agricultural news in marathi, ants welcome even the hazardous creatures , Agrowon, Maharashtra | Agrowon

त्रासदायक आगंतुकांचेही मुंग्यांच्या वसाहतीमध्ये होते स्वागत
कोजेन्सिस वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

मुंग्यांच्या वसाहतीमध्ये येणाऱ्या आगंतुक मुंग्या त्यांची अंडी आणि पिलांचा फडशा पाडतात. मात्र, या मुंग्यांना वसाहतीमधील मुंग्या विरोध किंवा अडथळा करत नसल्याचे दिसून येत होते. यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न ओहिओ राज्य विद्यापीठातील संशोधकांनी केला असून, ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या न्यायाने हे वर्तन असल्याच्या निष्कर्षाप्रत हे संशोधक आले आहेत. हे संशोधन ‘जर्नल अॅनिमल बिहेव्हियर’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

मुंग्यांच्या वसाहतीमध्ये येणाऱ्या आगंतुक मुंग्या त्यांची अंडी आणि पिलांचा फडशा पाडतात. मात्र, या मुंग्यांना वसाहतीमधील मुंग्या विरोध किंवा अडथळा करत नसल्याचे दिसून येत होते. यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न ओहिओ राज्य विद्यापीठातील संशोधकांनी केला असून, ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या न्यायाने हे वर्तन असल्याच्या निष्कर्षाप्रत हे संशोधक आले आहेत. हे संशोधन ‘जर्नल अॅनिमल बिहेव्हियर’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

आगंतुक आणि त्रासदायक ठरणाऱ्या मुंग्यांना वसाहतीमध्ये प्रवेश देण्यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न ओहिओ राज्य विद्यापीठातील संशोधक रॅचेले अॅडम्स यांनी केला आहे. बुरशींची शेती करणाऱ्या यजमान मुंग्या (शा. नाव ः Megalomyrmex symmetochus) आणि परजिवी मुंग्या (शा. नाव ः Megalomyrmex symmetochus) यांच्यातील वैचित्र्यपूर्ण संबंधांचा वेध घेतला आहे.
निसर्गामध्ये असे विचित्र वर्तन संबंध अस्तित्वात आहेत. त्यातील अनेक परजिवी हे छद्मावेश घेतात. यजमानाप्रमाणे गंध, रंग यांची नक्कल करतात. अशा प्रवृत्तीला इंग्रजीमध्ये ‘इनसिग्निफिकन्स’ म्हणतात. मात्र, या परजिवी मुंग्यांमध्ये हायड्रोकार्बनमुळे विशिष्ट गंध येतो. अल्कोलॉईड आधारीत विषारी घटकामुळे यजमान मुंग्यांना परजिवी मुंगी त्वरीत लक्षात येते. या यजमान मुंग्या मुंडके खाली खालून अधिक बचावात्मक पवित्र्यात जातात. मात्र, या रासायनिक गंधामुळे अन्य परजिवी दूर राहत असावेत. शत्रूचा शत्रू तो मित्र या अर्थाने हा संबंध होत असावा.

बुरशींच्या शेती करणाऱ्या मुंग्यांच्या सुमारे २५० पेक्षा अधिक प्रजाती मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेत आहेत. वारूळामध्ये हिरवी पाने आणून त्यावर बुरशींची वाढ करतात. त्यांचे अन्य परजिवींपासून संरक्षणही करतात. ज्यावेळी वसाहतीच्या आवश्यकतेच्या तुलनेमध्ये बुरशींचे उत्पादन भरपूर असते, त्यावेळी परजिवीच्या त्रासामुळे फारसा फटका बसत नाही. या परजिवी मुंग्या बुरशीसोबतच काही प्रमाणात मुंग्याची अंडी आणि पिले खातात. मात्र, ते कधीही मुंग्याच्या राणीला मारत नाहीत. एकूणच यजमान वसाहत अधिक आरोग्यपूर्ण राहण्यास याची मदत होते. ही शिकवण मुंग्यांना आपल्या पालकांकडून मिळते का, हेही पाहण्याचा प्रयत्न या संशोधनामध्ये झाला.
 

 

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...