agricultural news in marathi, cabbage crop advisory , Agrowon, Maharashtra | Agrowon

कोबीवरील भुरी, घाण्या रोगनियंत्रण
चिमाजी बाचकर, सोमनाथ पवार
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

राज्यात गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस व गारपीट झाली. ढगाळ वातावरण, थंडीमुळे पडणारे दव व वाढणारी आर्द्रता, यामुळे कोबीवर्गीय पिकांवर भुरी व घाण्या या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांचे वेळीच नियंत्रण न केल्यास पिकाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे त्वरित नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

 

राज्यात गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस व गारपीट झाली. ढगाळ वातावरण, थंडीमुळे पडणारे दव व वाढणारी आर्द्रता, यामुळे कोबीवर्गीय पिकांवर भुरी व घाण्या या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांचे वेळीच नियंत्रण न केल्यास पिकाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे त्वरित नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

 

भुरी :
लक्षणे :
पानाच्या वरील बाजूला पांढऱ्या रंगाची बुरशी दिसते. रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पानावर करड्या पांढरट रंगाची बुरशी वाढलेली दिसते. पाने फिक्कट हिरवट, पिवळसर होऊन गळ होते, वाढ खुंटते.
नियंत्रण :
फवारणी (प्रति लिटर पाणी). विद्राव्य गंधक (८० टक्के) २.५ ग्रॅम किंवा डिनोकॅप १ मि.लि.

घाण्या रोग :
लक्षणे :
प्रथम पानाच्या कडेला पिवळेपणा येतो. नंतर तो कडेपासून पानाच्या आतील भागाकडे वाढ जाऊन शेवटी इंग्रजी ‘व्ही’ किंवा त्रिकोणासारखा पट्टा पडतो. हा डाग किंवा चट्टा पानाच्या मुख्य शिरेपर्यंत पसरत जाऊन प्रादुर्भावित भाग तपकिरी पडतो.
रोगट भागातील पानाच्या शिरा काळ्या पडतात. रोगग्रस्त भाग मोडल्यास त्यातून दुर्गंधीयुक्त काळसर द्रव निघतो. म्हणून त्याला घाण्या रोग म्हणतात.
रोग गड्डा आणि मुळापर्यंत पसरल्यास कोबी, फ्लॉवरचे गड्डे पूर्णपणे सडून जातात. रोगाचा प्रादुर्भाव लागवडीनंतर त्वरित झाल्यास रोगग्रस्त झाड मरते.
नियंत्रण :
फवारणी (प्रति लिटर पाणी)
कॉपर ऑक्सिक्‍लोराईड ३ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन १ ग्रॅम

 

सूचना : रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. दहा दिवसांच्या अंतराने बुरशीनाशकांची २ ते ३ वेळा फवारणी करावी.

संपर्क : चिमाजी बाचकर, ९४०४६१२४६१
(अखिल भारतीय समन्वित भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)
टीप : गंधकाचा वापर प्रखर उन्हात टाळावा.
 

 

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...