agricultural news in marathi, control of ring spot disease on papaya , Agrowon, Maharashtra | Agrowon

पपईवरील रिंग स्पॉट रोगाचे नियंत्रण
डॉ. श्रीहरी हसबनीस, हर्षवर्धन गायकवाड
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

पपई पिकावर सद्यस्थितीत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. रिंग स्पॉट व्हायरस या विषाणूजन्य रोगाचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो. हा रोग अत्यंत नुकसानकारक असून, त्याच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात.

केळीनंतर सर्वाधिक उत्पन्न देणारे पपई हे फळपीक आहे. मात्र रिंग स्पॉट व्हायरस या रोगामुळे या पिकाखालील क्षेत्र घटत आहे. पपाया रिंग स्पॉट व्हायरस (PSRV) हा विषाणू या रोगास कारणीभूत असून रोगाची प्रारंभिक लक्षणे ओळखून वेळीच नियंत्रण करावे.  

लक्षणे

पपई पिकावर सद्यस्थितीत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. रिंग स्पॉट व्हायरस या विषाणूजन्य रोगाचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो. हा रोग अत्यंत नुकसानकारक असून, त्याच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात.

केळीनंतर सर्वाधिक उत्पन्न देणारे पपई हे फळपीक आहे. मात्र रिंग स्पॉट व्हायरस या रोगामुळे या पिकाखालील क्षेत्र घटत आहे. पपाया रिंग स्पॉट व्हायरस (PSRV) हा विषाणू या रोगास कारणीभूत असून रोगाची प्रारंभिक लक्षणे ओळखून वेळीच नियंत्रण करावे.  

लक्षणे

 • रिंग स्पॉट विषाणूचा संसर्ग झालेले झाड १५ दिवसांनंतर लक्षणे दाखविण्यास सुरवात करते.
 • सुरवातीला पाने फिकट हिरवी व पिवळसर होतात. पानाच्या शिरा हिरव्या दिसू लागतात. पानाच्या वरील बाजूस शिरा मुरडतात.
 • रोगाचा प्रादुर्भाव वाढत जाईल तसा पानांचा आकार कमी होत जातो. पानांची टोके धाग्यांप्रमाणे किंवा बुटांच्या लेसप्रमाणे दिसतात.
 • झाडे बुटकी राहतात. शेंड्यांची पाने जास्त तीव्र स्वरूपात लक्षणे दाखवतात.
 • पाने जाड आणि खडबडीत होतात. रोगग्रस्त पानांचा स्पर्श लुसलुशीत वाटत नाही.
 • पानांचा आकार लहान झाल्याने, अन्नद्रव्ये तयार होण्याची क्रिया (प्रकाश संश्‍लेषण) मंदावते.
 • खोडाचा शेंड्याकडील कोवळा भाग व कोवळ्या पानांच्या देठावर गर्द हिरव्या रंगाचे चट्टे दिसतात.
 • पूर्णपणे विकसित झालेल्या हिरव्या फळावर अनेक वर्तुळाकार, समकेंद्री, पाणीदार डाग दिसतात.
 • रोगग्रस्त झाडांची फळे लहान व वेडीवाकडी दिसतात.
 • रोगग्रस्त झाडावरील फळांच्या संख्येत लक्षणीय घट होते.

उपाययोजना

 • सुरवातीच्या अवस्थेतच रोगग्रस्त झाड मुळासकट उपटून, जाळून टाकावे. त्यामुळे शेतामध्ये विषाणूचा होणारा प्रसार वेळीच रोखण्यास मदत होते.
 • मावा ही कीड या रोगाच्या विषाणूंची वाहक आहे. त्यामुळे मावा किडीच्या नियंत्रणासाठी शेतात एकरी २० पिवळे चिकट सापळे लावावेत.
 • फळबागेच्या कुंपणावर मावा किडीस अडथळ्यासाठी मका आणि ज्वारी ही पिके लावावीत.
 • पपईच्या बागेत आंतरपीक म्हणून किंवा बागेजवळ काकडीवर्गीय पिकांची लागवड करू नये.
 • नत्रखताच्या अतिवापराने रोगाची तीव्रता वाढते. त्यामुळे नत्राची संतुलित प्रमाणात मात्रा द्यावी.
 • पालाशयुक्त खतांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व रोगाची तीव्रता कमी होते. त्यामुळे पालाशयुक्त खतांचा शिफारशीनुसार संतुलित वापर करावा.
 • मावा किडीचा प्रादुर्भाव दिसताच त्याच्या नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

फवारणी प्रतिलिटर पाणी

 • डायमेथोएट - १.५ मि.लि.त्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने
 • निंबोळी अर्क (१०,००० पीपीएम) -    ५ मि.लि.

संपर्क : ०२१६९-२६५३३४
(मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा)

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...