कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण
डॉ. पी. आर. झंवर, डॉ. ए. जी. बडगुजर
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

सद्यःस्थितीत कपाशी पीक बोंडे धरण्याच्या अवस्थेत असून गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी फरदड (पुनर्बहर) घेतल्याने यंदाच्या खरीप हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरवातीपासूनच कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहे.

प्रमुख कारणे :

सद्यःस्थितीत कपाशी पीक बोंडे धरण्याच्या अवस्थेत असून गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी फरदड (पुनर्बहर) घेतल्याने यंदाच्या खरीप हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरवातीपासूनच कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहे.

प्रमुख कारणे :

  • कपाशीच्या फरदडीखाली क्षेत्रात वाढ झाल्यामुळे किडीच्या जीवनक्रमात खंड पडत नाही.
  • बीटी जनुकास प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यामुळे बीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे.
  • आश्रय पिकाच्या ओळी न लावणे.
  • योग्यवेळी बोंडअळीच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष.

नियंत्रणाच्या उपायजोजना :

  • प्रादुर्भावग्रस्त गळालेली पाने व बोंडे जमा करून नष्ट करावीत.
  • डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात.
  • नियंत्रणासाठी हेक्टरी पाच कामगंध सापळे लावावेत.  ट्रायकोग्रामा टॉयडिया बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशीचे कार्ड (१.५ लाख अंडी/हेक्टरी) कपाशी पिकात लावावेत.

आर्थिक नुकसानाची पातळी :
एक जिवंत अळी प्रति १० हिरवी बोंडे किंवा ८ ते १० पतंग प्रतिसापळा सलग तीन रात्री.

कीटकनाशकांची फवारणी : (प्रतिलिटर पाणी)
अझाडिरॅक्टीन (०.१५ टक्के)    - ५ मि.लि. किंवा अझाडिरॅक्टीन (०.३० टक्के) - ४ मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस (५० ईसी) - २ मि.लि.   किंवा    
थायोडीकार्ब (७५ डब्ल्यूपी) - २ ग्रॅम  किंवा
लॅमडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) - १ मि.लि. किंवा
क्लोरपायरीफॉस (५० टक्के) + सायपरमेथ्रीन (५ टक्के ई सी) -    २ मि.लि.  

संपर्क :  डॉ. ए. जी. बडगुजर, ७५८८०८२०२४
(कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर नगदी पिके
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...
उस पिकावरील कीड - रोगांचे नियंत्रणकीड नियंत्रण :  खोड कीड : किडीचा...
उस लागवड तंत्रज्ञानआजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस...
तंत्र कांदा साठवणुकीचे...जून ते ऑक्‍टोबर या काळात कांद्याची काढणी होत नसते...
कांदा पीक संरक्षण रोग नियंत्रण :  तपकिरी करपा :...
कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणसद्यःस्थितीत कपाशी पीक बोंडे धरण्याच्या अवस्थेत...
दीर्घ काळ साठवता येणारा गुलाबी बेंगलोर...भारतात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील लासलगाव...
कांदा लागवड तंत्रज्ञान जमीन  :  पाण्याचा उत्तम निचरा...
कपाशीवरील फूलकीड, कोळी किडीचे नियंत्रणफूलकिडे ः आर्थिक नुकसान संकेत पातळी ः ...
सावधान! उसावर पायरिला, पांढरी माशी सध्या पावसाने दिलेला ताण आणि तापमानात अचानक...
ऊस बेणे मळ्याने दिली आर्थिक सक्षमता नगर जिल्ह्यातील तेलकुडगाव (ता. नेवासा) हे गाव...