नारळ बागेत ठेवा स्वच्छता

नवीन रोपांना आधार द्यावा.
नवीन रोपांना आधार द्यावा.

पहिली दोन वर्षे नारळ रोपांना विणलेले झाप, झावळ्या, गवत, फांद्या यांची सावली करावी. बागेत स्वच्छता, इतर कामे करताना झाडाच्या बुंध्याला जखमा होणार नाहीत याची काळजी घ्यावी. ठिबक सिंचनाद्वारे मोठ्या झाडांसाठी प्रतिझाड, प्रतिदिन ३० ते ३५ लिटर पाणी द्यावे.

नवीन बागेचे व्यवस्थापन

  • नवीन रोपांना आधार द्यावा. रोप लावल्यानंतर पश्‍चिमेकडून वाऱ्याने हलू नये म्हणून रोपाच्या उंचीच्या दोन काठ्या ४५ सें.मी. अंतरावर रोपाच्या दक्षिणोत्तर बाजूस रोवून त्याला आडवी काठी बांधावी, नारळ रोप सैलसर बांधून ठेवावे.
  • नवीन लागवड केलेल्या बागेची स्वच्छता करावी. नांग्या त्वरित भरून घ्याव्यात.
  • बागेत मोकाट पाणी दिल्यास आळ्यात तणांचा प्रादुर्भाव होतो. तसेच पाण्याचा अपव्यय होतो, त्यामुळे ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे.
  • तण नियंत्रणासाठी रोपांच्या अळ्यात जैविक अथवा प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन करावे.ज्यामुळे तणाचा कमी प्रादुर्भाव होतो. पाण्याचे बाष्पीभवन होत नाही.
  • पहिली दोन वर्षे रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी विणलेले झाप, झावळ्या, गवत, झाडाच्या फांद्यांची कृत्रिम सावली करावी. रोपाच्या चारही दिशांना केळी, पपई, एरंडी अगर गिरिपुष्पाची लागवड करावी. यामुळे रोपांना सावली तसेच या पिकांपासून उत्पादनही मिळते.
  • प्रति लहान झाडाला १५ लिटर पाणी द्यावे.
  • जुन्या बागेचे व्यवस्थापन

  • बागेची स्वच्छता करावी. फळे येतात तेथील शिल्लक जुने नारळाचे देठ, फोकी, वांझ पोयी व इतर कचरा काढून टाकावा.
  • नारळाची मुळे तंतुमय प्रकारातील असल्यामुळे पाऊस संपल्यानंतर झाडाच्या बुंध्यात मातीची भर द्यावी. त्यामुळे त्यांचे संरक्षण होऊन अन्नशोषण क्षमता वाढते.
  • ठिबक सिंचनाद्वारे प्रतिमोठे झाड प्रतिदिन ३० ते ३५ लिटर पाणी द्यावे.
  • कमी उत्पादन म्हणजे प्रतिझाड प्रतिवर्षी वार्षिक सरासरी दहा नारळांपेक्षा कमीत कमी फळे देणारी जुनी झाडे काढून टाकावीत.
  • बागेत स्वच्छता किंवा इतर कामे करताना झाडाच्या बुंध्याला जखमा करू नयेत.
  • झाडाचा कोंब गळणे, पडणे किंवा सुकणे, खोडातून डिंक बाहेर पडणे अशा प्रकारच्या विकृतीकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात.
  • बऱ्याचशा बागांमध्ये पालाशच्या कमतरतेमुळे फळ गळ, झावळी झाडावर लोंबणे, फोकी झाडावर राहणे अशा बाबी दिसून येतात. त्यासाठी प्रतिझाडाला सिंचनाबरोबर १ ते २ किलो पालाशची मात्रा देणे आवश्‍यक आहे.
  • चांगले वाढलेले झाड म्हणजे सुमारे २६ पेक्षा जास्त झावळ्या आणि ही पाने ३६० अंश कोनात विखुरलेली असणे ही लक्षणे महत्त्वाची आहेत. अशा झाडांना दर महिना एक झावळी आणि एक पेंड येते.
  • जमिनीमध्ये पाण्याचा ओलावा टिकवून धरण्यासाठी प्लॅस्टिक अथवा झावळ्यांचे अाच्छादन  करावे.
  • रोपवाटिका व्यवस्थापन

  • रोपवाटिकेतील गवत काढून घेऊन स्वच्छता ठेवावी. त्यामुळे रोपांची चांगली वाढ होते.
  • रोपे रोग किडीमुक्त आहेत याची खात्री करावी.
  • बुंध्यात मातीची भर द्यावी. रोपाला वाढीसाठी आधार मिळतो.
  • जोमाने वाढीसाठी गांडूळखताबरोबर युरिया खताची मात्रा द्यावी. खताच्या मात्रेनंतर मुबलक पाणी द्यावे.
  • गरजेनुसार नवीन रोपांसाठी मार्च - एप्रिलमध्ये नियंत्रित सावली करावी.
  • संपर्क : ०२३५२-२५५०७७ (प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com