agricultural news in marathi, beneficial diet for health from some grains | Agrowon

पूर्णधान्य आहाराचा आरोग्यासाठी होतो फायदा
कोजेन्सिस वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

आरोग्यासाठी साध्या धान्यांच्या तुलनेमध्ये पूर्णधान्यांपासूनचे पदार्थ अधिक पोषक असतात. त्यातून उपलब्ध होणारे तंतुमय पदार्थ हे पाचक, सारक असून, अधिक काळ पोट भरल्याची भावना तयार करतात. सध्या वाढत असलेल्या स्थौल्यत्वाच्या समस्येवर मात करण्यासाठी अमेरिकेमध्ये पूर्णधान्यांपासून खाद्य पदार्थांच्या निर्मितीला चालना दिली जात आहे. त्यात पूर्णधान्ययुक्त गहू ब्रेड, ओटमील, बार्ली, मोहरी, हातसडीचा तांदूळ किंवा जंगली तांदूळ यापासूनचे पदार्थ यांचा समावेश आहे.

आरोग्यासाठी साध्या धान्यांच्या तुलनेमध्ये पूर्णधान्यांपासूनचे पदार्थ अधिक पोषक असतात. त्यातून उपलब्ध होणारे तंतुमय पदार्थ हे पाचक, सारक असून, अधिक काळ पोट भरल्याची भावना तयार करतात. सध्या वाढत असलेल्या स्थौल्यत्वाच्या समस्येवर मात करण्यासाठी अमेरिकेमध्ये पूर्णधान्यांपासून खाद्य पदार्थांच्या निर्मितीला चालना दिली जात आहे. त्यात पूर्णधान्ययुक्त गहू ब्रेड, ओटमील, बार्ली, मोहरी, हातसडीचा तांदूळ किंवा जंगली तांदूळ यापासूनचे पदार्थ यांचा समावेश आहे.

अमेरिकी कृषी विभागाच्या ह्यूमन न्यूट्रिशन रिसर्च सेंटर ऑन एजिंग, कृषी संशोधन सेवा आणि बोस्टन येथील टफ्टस् विद्यापीठ यांनी एकत्रितपणे पूर्णधान्ययुक्त पदार्थांच्या आहारातील वापरामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला आहे. हे पदार्थ वजन, रक्तातील शर्करा नियंत्रणासाठी मदत करतात. त्यातून प्रति ग्रॅम मिळणारी ऊर्जा महत्त्वाची असते. सामान्यतः आत्यंतिक प्रक्रिया किंवा पॉलिशिंगमध्ये धान्यातील अनेक पोषक घटक नष्ट होतात किंवा भुश्शासोबत फेकून दिले जातात. पूर्ण धान्यामध्ये त्यावरील पोषक आवरण जपले जाते. त्यातून जीवनसत्त्वे, खनिजे, तंतूमय पदार्थ आणि अन्य पोषक घटक उपलब्ध होतात.

केंद्रातील ऊर्जा चयापचय प्रयोगशाळेच्या संचालिका सुसॅन रॉबर्टस यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अभ्यासामध्ये सहभागी व्यक्तींच्या आहार, वजन आणि खाद्य पदार्थांचा प्रकार यावर नियंत्रण ठेवण्यात आले होते. पूर्वीच्या वैद्यकीय चाचण्यामध्ये वजन नियंत्रणाशिवाय अन्य मुद्द्यावर फारसे लक्ष देण्यात आलेले नव्हते.

  • अभ्यासात आठ आठवड्यासाठी ४० ते ६५ वयोगटातील ८१ सहभागी व्यक्तींच्या वजन, ऊर्जा यांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये आरोग्यपूर्ण, धुम्रपान न करणाऱ्या स्त्री आणि पुरुष अशा व्यक्तींचा समावेश होता. सुरवातीला त्या व्यक्ती सामान्य (पूर्णधान्य रहित) आहार घेणाऱ्या होत्या. दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यातील काही व्यक्तींना किमान तीन आऊन्स पूर्णधान्य आहार स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी चार आऊन्स आहार याकडे वळवण्यात आले.  
  • त्यानंतर सामान्य आहार घेणाऱ्या गटाच्या तुलनेमध्ये प्रति दिन १०० कॅलरीज कमी झाल्याचे दिसून आले. हे प्रमाण ३० मिनिटे वेगाने चालण्याच्या बरोबर आहे. पूर्णधान्य आहारामुळे पचनसंस्थेतील उपयुक्त सूक्ष्मजीवांना चालना मिळून, दाह आणि हानीकारक जिवाणूंचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. कॅलरीज कमी होण्यामध्ये शरीरातील चयापचयाच्या दरामध्ये झालेली वाढ आणि साठवण्याऐवजी ऊर्जा बाहेर टाकण्याचे प्रमाण वाढल्याने झाली असल्याचे संशोधकांनी सांगितले.
  • या संशोधनाचे निष्कर्ष ‘अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. अधिक माहिती ‘ॲगरिसर्च ऑनलाइन’च्या मार्च महिन्यांच्या अंकामध्ये वाचता येईल.

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी आहार हेच हवे लक्ष्य!पहिले आणि दुसरे महायुद्ध संपले, यामध्ये...
तापलेलं ‘दूध’अनिश्‍चित अशा शेतीला शाश्वत मिळकतीची जोड म्हणून...
खडकवासला, कलमोडी धरण भरलेपुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
दुधाचा भडका; सरकारची कोंडी पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या...
दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवानानाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात...पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारी (ता. १६)...
दूध आंदोलनाचे विधिमंडळातही पडसादनागपूर: दुधाला लिटरमागे प्रतिलिटर पाच रुपये...
बाजारपेठ ओळखून केळी बागेचे आदर्श नियोजनकठोरा (ता. जि. जळगाव) येथील पांडुरंग मोहन पाटील व...
एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिह्यातील...
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...