agricultural news in marathi, cattle raring advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon

पशुपालन सल्ला
आयेशा मुजावर,डॉ. अनिल पाटील, डॉ. इरफान मोगल
रविवार, 13 मे 2018

शेळीपालन व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी दोन वर्षाला तीन वेत होणे आवश्यक आहे. शेळ्यांमध्ये गर्भधारणेचा काळ हा ५ महिने ५ दिवस असतो. त्यानुसार उन्हाळ्यात गाभण शेळ्यांच्या व्यवस्थापनाचे नियोजन करावे. शेळ्यांच्या गाभण काळातील प्रकृतीचा परिणाम जन्मणाऱ्या करडावरही होत असतो. त्यामुळे वातावरणातील बदलानुसार शेळ्यांच्या व्यवस्थापनात बदल करावेत.    

 उष्माघाताचा गाभण शेळ्यांवर होणारा परिणाम

शेळीपालन व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी दोन वर्षाला तीन वेत होणे आवश्यक आहे. शेळ्यांमध्ये गर्भधारणेचा काळ हा ५ महिने ५ दिवस असतो. त्यानुसार उन्हाळ्यात गाभण शेळ्यांच्या व्यवस्थापनाचे नियोजन करावे. शेळ्यांच्या गाभण काळातील प्रकृतीचा परिणाम जन्मणाऱ्या करडावरही होत असतो. त्यामुळे वातावरणातील बदलानुसार शेळ्यांच्या व्यवस्थापनात बदल करावेत.    

 उष्माघाताचा गाभण शेळ्यांवर होणारा परिणाम

 • उष्माघात हे शेळ्यांमध्ये गर्भपात होण्याचे मुख्य कारण आहे.
 • गाभण शेळी अशक्त होणे.
 • गर्भाशयातील पिलांची वाढ कमी प्रमाणात होणे.
 • अशक्त करडांचा जन्म होणे
 • चारा-पाणी कमी खाणे.
 • वार अडकणे.
 • मायांगाचा दाह होणे.
 • वंध्यत्व येणे.
 • शेळीची प्रजनन क्षमता कमी होणे.

गाभण शेळ्यांची काळजी

 • गाभण काळात शेळ्यांना इतर शेळ्यांपासून वेगळे ठेवावे. गर्भावस्थेतील शेवटचे दोन महिने शेळीवर ताण येऊ नये म्हणून कळपामध्ये न ठेवता तिची स्वतंत्र व्यवस्था करावी.
 • दररोज नियमित व्यायाम द्यावा.
 • १०० ते २०० ग्रॅम या प्रमाणात अतिरिक्त खुराक द्यावा.
 • खाद्याची व पाण्याची वेगळी व्यवस्था करावी.
 • एप्रिल-मे महिन्यात जास्त तापमान असते, त्यामुळे शेळ्यांना अधिक थंड अाणि हवेशीर ठिकाणी ठेवावे.
 • गोठ्यातील जागा ओली, निसरडी असू नये याची काळजी घ्यावी.
 • गोठ्यातील शिंग असणाऱ्या व मारक्या शेळ्या बाजूला ठेवाव्यात.
 • दुपारच्या वेळी शेळ्यांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे.
 • गरम पाणी पिण्यास देऊ नये.
 • अतिउष्ण तापमानामध्ये पाण्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकावेत.
 • शेळ्या चरण्यासाठी सोडायच्या असतील तर सकाळी ६ ते १० पर्यंत व सायंकाळी ५ नंतर बाहेर सोडाव्यात.
 • शेळ्यांच्या गोठ्याच्या चाेहाेबाजूंनी ओली सुती पोती बांधावीत.
 • शक्य असल्यास पंख्यांची व कुलरची व्यवस्था करावी.
 • गोठ्याभोवती वृक्षांची लागवड करावी.
 • गोठ्यामधील हवा खेळती असावी.
 • हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करावी.

संपर्क : डॉ. अनिल पाटील, ९८२२०६९०९९
(पशू प्रजननशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय
महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

इतर कृषिपूरक
तुती लागवडतुती हे बहुवर्षीय पीक आहे. हलकी, मध्यम व भारी अशा...
दुग्धोत्पादनात पाण्याचे महत्त्वपाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांच्या शरीरातील...
ओळखा जनावरांतील परजिवींचा प्रादुर्भाव...सध्याचा उन्हाळा आणि त्यानंतर येणारा पावसाळा...
कोंबड्यांचा ताण करा कमीतापमानवाढीचा सर्वाधिक त्रास हा कोंबड्यांना होतो....
जनावरांच्या आरोग्यासाठी जीवनसत्त्वेजीवनसत्त्वांची कमतरता असेल तर जनावरांचे स्वास्थ्य...
तापमानानुसार कोंबड्यांच्या व्यवस्थापनात...उन्हाळ्यात तापमान ४१ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत...
जनावरांतील उष्माघाताची कारणे, लक्षणे,...वाढते तापमान आणि प्रखर उन्हामुळे जनावरांमध्ये...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
प्रथमोपचाराने बरे होतील जनावरांतील आजारजनावरांमध्ये विविध प्रकारचे विषाणूजन्य व...
वाढत्या तापमानाचा जनावरांवर होणारा...जनावरांमध्ये दिसून येणाऱ्या उष्मा तणावासाठी...
शेळ्या-मेंढ्यांमधील गर्भाशयाच्या...जनावरांना विशेषतः शेळ्या-मेंढ्यांना गर्भाशयाचे...
नियोजन स्वच्छ दूध उत्पादनाचे...दुग्ध व्यवसायात आर्थिक परिस्थिती, शास्त्रोक्त...
अॅझोला, हायड्रोपोनिक्स चाऱ्यातून करा...चाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध चाऱ्याची...
संवर्धन खिलार गोवंशाचे...जातिवंत खिलार जनावरांची पैदास वाढवण्यासाठी...
शेळ्या-मेंढ्यांमधील गर्भाशयाचे आजार,...शेळ्या मेंढ्यांना गर्भाशयाचा आजार झालेला आहे हे...
झलक क्रिमोना आंतरराष्ट्रीय पशू...इटली देशात दरवर्षी क्रिमोना आंतरराष्ट्रीय पशू...
जनावरांच्या संतुलित आहार...जनावरांना दिवसभरात किती चारा दिला पाहिजे आणि तो...
जनावरांच्या आहारात कोरडा चारा वापरताना...महाराष्ट्रातील बहुतांशी भागात फेब्रुवारी ते...
कमी जागेत, कमी पाण्यात अळिंबी...कमी जागेत, कमी पाण्यात अळिंबीची लागवड करता येत...