agricultural news in marathi, cabbage crop advisory , Agrowon, Maharashtra | Agrowon

कोबीवर्गीय भाजीपाला पिकांवरील किडींचे नियंत्रण
मधुकर भालेकर, सोमनाथ पवार, चिमाजी बाचकर
मंगळवार, 6 मार्च 2018

कोबीवर्गीय भाजीपाला पिकावर सद्यस्थितीत काळी माशी, मावा, पाकोळी व चौकोनी ठिपक्यांचा पतंग आदी किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यांच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात.

कोबीवर्गीय भाजीपाला पिकावर सद्यस्थितीत काळी माशी, मावा, पाकोळी व चौकोनी ठिपक्यांचा पतंग आदी किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यांच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात.

काळी माशी
लक्षणे व नुकसान : माशी पानांच्या पेशीत अंडी घालते. अंड्यातून निघालेली काळ्या रंगाची अळी पाने खाते. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास पाने खाऊन फक्त शिरा शिल्लक राहतात. अळ्यांना स्पर्श केला किंवा झाड हलवले तर ताबडतोब खाली पडतात.
नियंत्रण : अळ्या गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकाव्यात.

मावा
लक्षणे व नुकसान : हिरव्या किंवा काळ्या रंगाचे मावा कोवळ्या पानातील अन्नरसाचे शोषण करतात. त्यामुळे पाने सुरकुतल्यासारखी होऊन पिवळी पडतात आणि वाळून जातात. मावा शरीरातून चिकट पदार्थ बाहेर टाकतात. हा पदार्थ पानावर साठून राहिल्याने पाने चिकट व तेलकट दिसतात. त्यानंतर या पदार्थावर काळी बुरशी वाढते. परिणामी, प्रकाशसंश्‍लेषण क्रिया मंदावते. झाडांची वाढ खुंटून उत्पादनात घट येते.
नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी
निंबोळी अर्क ५ टक्के किंवा
अझाडिरॅक्‍टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि.
 

चौकोनी ठिपक्‍यांचा पतंग (पाकोळी) :
लक्षणे व नुकसान : कोबी, फुलकोबी, नवलकोल, मुळा, मोहरी इत्यादी पिकांवर ही कीड आढळते. अळी पानाच्या खालील बाजूस राहून पानाला छिद्रे पाडून हरितद्रव्य खाते. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण पाने खाऊन त्यांची चाळण करते. पानांना फक्त शिराच शिल्लक राहतात.

नियंत्रण :

  • शेतात पक्षी बसण्यासाठी काठीचे मचाण लावावे.
  • एकरी ५ फेरोमोन सापळे लावावेत.
  • अळ्या दिसू लागताच नियंत्रणासाठी फवारण्या कराव्यात.
  • अ) पहिली फवारणी २ अळ्या प्रति रोप दिसू लागताच प्रमाण प्रतिलिटर बी. टी. (बॅसिलस थुरिंजनेसिस) १ ग्रॅम सूचना - फवारणी संध्याकाळच्या वेळी करावी.
  • ब) दुसरी फवारणी निंबोळी अर्क ५ टक्के किंवा   अझाडिरॅक्‍टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि.
  • क) तिसरी फवारणी   प्रमाण प्रतिलिटर   इंडोक्‍साकार्ब १ मि.लि. किंवा    स्पिनोसॅड (२.५ एस.सी.) १ मि.लि.
  • ड) चौथी फवारणी (गरज पडल्यास)   फवारणी प्रतिलिटर   क्‍लोरअॅन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के एस.सी.) ०.२ मि.लि.

संपर्क : सोमनाथ पवार, ९९२२५७२९३०
(अखिल भारतीय समन्वित भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ,
राहुरी, जि. अहमदनगर.)

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...