ २२ टक्के आणि रत्नागिरी जिल्ह्यात केवळ २३ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील.

उत्तर महाराष्ट्र नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील तर नंदूरबार जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील; नाशिक जिल्ह्यात ते १७ अंश सेल्सिअस आणि जळगाव जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. नंदूरबार जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील तर उर्वरीत जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात ३१ टक्के तर जळगाव जिल्ह्यात ५१ टक्के आणि धुळे व नंदूरबार जिल्ह्यात ४३ ते ४६ टक्के राहील. धुळे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ११ टक्के राहील; नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात १२ टक्के आणि जळगाव जिल्ह्यात २१ टक्के राहील.

मराठवाडा उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील; तर औरंगाबाद व लातूर जिल्ह्यात २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील व बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस आणि नांदेड जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील व दिनांक १७ मार्च रोजी पावसाची शक्‍यता राहील. परभणी व हिंगोली जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ३२ टक्के राहील औरंगाबाद, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ४४ टक्के राहील. तसेच नांदेड व जालना जिल्ह्यात ५२ ते ५४ टक्के राहील. बीड जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता केवळ १२ टक्के इतकी कमी राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यात ती २१ ते २३ टक्के इतकी कमी राहील त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान नगर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस तर सातारा जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित जिल्ह्यात ते २१ ते २३ अंश सेल्सिअस इतके राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सोलापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता २५ टक्के इतकी कमी राहील तर सातारा जिल्ह्यात सर्वांत अधिक ७३ टक्के राहील. त्या खालोखाल सांगली जिल्ह्यात ६६ टक्के राहील आणि कोल्हापूर जिल्ह्यात ५७ टक्के तर पुणे व नगर जिल्ह्यांत ३८ ते ४६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत केवळ ११ टक्के इतकी कमी राहील तर सांगली व नगर जिल्ह्यांत २१ ते २२ टक्के राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. नगर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ११ किलोमीटर राहील तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत तो ६ ते ७ किलोमीटर राहील. दिनांक १७ व १८ मार्च रोजी पावसाची शक्‍यता आहे.

पश्‍चिम विदर्भ बुलढाणा व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील. अकोला व वाशिम जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअस राहील. वाशिम जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. अकोला व अमरावती जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस व बुलढाणा जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. बुलढाणा जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. उर्वरित जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते २० टक्के इतकी कमी राहण्यामुळे हवामान कोरडे राहील. अमरावती जिल्ह्यात पावसाची शक्‍यता आहे.

मध्य विदर्भ यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील; तर नागपूर जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस आणि वर्धा जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. नागपूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० टक्के राहील, तर उर्वरित जिल्ह्यांत ५० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ ते १८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील.

पूर्व विदर्भ चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३७ ते ३८ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश, तर भंडारा जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस आणि गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० टक्के तर दुपारची १५ ते २० टक्के इतकी कमी राहील व हवामान कोरडे राहील. कृषी सल्ला

  • उन्हाळी हंगामात फुले जयवंत, फुले गुणवंत या जातीचे एक गुंठ्यात १२० ठोंब लावल्यास दररोज चार ठोंबांचा ६० ते ७० किलो चारा उपलब्ध होतो. तो दोन जनावरांना पुरेसा होतो.
  • उन्हाळी हंगामात जनावरांना दिवसातून ४ वेळा पाणी पाजावे.
  • कुक्कुटपालनाचे शेडवर गवताचे आच्छादन केल्यास शेडमधील तापमान नियंत्रणात रहाते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com