कृषि सल्ला : पालेभाज्या, फळभाज्या

टरबुज लागवड
टरबुज लागवड

डिसेंबर महिन्यात बहुतांश पालेभाजी पिकांची लागवड करावी. फळवर्गीय भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी गादीवाफ्यावर रोपनिर्मितीसाठी बियाणे टाकावे. पाणीव्यवस्थापनासाठी आच्छादन करुन ठिबकसिंचन पद्धतीचा अवलंब करावा. टरबूज :

  • शुगर बेबी, अर्का ज्योती, अर्का माणिक व किरण या वाणांची लागवडीसाठी निवड करावी.
  • लागवडीपूर्वी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात द्रावण बनवून त्यात बियाणे ३ तास भिजवून घ्यावे. नंतर तेच बियाणे ओल्या पोत्यावर पोते गुंडाळून ठेवावे. या बियाणाची लागवड १२ तासांनंतर करावी.
  • दोन मीटर अंतरावर सऱ्या पाडून सरीच्या दोन्ही बगलेत १ ते १.५ मीटर अंतरावर सरळ वाणाच्या ४ व संकरीत वाणाच्या २ बिया टोकाव्यात.
  • पेरणीपूर्वी प्रतिहेक्टरी २५ गाड्या शेणखत किंवा कंपोस्टखत टाकून लागवड करावी. लागवडीपूर्वी प्रत्येक ठिकाणी खड्ड्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत/ कंपोस्ट / गांडुळखत व मुठभर भुसा टाकून खड्डा मातीने झाकावा.
  • लागवडीवेळी प्रति हेक्टरी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे. रासायनिक खतांची मात्रा शेणखताबरोबरच प्रत्येक खड्ड्यामध्ये टाकून खड्डा झाकावा. लागवडीनंतर ३० दिवसांनी प्रतिहेक्टरी ५० किलो नत्र द्यावे.
  • लागवडीपूर्वी पाणी देऊन वाफसा आल्यानंतर बियाणाची लागवड करावी. लागवडीनंतर जमिनीच्या मगदूरानुसार ६-८ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
  • भाजीपाला :

  • डिसेंबर महिन्यात पालक, मेथी, मुळा, कोथिंबीर यांची लागवड करावी.
  • कोथिंबीर लागवडीसाठी मध्यम काळी मात्र पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिनीची निवड करावी.
  • कोथिंबीर लागवडीसाठी स्थानिक शिंपी, डी. डब्ल्यू. डी. - ९, वैशाली, जीसी-१,२,३ या जातींची निवड करावी.
  • उन्हाळी मिरची व वांगीच्या लागवडीसाठी गादी वाफ्यावर बी टाकावे.
  • गादी वाफ्यावर बियाण्याची उगवण होईपर्यंत गवत किंवा पालापाचोळा याचे आच्छादन करावे.
  • रोपे तयार असल्यास मध्यम काळी ते भारी जमिनीत रोपांची पुनर्लागवड करावी. मिरचीच्या परभणी तेजस, पुसा ज्वाला, अग्निरेखा, ज्योती, जी – ४, बी सी – २५, एसी – २००२-०६ या जातींची लागवड करावी.
  • कांदा लागवडीसाठी मध्यम काळी निचऱ्याची जमीन निवडावी. एक नांगरट व दोन कुळवणीच्या पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी. लागवडीसाठी अॅग्रीफाउंड डार्क रेड, सुवर्णा या जातींची निवड करावी.
  • मुळा पिकाच्या लागवडीसाठी हलकी ते रेताड जमीन निवडावी. एक नांगरट व दोन कुळवणीच्या पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी. लागवडीसाठी पुसा केतकी, जापनीज व्हाईट, पुसा देशी, सिंथेटिक, पुसा रेशमी या जातींची निवड करावी.
  • मेथी या पालेभाजी पिकाच्या लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. लागवडीसाठी पुसा अर्लीबंचिंग, कस्तुरी, आरएमटी-१, सिलेक्शन या जातींची निवड करावी.
  • पालक पालेभाजी लागवडीसाठी ऑल ग्रीन, पुसा ज्योती, पुसा हरित जातींची निवड करावी.
  • संपर्क : डॉ. यू. एन. आळसे, ०२४५२-२२९००० (कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com