agricultural news in marathi, cattle raring advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon

पशुपालन सल्ला
डॉ. कैलास डाखोरे, अनंत शिंदे
रविवार, 6 मे 2018

वाढत्‍या उष्‍णतेमुळे जनावरांच्या आहारावर विपरीत परिणाम होतो. दूध देण्‍याचे प्रमाण, बैलांची कार्यक्षमता, प्रजनन क्षमता घटते. कोंबड्यांचे वजन वाढत नाही. अंडी उत्पादन घटते.

 

वाढत्‍या उष्‍णतेमुळे जनावरांच्या आहारावर विपरीत परिणाम होतो. दूध देण्‍याचे प्रमाण, बैलांची कार्यक्षमता, प्रजनन क्षमता घटते. कोंबड्यांचे वजन वाढत नाही. अंडी उत्पादन घटते.

 

 • जनावरांचे उष्‍णतेपासून संरक्षण करण्‍यासाठी गोठ्याच्‍या छतावर पाचट किंवा तुराट्याचे आच्‍छादन करावे. लोखंडी पत्र्याचे छत पांढऱ्या रंगाने रंगवावे. छतावर फॉगर्स लावावेत.   
 • जनावरांना सावलीची व्‍यवस्‍था करावी. संध्याकाळनंतर मोकळ्या जागी बांधावे.
 • ऊर्जेचा ताण कमी करण्‍यासाठी प्रति जनावरास १०० ग्रॅम गूळ आणि ५० ग्रॅम मीठ प्रतीदिन स्‍वच्‍छ व ताज्‍या पाण्‍यातून द्यावे.
 • जनावरांना योग्य प्रमाणात आहार द्यावा.  
 • उष्‍माघात टाळण्‍यासाठी जनावरांच्या अंगावर पाणी शिंपडावे.
 • शरीर तापमान संतुलीत राहण्‍यासाठी शरीरावर गोणपाटाची झूल करावी. त्‍यावर वेळोवेळी पाणी शिंपडावे.
 • जनावरांना २४ तास स्‍वच्‍छ व ताजे पिण्‍याचे पाणी उपलब्‍ध करून दयावे.
 • आहारात हिरव्‍या चारा, तंतुमय चारा उपलब्‍ध करून द्यावा.
 • गोठ्याची मुख्‍य बाजू उत्तर दक्षिण दिशेला असावी; जेणेकरून गोठ्यात स‍रळ येणारे सूर्यकिरण रोखता येतात.
 • सहा महिन्‍याखालील लहान वासरांची विशेष काळजी घ्यावी. वेळोवेळी त्‍यांच्‍या शारीरिक तापमानाची नोंद घ्‍यावी. पेयजलातून क्षारमिश्रित पावडर, गुळाचे पाणी, जीवनसत्‍वे द्यावीत.
 • पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्‍ला घ्‍यावा.
 • उन्‍हाळ्यात जनावरांना हगवणीचा त्रास होऊ शकतो. लक्षणे दिसताच तात्‍काळ उपचार करावेत.  

 

कुक्कुटपालन :

 • शेडची दारे पाण्‍याने भिजलेल्‍या गोणपाटाने बंद करावीत. शेडमध्‍ये पंखे किंवा कुलरची व्‍यवस्‍था करावी.
 • थंड पाण्‍याची व्‍यवस्‍था करावी. सकाळ, सायंकाळ खाद्य द्यावे.   
 • कोंबड्यांची संख्‍या मर्यादित ठेवावी. छत सिमेंट किंवा पत्र्याचे असल्‍यास त्‍यावर पाचट, कडबा यांचे आच्‍छादन करावे. शेडमध्‍ये उन्‍हाच्‍या गरम झळा येऊ नयेत म्‍हणून उन्‍हाच्‍या दिशेने गोणपाट लावून त्‍यावर पाणी शिंपडावे.
 • उष्‍माघाताची तीव्रता सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत अधिक असते. या कालावधीत भूक मंदावते. यामुळे कोंबड्यांना सकाळी दहाच्‍या आत आणि सायंकाळी पाच वाजल्यानंतर खाद्य अधिक प्रमाणात द्यावे.
 • कोंबड्यांना पिण्‍याच्‍या पाण्‍यामधून शिफारशीत प्रमाणात क्षारमिश्रित पावडर, गुळाचे पाणी, जीवनसत्त्वे द्यावीत.  

संपर्क : अनंत शिंदे, ७५८८५७१६०२
(ग्रामीण कृषी हवामान सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर कृषिपूरक
दूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजनादुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर...
जनावरांच्या कोठीपोटातील आम्लीय अपचनबऱ्याचदा जनावरांमध्ये अन्नपचनाच्या समस्या आढळून...
पशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजनाजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण...
योग्य प्रजनन व्यवस्थापनातून वाढवा...दुधाळ जनावरांची योग्य देखभाल व योग्य नियोजन...
दुधातील घटकांवर परिणाम करणारे घटक दुधातील स्निग्ध पदार्थ व एसएनएफ यांच्या...
दुग्धोत्पादन, प्रजननासाठी खनिज मिश्रणेजनावरांना हिरवा अाणि वाळलेला चारा पुरेशा प्रमाणात...
टंचाई टाळण्यासाठी चाऱ्याचे नियोजन अावश्...भविष्यातील चाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध...
योग्य उपचाराने दूर करा मायांग बाहेर...दुधाळ जनावरांतील गायी व म्हशींमध्ये विण्यापूर्वी...
पोळ्याला घ्या बैलांची काळजीबैलपोळ्यादिवशी बैलांना अंघोळ घातली जाते व त्यांना...
शेळ्यांच्या अाहारातील झाडपाल्याचे...शेळ्या झाडपाला खूप आवडीनं खातात. त्यामुळे शेतातील...
कुक्कुटपालन सल्ला कोंबड्यांना पावसाळ्यातील वातावरणामुळे विविध...
बाह्य परजीवींच्या नियंत्रणासाठी गोठ्यात...जनावरांच्या शरीरावर, केसांमध्ये अाढळणाऱ्या बाह्य...
योग्य व्यवस्थापनातून कमी होते मिथेन...जनावरे खाल्लेला चारा रवंथ करतात. खाद्य खाताना...
गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनाची सूत्रेजास्त दूध व फॅट मिळवण्यासाठी तसेच त्यापासून विविध...
खाद्य व्यवस्थापनात साधली प्रति किलो १८...निरा (जि. पुणे) येथील पंडित चव्हाण यांच्याकडे...
शेततळ्यातील मत्स्यपालन यशस्वी करण्याची...अगदी जिरायती क्षेत्रातही २ ते १० गुंठ्यांपर्यंत...
शेळ्यांना आहे वर्षभर मार्केटसांगली जिल्ह्यातील बामणी (ता. खानापूर, सांगली)...
रेशीम उद्योगाने आणली कौटुंबिक स्थिरता पूर्वी पूरक म्हणून सुरू केलेला रेशीम उद्योग आता...
वेळीच करा जनावरांमधील आंत्र परोपजीवींचे...आंत्रपरोपजीवीच्या प्रादुर्भावामुळे जनावरांची भूक...
योग्य प्रजनन व्यवस्थापनातून वंधत्व...जनावरातील वंधत्वामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन...