agricultural news in marathi, benefits of mushroom proteins in diet , Agrowon, Maharashtra | Agrowon

अळिंबी प्रथिनांतून पदार्थाच्या पोषकतेत वाढ
कोजेन्सिस वृत्तसेवा
रविवार, 7 जानेवारी 2018

आहारातील पोषकता वाढवण्यासाठी वनस्पतिजन्य (विशेषतः अळिंबीपासून) प्रथिनांच्या निर्मितीसाठी विविध कंपन्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातून प्रतिवर्ष चार हजार टन इतके उच्च दर्जाचे प्रथिन उत्पादन घेण्याचे नियोजन केले जात आहे.

आहारातील पोषकता वाढवण्यासाठी वनस्पतिजन्य (विशेषतः अळिंबीपासून) प्रथिनांच्या निर्मितीसाठी विविध कंपन्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातून प्रतिवर्ष चार हजार टन इतके उच्च दर्जाचे प्रथिन उत्पादन घेण्याचे नियोजन केले जात आहे.

सध्या क्विण्वन प्रक्रियेद्वारे विविध प्रकारची प्रथिने मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्याला किंचित वेगळी चव लागते. त्यामुळे अशा प्रथिनांना ग्राहकांकडून कमी प्रमाणात मागणी असते. यावर मात करण्यासाठी नैसर्गिकरीत्या मिळवलेल्या अळिंबीपासून स्प्रे ड्राईंग पद्धतीने निर्जलीकरण केलेली भुकटी तयार करण्यात येते. त्यामुळे प्रथिनांचे प्रमाण कोरड्या स्थितीमध्ये ७७ ते ८० टक्के असते. ही अळिंबी वाटाणा किंवा भातातील प्रथिनांवर वाढवलेली असते.

वनस्पती आधारित प्रथिने

  • प्युअर टेस्ट हा अमेरिकेतील क्विण्वन केलेल्या भाजीपाला प्रथिनांचा ब्रॅण्ड आहे. त्यामध्ये वनस्पती आधारित प्रथिने तयार केली जातात.
  • योग्य प्रमाणामध्ये प्रथिनांचे प्रमाण झाल्यानंतर (सुमारे ४८ तासांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते.) अळिंबीची काढणी केली जाते. त्या नंतर ती वाळवून अत्यंत बारीक अशी भुकटी केली जाते. त्यात कॅलरी, मेद, कर्बोदके यांचे प्रमाण कमी असून, त्यात अन्य कोणत्याही घटकांपेक्षा जीवनसत्त्वे आणि खनिजांचे प्रमाण अधिक असते.
  • विविध प्रकारच्या टॉर्टिलामध्ये (मेक्सिकन मक्याच्या चपातीला टॉर्टिला म्हणतात.) मिसळण्यासाठी त्यांचा वापर होऊ शकतो.
  • पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, तसेच क्रॅकिंग होणे कमी होते. मांसाचे पदार्थ, सॅलड, ड्रेसिंग, तृणधान्ये, प्रथिने बार आणि तयार पेय यामध्ये याचा वापर करता येतो.
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...