agricultural news in marathi, conservation of soil moisture for yield incease of jowar, Agrowon, Maharashtra | Agrowon

जमिनीतील ओलावा टिकवा, ज्वारी उत्पादन वाढवा
डॉ. व्ही. एम. अमृतसागर, डॉ. बी. आर. नजन
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

रब्बी ज्वारी पेरणी ही प्रामुख्याने जमिनीतील ओलाव्यावर केली जाते. पिकांच्या संवेदनशील अवस्था ओळखून त्या अवस्थेमध्ये पाण्याचे नियोजन करावे. त्यातून चांगली उत्पादन वाढ मिळू शकते.

उत्तम उत्पादनासाठी ज्वारी पिकाला संरक्षित पाणी देण्याची आवश्यकता असते. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्याच्या प्रमाणानुसार खालील संवेदनशील अवस्थांमध्ये सिंचनाचे नियोजन करावे.

रब्बी ज्वारी पेरणी ही प्रामुख्याने जमिनीतील ओलाव्यावर केली जाते. पिकांच्या संवेदनशील अवस्था ओळखून त्या अवस्थेमध्ये पाण्याचे नियोजन करावे. त्यातून चांगली उत्पादन वाढ मिळू शकते.

उत्तम उत्पादनासाठी ज्वारी पिकाला संरक्षित पाणी देण्याची आवश्यकता असते. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्याच्या प्रमाणानुसार खालील संवेदनशील अवस्थांमध्ये सिंचनाचे नियोजन करावे.

 • दोन पाणी उपलब्ध असल्यास :  ज्वारीच्या गर्भावस्थेत म्हणजेच पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी पहिले पाणी व पोटरी अवस्था म्हणजे ५० ते ६० दिवसांनी दुसरे पाणी द्यावे.
 • एकच पाणी उपलब्ध असल्यास : पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसानंतर संरक्षित पाणी द्यावे.

जमिनीमध्ये ओलावा कमी असल्यास :
रोपांची संख्या कमी करणे : रब्बी ज्वारीच्या पेरणीनंतर पावसाचा मोठा खंड पडल्यास जमिनीत असलेला ओलावा टिकवून धरण्यासाठी रोपांची संख्या त्या प्रमाणात कमी करावी. ओलाव्याचा पिकास योग्य फायदा घेण्यासाठी झाडांची संख्या १/३ पर्यंत कमी करावी.
उदा.

 • जमिनीत अत्यंत कमी ओलावा असल्यास (९० ते १०० मि.मी.) एक आड एक ओळी काढाव्यात.
 • कमी ओलावा असल्यास (१३० ते १५० मि.मी.) दोन ओळीनंतर तिसरी ओळ काढून टाकावी.

पानांची संख्या कमी करणे : दुष्काळी परिस्थितीत रब्बी ज्वारीच्या ताटांची वरील ३-४ पाने ठेवून खालील पाने काढून टाकावीत. विशेषतः उशिरा येणाऱ्या जातींची खालची पाने अवर्षण परिस्थितीत कमी करावीत.

बाष्प विरोधकाची फवारणी करावी : केअोलीन ८ टक्के किंवा खडू पावडर ८ टक्के (८० ग्रॅम प्रति लिटर पाणी) यांची फवारणी केल्यास पानांद्वारे होणारे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते.

आच्छादन :  जमिनीतील ६० ते ७० टक्के ओलावा बाष्पीभवनामुळे नष्ट होतो. हे टाळण्यासाठी पेरणीनंतर २१ दिवसांच्या आत पीक अवशेष किंवा सेंद्रिय पदार्थांनी दोन ओळींमध्ये आच्छादन करावे. साधारणपणे हेक्टरी ५ टन सेंद्रिय अवशेष लागतात.

ज्वारी पिकावर येणारे रोग आणि त्यांचे नियंत्रण :
काणी :

 • काणी या रोगाचे दाणे काणी, मोकळी काणी आणि झिपरी काणी असे प्रकार आहेत.
 • काणी बुरशीजन्य रोग असून रंगाने काळी असते.
 • या रोगाचे बिजाणू बियांना चिकटून राहतात आणि बियाबरोबर रुजतात. हे टाळण्यासाठी मळणीपूर्वी काणीग्रस्त कणसे निवडून नष्ट करावीत. त्याचप्रमाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे आवश्यक असते. (प्रमाण : ३०० मेश गंधक ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे)

तांबेरा :

 • पानांच्या खालच्या बाजूस गोल लांबट तांबूस-जांभळट ठिपके दिसतात. त्यातून लाल किंवा तपकिरी भुकटी बाहेर पडते, त्यामुळे पाने वाळतात.
 • नियंत्रणाकरीता, फवारणी मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी

करपा :

 • बुरशीजन्य रोग असून पानावर पिवळे, राखी रंगाचे ठिपके दिसतात. पाने करपून जातात.
 • नियंत्रणासाठी फवारणी मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.  

खडखड्या :

 • पीक पक्व होण्याच्या अवस्थेत असताना या रोगामुळे ताटाच्या खोडातील गाभा सुकतो. ताटातील भेंडाचे धागेदोरे होतात आणि ते काळे पडतात. ताटे मोडून पडतात. कडकड आवाज येतो.
 • हे टाळण्यासाठी जमिनीतील ओलावा कमी झाल्यास संरक्षित पाणी द्यावे. पिकामध्ये जमिनीवर पालापाचोळा पसरावा.

संपर्क : डॉ. विजय अमृतसागर, ९४२१५५८८६७
(विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर)

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...