agricultural news in marathi, cattle raring advisory , Agrowon, Maharashtra | Agrowon

पशुसल्ला
डॉ. गिरीश यादव, डॉ. अमोल यमगर
रविवार, 7 जानेवारी 2018

साधारणतः गायीचा गर्भधारणेचा कालावधी हा २८२ दिवसांचा असतो. गाय अगोदर विलेली असेल तर कृत्रिम रेतन केलेल्या तारखांच्या नोंदी केलेल्या असाव्यात. गाईची व्यायची अपेक्षित तारीख नोंद करून ठेवावी.

साधारणतः गायीचा गर्भधारणेचा कालावधी हा २८२ दिवसांचा असतो. गाय अगोदर विलेली असेल तर कृत्रिम रेतन केलेल्या तारखांच्या नोंदी केलेल्या असाव्यात. गाईची व्यायची अपेक्षित तारीख नोंद करून ठेवावी.

 • गोठ्यातील जमिनीचा पृष्ठभाग खडबडीत असावा, जेणेकरून गाई घसरून पडणार नाहीत. शक्यतो गाभण जनावरे इतर जनावरांपासून वेगळी बांधावीत.
 • गाभण काळ पूर्ण झालेली व्यायला आलेल्या जनावरात कास धरणे, निरण सुजणे इ. लक्षणे दिसून येतात. अशी जनावरे  वेगळ्या गोठ्यात बांधावीत जेथे स्वच्छ हवा, भरपूर प्रकाश आणि जमीन स्वच्छ केलेली असावी.
 • सशक्त गायीमध्ये विताना अडचणींचे प्रमाण कमी असते तर अशक्त जनावरे विताना विशेष काळजी घ्यावी लागते. गाय विताना पहिल्यांदा वासराने पाय निरनातून बाहेर येतात नंतर नाक दिसते व डोके बाहेर येते.
 • अनेक वेळा वासराची गर्भाशयातील नैसर्गिक अवस्था (तोंड व पुढील पाय निरनाकडे असते) बदलते तेंव्हा गाई अडतात व कळा देतात त्यावेळेस तत्काळ पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलवावे.
 • गाय विल्यानंतर गाईच्या निरणाचा बाहेरील भाग शेपटी व मागच्या पायाच्या शेपटीच्या जवळील भाग पोटॅशिअम परमॅगनेटच्या कोमट पाण्याने किंवा कडूलिंबाच्या पाला टाकून उकळलेल्या पाण्याने धुवून घ्यावा.
 • गायीचे थंड वाऱ्यापासून संरक्षण होण्यासाठी गायीला थोडावेळ उन्हात बांधावे व पिण्यास पाणी द्यावे.
 • गाय विल्यानंतर लगेचच धार काढावी व वासराला पाजावे. गाईचा जार साधारणतः दोन ते चार तासांत पडतो, हा जार जर बारा तासांपर्यंत पडला नाही, तर पशुवैद्यकाच्या मदतीने जार काढावा. जार गाय खाणार नाही याची काळजी घ्यावी.  
 • गाय विल्यानंतर कासदाह व दूध ज्वर असे अाजार होऊ शकतात त्या दृष्टीने जागरूक असावे व वेळीच उपचार करून घ्यावेत.
 • विलेल्या गायीच्या अाहारामध्ये पेंडीचे प्रमाण प्रती दिवशी १ किलो या प्रमाणे असावे. प्रति ३ लिटर दुधास १ किलो प्रमाणे खुराक द्यावा.

वासराची निगा

 • वासरू जन्मल्यानंतर तत्काळ त्याच्या नाकातील व तोंडातील चिकट द्रव काढावा. वासराची श्वसन क्रिया सुरळीत होण्यासाठी त्याच्या छातीवर हाताने ८ ते १० वेळा दाबून सोडावे ज्यामुळे श्वसनक्रिया सुरळीत चालण्यास मदत होते.
 • श्वसन चालू झाल्यास वासराला गायीसमोर चाटण्या साठी ठेवणे चांगले कारण त्यामुळे वासराच्या शरीरातील रक्त प्रवाह वाढतो गाय जर वासरास चाटत नसेल पोत्याने वासराच्या शरीर स्वच्छ करावे.
 • वासराची नळ गरम पाण्याने धुवून शरीरापासून २.५ सेंमी अंतरावर निर्जंतुक पत्तीने कापावी. त्याठिकाणी आयोडीन लावावे. जेणेकरून जंतुसंसर्ग होणार नाही.
 • जन्मल्यानंतर कमीत कमी एक तासात वासरास गाईचे पहिले दूध पाजावे त्यामुळे वासराची रोग प्रतिकारशक्ती वाढते.
 • गाईचे पहिले दूध वासराला त्याच्या वजनाच्या १० टक्के प्रमाणात द्यावे (२ ते २.५ लिटर रोज). हे दूध दिल्याने वासरास कसल्याही प्रकारची हगवण लागते.
 • वासरू ३ महिन्यांचे झाल्यावर त्याला नंबर द्यावा. अॅन्थ्रॅक्स व फऱ्या रोगाची लस टोचावी.

संपर्क :  डॉ. गिरीश यादव, ७६६६८०८०६६
(मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई)

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...