agricultural news in marathi, cattle raring advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon

पशुपालन सल्ला : जखमांवर उपाययोजना
अजय गवळी
रविवार, 10 डिसेंबर 2017

जनावरांस भांडणामुळे, कुरणावर चरत असताना काही कारणास्तव जखमा होतात, अशा जखमांमुळे जनावर अस्वस्थ, अशक्त होते; तसेच रक्तस्राव त्यांतून होत असतो. या जखमामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात.

मुका मार : या प्रकारामध्ये जनावरांच्या कातडीला कुठेही खंड पडत नाही, मात्र कातडी खालील आवरणांना इजा पोचते

जनावरांस भांडणामुळे, कुरणावर चरत असताना काही कारणास्तव जखमा होतात, अशा जखमांमुळे जनावर अस्वस्थ, अशक्त होते; तसेच रक्तस्राव त्यांतून होत असतो. या जखमामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात.

मुका मार : या प्रकारामध्ये जनावरांच्या कातडीला कुठेही खंड पडत नाही, मात्र कातडी खालील आवरणांना इजा पोचते

बंद जखम : या प्रकारात कातडीखालील रक्तवाहिन्या फुटून रक्त साठते त्यामुळे त्या भागाला लालसर काळा रंग येतो. पेशीपासून काही वेळेस निरुपद्रवी गाठ तयार होते, म्हणजे शरीराच्या कुठल्याही पोकळीमध्ये रक्त जमा होते. साधारणपणे बाह्य आवरणामधून जाणाऱ्या रक्तवाहिनीस इजा पोचल्यास ही स्थिती उदभवते.

कापलेली जखम : ही जखम साधारणपणे धारेदार शस्त्र जसे चाकू, फुटलेल्या काचा इत्यादींमुळे होते. यांत पेशींना कमीत-कमी इजा पोचते. जखमेतून रक्तस्त्राव जास्त प्रमाणात होतो. वेदना असह्य होतात. अशा जखमांमध्ये जंतूंचा संसर्ग होऊ न दिल्यास या जखमा लगेच भरून येतात.

फाटलेली जखम : या प्रकारच्या जखमेमध्ये कातडी किंवा आतील आवरणे फाटतात. त्यामुळे अशा जखमांचे काठ एकसारखे नसतात. अनेक वेळा कातडी खूप जास्त फाटते तसेच इतर आवरणापासून वेगळी झालेली दिसते.

खरचटणे : जनावरांचा कातडीचा वरचा थर घासल्यामुळे निघून जातो. अशा जखमा वेदनादायक असतात. रक्तस्त्राव कमी प्रमाणात होतो, परंतु जखम भरण्यासाठी जास्त कालावधी लागतो.
जंतूंचा संसर्ग झालेली जखम : या जखमांमध्ये जंतू संसर्ग होऊन पेशी समूह नष्ट होतो. साधारणपणे यामध्ये दूषित जखमेचे रूपांतर संसर्गबाधित जखमेमध्ये होणाऱ्या फार तर ६ ते ८ तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

जखमेमुळे भाग वेगळा होणे : या प्रकारच्या पेशी समूहात झालेली जखम भागापासून वेगळ्या होतात. उदा. जनावरांचे खुर, शिंगे निघून जातात तर शेळ्यांमध्ये कुंपणाच्या तारेमुळे कासेला होणाऱ्या जखमा

अती उष्णतेमुळे होणाऱ्या जखमा : तीव्र सूर्यप्रकाशामध्ये किंवा किरणोत्सारी उपकरणांच्या संपर्कात जनावरे जास्त काळ राहिल्यास ह्या प्रकारच्या जखमा होतात.

सर्पदंशामुळे होणाऱ्या जखमा : या जखमा सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विषामुळे होतात. प्रामुख्याने शरीराच्या खालच्या भागांवर, तोंडांवर व पायांवर आढळून येतात. भाजल्यामुळे होणाऱ्या जखमा : अति उष्णतेमुळे शरीराचे बाह्य आवरण भाजते. तसेच गरम पाण्याचा वापर करताना काही वेळा जखमा होतात.

टीप : कोणत्याही प्रकारची जखम असेल तर तातडीने पशुवैद्यका मार्फत उपचार करून घ्यावेत.

संपर्क : अजय गवळी, ८००७४४१७०२
(के. के. वाघ कृषी जैवतंत्रद्यान महाविद्यालय, नाशिक)

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...
तूर खरेदी अडकली नोंदणीतचलातूर ः तेलंगणा, कर्नाटक राज्याने हमीभावाप्रमाणे...
कष्ट, अभ्यासातून जोपासलेली देवरेंची...नाशिक जिल्ह्यातील नाशिक सटाणा तालुक्याचा परिसर...
लसीकरणाअभावी दाेन काेटी पशुधनाचे...पुणे ः सुमारे ३० काेटींची निविदा मिळविण्यासाठी...
सिद्धेश्‍वर यात्रेतील बाजारात खिलार बैल...सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धेश्‍वर...
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...
कांदा निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपातनवी दिल्ली : केंद्र सरकारने कांद्यावरील...
जमीन आरोग्यपत्रिकांसाठी एप्रिलपासून '...पुणे ः महाराष्ट्रात सुरू असलेल्या जमीन...
फक्त फळ तुमचे, बाकी सारे मातीचे..! नैसर्गिक शेतीचे प्रणेते म्हणून संपूर्ण...