agricultural news in marathi, animal raring advisory , Agrowon, Maharashtra | Agrowon

पशुसल्ला : नवजात वासरांची विशेष काळजी घ्या
कुलदीप शिंदे
रविवार, 24 डिसेंबर 2017

हिवाळ्यात गायी-म्हशी विण्याचे प्रमाण जास्त असते. थंड वातावरणामुळे नवजात वासरांची विशेष काळजी घ्यावी लागते. आजचे वासरू हे उद्याची गाय असते. त्यामुळे नवीन जन्मलेल्या वासरांचे संगोपन योग्य पद्धतीने करणे अावश्यक असते. वासराच्या चांगल्या आरोग्यासाठी जन्मापासून ते वयाच्या चार महिन्यांपर्यंत विशेष लक्ष द्यावे.

हिवाळ्यात गायी-म्हशी विण्याचे प्रमाण जास्त असते. थंड वातावरणामुळे नवजात वासरांची विशेष काळजी घ्यावी लागते. आजचे वासरू हे उद्याची गाय असते. त्यामुळे नवीन जन्मलेल्या वासरांचे संगोपन योग्य पद्धतीने करणे अावश्यक असते. वासराच्या चांगल्या आरोग्यासाठी जन्मापासून ते वयाच्या चार महिन्यांपर्यंत विशेष लक्ष द्यावे.

  • जन्मलेल्या वासराला स्वच्छ कपड्याने किंवा गोणपाटाने पुसून त्याचे वजन करून घ्यावे. तोंडातील व नाकातील घाण हलक्या हाताने काढून टाकावी. कानात हळूवार फुंकर मारावी.
  • वासराची नाळ शरीरापासून २ ते ३ सें.मी. अंतरावर स्वच्छ ब्लेडने कापून दोऱ्याने बांधावी. दोऱ्याने बांधलेल्या भागापासून १ सें.मी. अंतर ठेवावे. नाळेमध्ये जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून त्यावर आयोडिन लावावे.
  • वासराला अर्ध्या तासाच्या आत अाईचा चीक पाजावा.
  • वासरांना ओळखणे सोपे जावे यासाठी त्यांना वयाच्या एका आठवड्याच्या आत कानामध्ये टॅग लावावे.
  • वासरांच्या शिंगकळ्या तज्ज्ञ पशुवैद्यकाकडूनच खुडून घ्याव्यात.
  • नवीन जन्मलेल्या वासराला पहिल्या आठवड्यात जंतनाशकाची मात्रा द्यावी आणि त्यानंतर २० दिवसांच्या अंतराने ६ महिन्यांकरिता द्यावी.
  • वासरांचे लाळ्या-खुरकत, घटसर्प, फऱ्या या रोगांवर तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.
  • वासरांना स्वच्छ अाणि उबदार गोठ्यात बांधावे.

                                             वयानुसार वासराला द्यायचे दुधाचे प्रमाण

१ ते ५ दिवस   शरीराच्या वजनाच्या १० टक्के (३ ते ४ लिटर) दिवसांमध्ये २ ते ३ वेळा
पहिला महिना ३ ते ४
दुसरा महिना  २.५ ते ३.५
तिसरा महिना १.५ ते २.५
चाैथा महिना  १ ते २

संपर्क :  कुलदीप शिंदे, ९८८१४१४९६७
(राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरियाना)
 

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...