लिंबूवर्गीय फळपीक सल्ला

लिंंबुवर्गीय फळे
लिंंबुवर्गीय फळे

सिंचन व्यवस्थापन : लिंबूवर्गीय फळबागेमध्ये ठिबक सिंचन संच असल्यास त्याच्या नळ्या पसरून घ्याव्यात. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये झाडांना पाणी देण्यासाठी तोट्या (ड्रीपर) किंवा सूक्ष्मनलिका (मायक्रोटयुब) वापरल्या जातात. या तोट्या दाबनियमक वापरल्यास शेतीमध्ये पाणी सर्वदूर सम प्रमाणात दिले जाते. या पद्धतीमध्ये पाण्याचा दाब आपोआप सर्वदूर ९० ते ९५ टक्के सारखा पसरला जातो.

  • ठिंबक सिंचनाची सुविधा नसल्यास, दुहेरी रींग पद्धतीने सिंचनासाठी आळे करावे.
  • जमिनीची मशागत आणि निंदणी करावी.
  • मृग बहाराचे फळ व्यवस्थापन :

  • फळगळ कमी करण्याकरिता फवारणी, १.५ ग्रॅम जिबरेलीक आम्ल अधिक १०० ग्रॅम काॅर्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) अधिक १ किलो युरीया प्रति १०० लिटर पाणी.पुढील फवारणी १५ दिवसांनंतर करावी.
  • मृग बहाराच्या फळांचा आकार वाढविण्याकरिता, एक ग्रॅम जिबरेलिक आम्ल एक ग्रॅम अधिक २ किलो माेनो पोटॅशिअम फाॅस्फेट किंवा डाय अमोनियम फॉस्फेट किंवा पोटॅशिअम नायट्रेट यापैकी एक प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून १५-२० दिवसांच्या  अंतराने फवारणी करावी.
  • रोगनियंत्रण व्यवस्थापन : 

  • फायटोफ्थोरा रोगाच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी  
  • मेटॅलॅक्झिल एम अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.७५ ग्रॅम किंवा फोसेटील एएल २.५ ग्रॅम-संपूर्ण झाड ओले होईपर्यंत फवारणी करावी. हे द्रावण झाडाभोवती टाकावे.
  • झाडाच्या बुंद्यावर २ फुटांपयत बोर्डोपेस्ट ब्रशने लावून घ्यावी.
  • बोर्डो पेस्ट तयार करण्याची पद्धत : १ किलो मोरचूद व १ किलो चुना ५ लिटर पाण्यात वेगवेगळा रात्रभर भिजवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी तिसऱ्या भांड्यात एकत्र करून पेस्ट करावी.
  • कीडनियंत्रण व्यवस्थापन :

  • फळमाशी : या महिन्यात पिकलेल्या फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. या किडीच्या नर माशीला आकर्षित करण्यासाठी अर्धा मि.ली. मिथाईल युजेनॉल अधिक अर्धा मि.लि. मॅलॅथिआॅन याचे मिश्रण करावे. हे मिश्रण रुंद तोडाच्या बाटलीत ठेवावे. फळतोडणीच्या आधी साठ दिवसापासून अशा बाटल्या हेक्टरी २५ प्रमाणात बागेत लावाव्यात. त्याकडे नरमाशा आकर्षित होऊन बळी पडतात. बाटलीतील कीटकनाशकाचे द्रावण दर ३० दिवसांनी बदलावे.
  • कोळी : सध्या वाढत्या उन्हामुळे संत्रा बागेमध्ये कोळ्यांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसताक्षणीच, फवारणी प्रतिलिटर पाणी डायकोफाॅल २ मि.ली. किंवा इथिआॅन २ मि.ली. किंवा प्रोपरगाईट १ मि.ली. किंवा द्राव्य गंधक ३ ग्रॅम - आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसाचे अंतराने घ्यावी.
  •  
    बागेसाठी पाण्याचे प्रमाण
    झाडाचे वय (वर्षे)    प्रतिझाड प्रतिदिन पाणी (लिटर)
    संत्रा व मोसंबी बागेसाठी संत्रा व मोसंबी बागेसाठी
    १    ९
    ४   ४०
    १०५
    १० व अधिक     १३१
    लिंबू बागेसाठी
    १    ६
    ४   १९
    ८   ५७
    १० व अधिक  ९२

    संपर्क : दिनकरनाथ गर्ग, ९८२२३६९०३० (राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com