agricultural news in marathi, banana crop advisory , Agrowon, Maharashtra | Agrowon

केळी बागेवर लक्ष द्या
आर. व्ही. देशमुख, डॉ. एस. व्ही. धुतराज
रविवार, 24 डिसेंबर 2017

राज्याच्या बऱ्याच भागात थंडी वाढू लागली आहे. केळी फळपिकासाठी १६ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. तापमान १२ अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास पीकवाढीवर अनिष्ट परिणाम होतो. हे टाळण्यासाठी वेळेवर उपाययोजना कराव्यात.  सद्यस्थितीत मृगबाग लागवडीतील केळफूल निसवण्याच्या अवस्थेत आहे. कांदेबाग लागवड मुख्य वाढीच्या अवस्थेत आहे. थंडीचा परिणाम या दोन्हीही बहरातील पिकांवर होतो.

राज्याच्या बऱ्याच भागात थंडी वाढू लागली आहे. केळी फळपिकासाठी १६ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. तापमान १२ अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास पीकवाढीवर अनिष्ट परिणाम होतो. हे टाळण्यासाठी वेळेवर उपाययोजना कराव्यात.  सद्यस्थितीत मृगबाग लागवडीतील केळफूल निसवण्याच्या अवस्थेत आहे. कांदेबाग लागवड मुख्य वाढीच्या अवस्थेत आहे. थंडीचा परिणाम या दोन्हीही बहरातील पिकांवर होतो.

थंडीचा होणारा परिणाम :
ऊतिसंवर्धित लागवडीवर होणारा परिणाम :
ऊतिसंवर्धित रोपांना जमिनीच्या वातावरणाबराेबर जुळवून घेण्यासाठी १६ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमानाची आवश्‍यकता असते. ज्याठिकाणी उशिराची कांदेबाग लागवड केली जाणार असेल त्याठिकाणी वाढत्या थंडीमध्ये रोपांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.

मुळावर होणारा परिणाम :
ज्याठिकाणी ऊति संवंर्धित रोपांची कांदेबाग लागवड झालेली आहे, अशा ठिकाणी कमी तापमानामुळे मुळांची संख्या व लांबी कमी राहते. तसेच कमी तापमानामुळे मुळांची अन्न व पाणी शोषणाची कार्यक्षमता घटते.
 
पानांच्या वाढीवर होणारा परिणाम :
केळीला दरमहा सरासरी ३ ते ४ पाने येतात. थंडीच्या दिवसांत पाने येण्याचा वेग (दरमहा २-३ पाने) मंदावतो. कमी तापमानामुळे पाने कमी अंतरावर येतात. त्यामुळे पानांचा गुच्छ तयार होतो. अशा परिस्थितीत पानांचा फारच कमी भाग सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतो. परिणामी प्रकाशसंश्‍लेषण क्रिया (अन्न तयार करण्याची प्रक्रिया) मंदावून झाडांची वाढ खुंटते. उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

पीकवाढीवर होणारा परिणाम :
कमी तापमानामुळे झाडाची वाढ मंदावते. परिणामी मृगबागात खोडातून केळफुल बाहेर पडण्यास उशीर लागतो. परिणामी केळी निसवण्याचा कालावधी लांबून उत्पादन खर्च वाढतो. क्वचित प्रसंगी केळफुल अर्धवट बाहेर येऊन खोडातच अटकून बसते. त्यामुळे पूर्ण नुकसान होते.

बुंधा व घडावर होणारा परिणाम :
कमी तापमानामुळे केळीच्या बुंध्यावर व घडाच्या दांड्यावर काळपट तपकिरी चट्टे दिसतात. थंडीचे प्रमाण वाढत जाईल तसतसे हे चट्टे वाढून घड सटकतो.

फळवाढीवर होणारा परिणाम :
थंडीच्या काळात घडातील केळीची वाढ खूप सावकाश होते. घड पक्व होण्याचा कालावधी ३० ते ४० दिवसांनी वाढतो.
 
रोगाचा प्रादुर्भाव :
करपा (सिगाटोका) तसेच जळका चिरुट या रोगांचा प्रादुर्भाव होतो.

उपाय योजना :

  • ऊती संवर्धित रोपांच्या लागवडीनंतर  बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोगनियंत्रणाच्या मुद्द्यात  दिल्याप्रमाणे  बुरशीनाशकांची फवारणी आणि आळवणी करावी.
  • बागेच्या चोहोबाजूंनी वारा संरक्षक उंच वाढणाऱ्या वनस्पती जसे की गजराज, शेवरी, गिरीपुष्प इत्यादींची २ ते ३ ओळीत दाट लागवड करावी.
  • प्रतिझाड पाच किलो शेणखत द्यावे.
  • बागेस प्रति एकरी युरिया २० ते २५ किलो याप्रमाणे खतमात्रा द्यावी. पालाश ८२ ग्रॅम प्रतिझाड द्यावे.   
  • खोडालगत आच्छादन करावे. त्यामुळे थंडीचा मुळांच्या वाढीवर परिणाम होत नाही.
  • बागेस रात्री पाणी द्यावे.
  • रात्रीच्या वेळी बागेच्या चोहोबाजूने काडीकचरा जाळून धूर करावा.
  • ह्युमिक अॅसिड २ ते ३ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी .

रोग नियंत्रण :
करपा (सिगाटोका) आणि जळका चिरुट, बुरशीजन्य रोग  :
फवारणी : (प्रतिलिटर पाणी)  प्रोपीकोनॅझोल (२५ ई.सी.) १ मि.लि. किंवा  कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यू.पी.) १ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट १ मि.लि.
सूचना : उतिसंवर्धित रोपांना वरीलप्रमाणेच आळवणी करावी.

संपर्क :  आर. व्ही. देशमुख, ९४२१५६८६७४
(केळी संशोधन केंद्र, नांदेड)

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
विधान परिषदेत शिवसेनेला 'लॉटरी'; कोकणात...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या...
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा,...भात ः सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू...
द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची... सर्व द्राक्ष विभागांमध्ये...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...