agricultural news in marathi, citrus crop advisory , Agrowon, Maharashtra | Agrowon

लिंबूवर्गीय फळपीक सल्ला
डाॅ. एम. एस. लदानिया, दिनकर नाथ गर्ग
शुक्रवार, 4 मे 2018

सद्यःस्थितीत लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये
डिंक्या, फायटोफ्थोरा आदी रोग व खोडकीड, साल खाणारी अळी, मिली बग आदी किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी, तसेच छाटणीनंतरच्या व्यवस्थापनाबाबत उपाययोजना कराव्यात.
 

पीक संरक्षण
रोग व्यवस्थापन

सद्यःस्थितीत लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये
डिंक्या, फायटोफ्थोरा आदी रोग व खोडकीड, साल खाणारी अळी, मिली बग आदी किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी, तसेच छाटणीनंतरच्या व्यवस्थापनाबाबत उपाययोजना कराव्यात.
 

पीक संरक्षण
रोग व्यवस्थापन

  • झाडावरील फांद्या कापणीनंतर, कात्रीला सोडियम हायपोक्लोराइट १-२ टक्के द्रावणामध्ये बुडवून निर्जंतुकीकरण करावे.
  • झाडाच्या बुंध्यावर ६० सें.मी. उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट ब्रशच्या साह्याने लावावी. (बोर्डो पेस्ट तयार करण्यासाठी मोरचूद १ किलो व चुना १ किलो वेगवेगळ्या भांड्यांमध्ये ५ लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालावा. दुसऱ्या दिवशी सकाळी एकत्र करून पेस्ट तयार करावी. ही तयार केलेली पेस्ट १२ तासांच्या आत वापरावी.)
  • संत्रा झाडाच्या बुंध्यामधून डिंक्याचा स्राव सुरू असल्यास, तो तीक्ष्ण चाकूने खरवडून घ्यावा. त्या ठिकाणी मेटॅलॅक्झिल ४ टक्के अधिक मॅंकोझेब ६४ टक्के (संयुक्त बुरशीनाशक) २०० ग्रॅम किंवा फोसेटील ए एल २०० ग्रॅम प्रति २५० मि.लि. पाण्यात मिसळून पेस्ट करावी. ही पेस्ट डिंक्या झालेल्या ठिकाणी लावावी.
  • फायटोफ्थोराग्रस्त झाडावर मेटॅलॅक्झिल ४ टक्के अधिक मॅंकोझेब ६४ टक्के (संयुक्त बुरशीनाशक) किंवा फोसेटील एएल २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून फवारणी करावी. फवारणी करताना संपूर्ण झाड ओले होईल, असे पाहावे. उर्वरित द्रावणाची झाडाभोवती आळवणी करावी.

कीड व्यवस्थापन
खोडकिडा, ईंडरबेला किंवा साल खाणारी अळी : नियंत्रणासाठी अळीने पाडलेल्या छिद्रातील साल काढावी. इंजेक्शनच्या मदतीने शिफारशीत कीटकनाशक छिद्रात टाकावे. कापसाचा बोळा या द्रावणात बुडवून छिद्र बंद करावे.
संत्र्यावरील पिठ्या ढेकुण :  झाडाभोवतीची जमीन चाळणी करून मोकळी करावी. झाडाच्या खोडाला प्लॅस्टिकच्या पट्ट्या लावून त्यावर ग्रीस लावावे. पिठ्या ढेकुण वाहून नेण्याचे काम मुंग्या करतात, त्यामुळे मुंग्यांची वारुळे बागेमध्ये असल्यास नष्ट करावीत. त्यासाठी क्लोरपायरिफाॅस (२० ई.सी.) ५ मि.लि. प्रतिलिटर पाणी हे द्रावण मुंग्यांच्या वारुळातून टाकावे. फवारणी प्रतिलिटर पाणी. क्लोरपायरिफाॅस (२० ई. सी.) २ मि.लि.
टीप : झाडावर व झाडाच्या बुंध्यावर फवारणी करावी.

संपर्क : डाॅ. एम. एस. लदानिया, ०७१२- २५००३२५,
दिनकर नाथ गर्ग, ९८२२३६९०३०

(राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर)

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...