agricultural news in marathi, control of lalya khurkut disease | Agrowon

लाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण कसे करावे?
गो संशोधन व विकास प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

सर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत बऱ्याच भागांत लाळ्या खुरकूतची साथ येते. हा रोग खूर विभागलेल्या जनावरांना होतो. हा रोग प्रामुख्याने सांसर्गिक पाणी व खाद्य खाल्ल्याने होतो.

सर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत बऱ्याच भागांत लाळ्या खुरकूतची साथ येते. हा रोग खूर विभागलेल्या जनावरांना होतो. हा रोग प्रामुख्याने सांसर्गिक पाणी व खाद्य खाल्ल्याने होतो.

  • रोगाची लक्षणे म्हणजे जनावराचे खाणे-पिणे बंद होते. जनावरास ताप येतो. दुधाळ जनावरांत दूध उत्पादनात घट येते. काही वेळेस उत्पादनक्षमता कायमची नष्ट होण्याची शक्‍यता असते.
  • जनावराच्या जिभेवर, टाळूवर व तोंडाच्या आतील भागात फोड येतात. जनावराच्या तोंडातून चिकट तारेसारखी लाळ गळते. पुढील पायांमध्ये खुरांतील बेचकीमध्ये फोड येतात. जनावरास मागील पायांत फोड तयार झाल्यास अपंगत्व येते.
  • पायाने अधू असलेले पीडित जनावर रोगग्रस्त पाय सारखे झटकत असते.

प्रतिबंधात्मक उपाय

  • रोगाच्या साथीच्या काळात रोगी जनावरे कुरणात चरण्यासाठी जाऊ देऊ नयेत. रोगाचा प्रसार लाळेतून होत असल्याने रोगी जनावरांनी खाल्लेला चारा इतर जनावरांना खाऊ देऊ नये.
  • रोगी जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी करावीत व त्यांच्यावर औषधोपचार करावा. रोगी जनावरांना सार्वजनिक ठिकाणी पाणी न पाजता वेगळ्या ठिकाणी पाणी पाजावे.
  • रोगी जनावरे बांधण्याची जागा रोज किमान एकदा जंतुनाशकाने धुवावी. जनावरांचे दूध काढण्याची भांडी धुण्याच्या सोड्याने व गरम पाण्याने धुऊन घ्यावीत म्हणजे त्यांचे निर्जंतुकीकरण होईल, रोगप्रसार टळेल.
  • सर्व जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्‍यतो होत नाही. या रोगाच्या नियंत्रणासाठी लसीकरण सप्टेंबर आणि मार्चमध्ये करावे.

संपर्क  : ०२४२६- २४३३६१
(गो संशोधन व विकास प्रकल्प,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

 

टॅग्स

इतर प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
फणस लागवड  उष्ण व दमट हवामान फणस पिकाला मानवते....
फळबागेत पाणी साठवण कुंड कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे...
पानवेल लागवड पानवेल लागवडीसाठी सुपीक, उत्तम निचरा होणारी जमीन...
नारळ जाती आणि लागवडीबाबत माहिती नारळ लागवडीसाठी एक वर्ष वयाची रोपे निवडावीत....
अशी करतात कणगर लागवडकणगर लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत व...
अशी करा ॲस्टर लागवड ॲस्टर लागवडीचे नियोजन करताना हंगाम, जातींची निवड...
अशी करा अडुळसा लागवडअडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर...
अशी करतात गवती चहाची लागवड गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. लागवडीसाठी...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
शेळ्यांची निवडशे ळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
कोरफड लागवड स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
नेपिअर गवताची लागवडसं करित नेपिअर या चारापिकाचे यशवंत आणि फुले जयवंत...
फणस व्यवस्थापनफणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसामध्ये...
कागदी लिंबू लागवडकागदी लिंबू पिकाला मध्यम काळी, हलकी मुरमाड,...
लाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रणसर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत...
दालचिनी, लवंग लागवडदालचिनी लागवड दालचिनी लागवड अतिपावसाळा सोडून...